Health : थंडीमध्ये नारळाचं पाणी जरूर प्या, हे आरोग्यदायी फायदे खूप कमी लोकांना माहितीयेत जाणून घ्या!

Coconut water benefits : थंडीच्या या दिवसांमध्ये बहुतेक लोकांना स्किनशी संबंधित अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. मग स्किन रफ होणे, एक्जिमा अशा समस्या निर्माण होतात.

Health : थंडीमध्ये नारळाचं पाणी जरूर प्या, हे आरोग्यदायी फायदे खूप कमी लोकांना माहितीयेत जाणून घ्या!
COCONUT WATERImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Nov 12, 2023 | 12:15 AM

मुंबई : नारळाचे पाणी हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. डॉक्टर देखील प्रत्येकाला नारळ पाणी पिण्याचा सल्ला देतात. नारळ पाणी पिल्यामुळे थकवा नाहीसा होतो, रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते असे अनेक फायदे आपल्या शरीराला होतात. तसंच नारळ पाणी हे आपल्या त्वचेसाठी देखील गुणकारी ठरते. सध्या हिवाळ्याचे दिवस सुरू आहेत. थंडीच्या या दिवसांमध्ये बहुतेक लोकांना स्किनशी संबंधित अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. मग स्किन रफ होणे, एक्जिमा अशा समस्या निर्माण होतात. तर अशावेळी या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी नारळ पाणी फायदेशीर ठरते. तर आता नारळ पाण्याचे स्किनला काय फायदे होतात याबाबत आपण जाणून घेणार आहोत.

नारळ पाणी हे आपल्या स्किनवरील पिगमेंटेशन कमी करण्यास मदत करते. तसेच बहुतेक लोकांच्या चेहर्‍यावर काळे डाग असतात. तर नारळ पिल्यामुळे चेहऱ्यावरील डाग कमी होण्यास मदत होते. तसंच हे पाणी पिल्यानंतर आपला चेहरा उजळण्यास मदत होते. तुमची त्वचा चमकदार आणि टवटवीत बनते.

थंडीच्या दिवसांत आपली त्वचा कोरडी आणि रफ पडते. तर या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी नारळ पाणी प्या. नारळ पाणी आपल्या त्वचेला आतून हायड्रेट करते. तसंच आपली आपल्या स्किनमध्ये ओलावा टिकून राहतो. सोबतच हे पाणी पिल्यानंतर रक्ताभिसरण गतिमान होते यामुळे आपली त्वचा चमकदार होण्यास मदत होते. त्यामुळे हिवाळ्यात तुमच्या स्किनला नारळाचे पाणी लावा. यामुळे तुमची स्किन मॉइस्चराइज राहील.

नारळाच्या पाण्याचा वापर तुम्ही स्किन टोनिंगसाठी करू शकता. या पाण्यामुळे आपल्या स्किनवरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते. तसंच आपल्या स्किनची पोत सुधारते. तर तुम्ही नारळाच्या पाण्याचा वापर टोनर म्हणून करू शकता. त्यामुळे तुमची स्किन निरोगी आणि चमकदार होण्यास मदत होईल.

Non Stop LIVE Update
विधानसभेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला जास्त जागा? मविआचे 3 फॉर्म्युले
विधानसभेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला जास्त जागा? मविआचे 3 फॉर्म्युले.
ओबीसींना पंकजा मुंडे यांचा पाठिंबा, तर छगन भुजबळही उतरले मैदानात
ओबीसींना पंकजा मुंडे यांचा पाठिंबा, तर छगन भुजबळही उतरले मैदानात.
एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन एकत्र आले तर... पाटलांचं वक्तव्य नेमकं काय?
एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन एकत्र आले तर... पाटलांचं वक्तव्य नेमकं काय?.
काय कमावल अन काय गमावल हे 13 जुलैला...जरांगे पाटलांचा नेमका इशारा काय?
काय कमावल अन काय गमावल हे 13 जुलैला...जरांगे पाटलांचा नेमका इशारा काय?.
गायब असलेला पाऊस 'या' दिवशी पुन्हा करणार कमबॅक, IMD चं मोठं अपडेट
गायब असलेला पाऊस 'या' दिवशी पुन्हा करणार कमबॅक, IMD चं मोठं अपडेट.
जरांगे पाटलांना रेड कार्पेट आणि आमची दखलही नाही? ओबीसी नेता आक्रमक
जरांगे पाटलांना रेड कार्पेट आणि आमची दखलही नाही? ओबीसी नेता आक्रमक.
तोडीबाज नेता, ब्लॅकमेलिंग आणि वसुलीत नंबर वन काम; बच्चू कडूंवर टीका
तोडीबाज नेता, ब्लॅकमेलिंग आणि वसुलीत नंबर वन काम; बच्चू कडूंवर टीका.
शरद पवार यांचं मुख्यमंत्र्यांना थेट पत्र अन् केली महत्त्वाची मागणी
शरद पवार यांचं मुख्यमंत्र्यांना थेट पत्र अन् केली महत्त्वाची मागणी.
मरतुकडी म्हैस ध्यानीमनी नसताना गाभण राहावी तसा राणेंचा...सामनातून टीका
मरतुकडी म्हैस ध्यानीमनी नसताना गाभण राहावी तसा राणेंचा...सामनातून टीका.
Elon Musk याच्या दाव्यानंतर निवडणूक आयोगानं फटकारलं, नेमकं काय प्रकरण?
Elon Musk याच्या दाव्यानंतर निवडणूक आयोगानं फटकारलं, नेमकं काय प्रकरण?.