AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Corona : ‘कोरोना’ वरील औषध Paxlovid आता मेडीकलमध्येही उपलब्ध; कोरोना संक्रमणाच्या 5 दिवसांच्या आत घ्यावा लागेल पूर्ण कोर्स!

अमेरिकेत आता कोरोनाचे औषध पॅक्सलोविड (Paxlovid)थेट मेडिकल शॉपमधूनही खरेदी करता येणार आहे. आतापर्यंत हे औषध केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घेतले जात होते, परंतु आता तुम्ही ते थेट मेडिकल दुकानातून खरेदी करू शकता.

Corona : ‘कोरोना’ वरील औषध Paxlovid आता मेडीकलमध्येही उपलब्ध; कोरोना संक्रमणाच्या 5 दिवसांच्या आत घ्यावा लागेल पूर्ण कोर्स!
| Updated on: Jul 11, 2022 | 5:28 PM
Share

अमेरिकन फार्मा कंपनी फायझरचे कोरोनावरील औषध पॅक्सलोव्हिड(Paxlovid) आता मेडिकल शॉपमधूनही (medical shop) खरेदी करता येणार आहे. अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) त्याला मान्यता दिली आहे. FDA ने मान्यता देताना आता फार्मसी दुकाने देखील रुग्णांना Paxlovid औषध देऊ शकतात. असे नमुद केले आहे, त्यामुळे कोरोना रुग्णांसाठी हे उपचाराच्या दृष्टीने सोयीचे होणार आहे. यापूर्वी केवळ डॉक्टरांचा सल्ला व प्रिस्क्रीप्शनवर कोरोना रुग्णांना हे औषध मिळू शकत होते. यूएस नियामकाने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये Paxlovid या औषधाला कोरोना रुग्णांवर वापरण्यासाठी मान्यता (Approval to use) दिली होती. हे औषध कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी वापरले जात होते. आतापर्यंत हे औषध डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घेतले जात होते. पण आता कोरोनाचे रुग्ण फार्मसीच्या दुकानात जाऊन कुठल्याही प्रिस्क्रिप्शन शिवाय औषध घेऊ शकतात. पॅक्सलोविड (Paxlovid)हे कोरोनाचे औषध असून, औषध निर्माती कंपनी फायझरने (Company Pfizer) बनवले आहे. गेल्या वर्षी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी या औषधाला कोरोना विरुद्धच्या लढाईतील एक मोठे पाऊल म्हटले होते.

कोण? घेऊ शकते हे औषध

ज्या रुग्णांचे वय १२ वर्षांपेक्षा जास्त असेल आणि ज्यांचे वजन किमान ४० किलो असेल त्यांनाच आता हे औषध दिले जाईल. याचा अर्थ जर तुमचे वय १२ वर्षांपेक्षा जास्त असेल, पण वजन ४० किलोपेक्षा कमी असेल, तर हे औषध घेता येणार नाही. किंवा अशा रुग्णांना हे औषध देऊ नये अशी मार्गदर्शक सूचना आहेत.

5 दिवसांच्या आता घ्यावे लागणार

कोरोनाची लक्षणे दिसू लागल्यावर Paxlovid हे औषध 5 दिवसांच्या आत घेतले जाऊ शकते. या औषधाचा कोर्स 5 दिवसांचा असेल. या औषधाला अद्याप कोरोनासाठी मान्यता मिळालेली नसली तरी आपत्कालीन स्थितीत त्याचा वापर केला जाऊ शकतो.

तर लसीची गरज भासणार नाही का?

पॅक्सलोव्हिड हा कोरोना लसीचा पर्याय मुळीच नाही. हे फक्त कोरोनाचे औषध आहे जे त्याच्या उपचारात उपयुक्त ठरेल. कोरोनापासून बचाव करण्यासाठी लस हेच प्रभावी उपाय आहे.

हे औषध किती सुरक्षित आहे?

क्लिनिकल ट्रायल्समध्ये हे औषध सुरक्षित असल्याचे सिद्ध झाले आहे. FDA नुसार, कंपनीने 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या 2,100 लोकांचा क्लिनिकल ट्रायलमध्ये समावेश केला होता. त्यापैकी 1,039 जणांना पॅक्सलोव्हिड औषध आणि 1,046 जणांना प्लेसबो देण्यात आले. परिणामांनुसार, पॅक्सलोविड रुग्णांना हॉस्पिटलायझेशन आणि मृत्यूचा धोका 88% कमी आढळून आला. याव्यतिरिक्त, ज्यांना पॅक्सलोविड देण्यात आले त्यापैकी फक्त 0.6% लोकांना हॉस्पिटलायझेशनची गरज पडली किंवा त्यांचा मृत्यू झाला. त्याच वेळी, प्लेसबो उमेदवारामध्ये हा आकडा 6% होता.

औषधाचे दुष्परिणाम काय?

या औषधाचे काही दुष्परिणाम देखील आहेत. एफडीएच्या मते, हे औषध घेतल्यानंतर चाचणी गायब होऊ शकते. डायरिया, बीपी वाढणे आणि स्नायूंचा ताण यासारख्या समस्या असू शकतात.

हे औषध कोणी घेऊ नये?

हे औषध ज्यांना किडनीचा गंभीर आजार आहे त्यांनी अजिबात घेऊ नये. तुम्हाला मूत्रपिंडाचा कोणताही आजार असेल, तर तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच हे औषध घ्या. मात्र, किडनीच्या आजाराने त्रस्त असलेल्यांनी हे औषध वापरणे टाळावे, असा इशारा एफडीएने दिला आहे.

हे औषध भारतातही उपलब्ध आहे का?

Paxlovid औषधाला भारतात अद्याप मान्यता नाही. त्याला आतापर्यंत फक्त अमेरिकेतच मान्यता देण्यात आली आहे.

मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...
काँग्रेससोबत वंचित आल्यानं वर्षा गायकवाड नाराज? युतीवर केलं मोठं विधान
काँग्रेससोबत वंचित आल्यानं वर्षा गायकवाड नाराज? युतीवर केलं मोठं विधान.