Corona Zombie Infection: ‘झॉम्बी संसर्गाची’ चेतावणी! वाढत्या कोरोनामुळे जग चिंतेत

| Updated on: Dec 22, 2022 | 12:46 PM

शास्त्रज्ञ म्हणतात की, कोरोनामुळे लोक झोम्बी संसर्गाचे बळी ठरू शकतात.

Corona Zombie Infection: झॉम्बी संसर्गाची चेतावणी! वाढत्या कोरोनामुळे जग चिंतेत
Coronavirus zombie infection
Image Credit source: Social Media
Follow us on

जगात पुन्हा एकदा कोरोनाबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. चीनमधील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. या पार्श्वभूमीवर अनेक देशांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, शास्त्रज्ञांनी एक आश्चर्यकारक खुलासा केलाय. शास्त्रज्ञ म्हणतात की, कोरोनामुळे लोक झोम्बी संसर्गाचे बळी ठरू शकतात. झोम्बी संसर्ग म्हणजे अशी स्थिती जेव्हा एखाद्या रोगाच्या संपर्कात आल्यामुळे निरोगी व्यक्ती संक्रमित होते आणि इतरांमध्ये हा आजार आणखी पसरतो.

कोविडमुळे जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर मृत शरीरातूनही संसर्ग पसरू शकतो, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. नव्या अभ्यासात ही बाब समोर आली आहे.

मृतदेहांची विल्हेवाट लावणाऱ्यांना याचा सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता असते. पॅथॉलॉजिस्ट, वैद्यकीय परीक्षक, आरोग्य सेवा कर्मचारी यांच्याशिवाय जे कोणी कोविड मृत्यू होतात, अशा रुग्णालयांमध्ये किंवा नर्सिंग होममध्ये काम करतात, त्यांना धोका असतो. या परिस्थितीत, संसर्ग पसरल्याने प्रकरणांमध्ये सर्वाधिक वाढ होईल.

कोविडचा मृत्यू झालेल्या कुटुंबांना सावध राहण्याचा इशारा तज्ज्ञ देत आहेत. जपानमधील चिबा विद्यापीठातील संशोधक हिसाको सैतोह यांनी सांगितले की, “काही देशांमध्ये कोविडमुळे मृत्यू झालेल्या लोकांना एकतर वगळण्यात आले आहे किंवा त्यांना घरी नेण्यात आले आहे. “मला वाटतं ही माहिती सर्वसामान्यांना कळायला हवी,” ते म्हणाले.

2020 मध्ये, जपानी सरकारने शोकग्रस्त कुटुंबांना मृतदेहांपासून दूर राहण्यास तसेच स्पर्श न करण्यास आणि पाहू नका असे सांगितले. तसेच 24 तासांत मृतदेह बॅगेत बंद करून लवकरात लवकर अंत्यसंस्कार करण्याची शिफारस करण्यात आली होती.

अनेक अभ्यासांमध्ये, मृत्यूनंतर 17 दिवसांपर्यंत प्रेतांमध्ये संसर्गजन्य विषाणू आढळले आहेत. डॉ. साईतोह आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कोविडमुळे मृत्यू झालेल्या 11 जणांच्या अनुनासिक आणि फुफ्फुसांच्या नमुन्यांची तपासणी केली असता त्यांना आढळले की मृत्यूच्या 13 दिवसांनंतरही 11 पैकी सहा मृतदेहांमध्ये कोरोना व्हायरसचे सक्रिय अंश आढळले आहेत.

शास्त्रज्ञांनी सांगितले की, “जेव्हा एखाद्या रुग्णाचा संसर्ग झाल्यानंतर लगेच मृत्यू होतो, जेव्हा शरीरात व्हायरसची पातळी खूप जास्त असते तेव्हा लोकांना संक्रमण होण्याची शक्यता असते.