थकवा, सांधेदुखी ते थंडी, दुर्लक्ष करु नका! कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत नवी लक्षणे कोणकोणती?

| Updated on: Apr 16, 2021 | 4:14 PM

Covid 19 Second Wave Common corona Symptoms

थकवा, सांधेदुखी ते थंडी, दुर्लक्ष करु नका!  कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत नवी लक्षणे कोणकोणती?
Coronavirus- प्रातिनिधीक फोटो
Follow us on

मुंबई : कोरोनाची दुसरी लाट (Corona second wave) भारतात जीवघेणी ठरत आहे. काल म्हणजे 15 एप्रिलला देशात सर्वाधिक मृत्यू झाले. ज्या वेगाने रुग्णसंख्या वाढत आहे, त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण आला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा रुग्णसंख्या वाढीचा वेग जास्त आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी परिस्थिती नियंत्रणाबाहेर आहे. नव्या माहितीनुसार कोरोना रुग्णाच्या (Coronavirus new symptoms) संपर्कात आल्यानंतर आता अवघ्या 1 मिनिटाच्या आत कोरोनाची बाधा होते. आता तर कोरोनाची नवी लक्षणे (Covid19 new symptoms) समोर येत आहेत. (covid19 new Symptoms in coronavirus second wave health news)

कोरोनाचा नवा अवतार खूपच धोकादायक आहे. हा व्हायरस पहिल्यापेक्षा अधिक आक्रमक आणि वेगाने पसरत आहे. त्यामुळे कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहेत. टाईम्स ऑफ इंडियाने तज्ज्ञांच्या माहितीवरुन छापलेल्या रिपोर्टमध्ये, कोरोनाची नवी लक्षणे दिसत असल्याचं म्हटलं आहे.

कोरोनाची नवी लक्षणे

कोरोनाच्या आधीच्या संसर्गापेक्षा आताची लक्षणे ही दिसू लागली आहेत. यापूर्वी असिम्पटोमॅटिक म्हणजेच लक्षणविरहीत कोरोना रुग्ण आढळत होते. कोरोनाच्या लक्षणामध्ये घशात खवखव आणि घशात टोचल्यासारखं जाणवत आहे. सध्याच्या कोरोना रुग्णांपैकी 52 टक्के रुग्णांमध्ये ही लक्षणे आढळत आहेत. खाताान किंवा पाणी पितानाही काही रुग्णांना घशात जळजळ जाणवते.

थकवा

COVID-19 संसर्गामध्ये अनेक रुग्णांना खूप थकवा जाणवत आहे. खरं पाहता कोणत्याही व्हायरल इन्फेक्शनमध्ये रुग्णांना थकवा जाणवतो. मात्र कोरोना रुग्णांमध्ये त्याचं प्रमाण अधिक आहे.

स्नायू, सांधे दुखणे 

कोरोना रुग्णांमध्ये थकवा जाणवणं हे सामान्य लक्षण आहे. मात्र आता रुग्णांना स्नायूदुखीचाही त्रास होत आहे. स्नायूदुखी, सांधेदुखी, संपूर्ण अंग दुखणे अशी लक्षणे जाणवत आहेत. कोरोना संसर्गकाळात संपूर्ण अंग दुखणे, शरिराला सूज जाणवणे, सांधे दुख, प्रचंड थकवा अशी लक्षणे दिसत आहेत.

थंडी वाजणे

कोरोना रुग्णांना अचानक थंडी वाजणे, अंग कापणे अशी लक्षणेही दिसू लागली आहेत. सुरुवातीच्या काळात थोडी थंडी वाजून, हलका ताप जाणवतो. इतकंच नाही तर मळमळ आणि उल्टी ही सुद्धा सुरुवातीची लक्षणे आहेत.

जुलाब होणे हे सुद्धा लक्षण जाणवत आहे. याशिवाय चक्कर येणं आणि काही प्रकरणात ऐकायलाच कमी येणं, स्नायू दुखी (Muscle Pain), त्वचा संसर्ग( स्किन इन्फेक्शन) किंवा नजर कमी होणे ही सुद्धा कोरोनाच्या नव्या अवताराची लक्षणे आहेत.

संबंधित बातम्या   

तुम्ही जर कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलात, तर किती वेळात तुम्हाला संसर्ग होऊ शकतो?

Reality Check | स्मशानभूमीत अनेक ठिकाणी शवदाहिन्या बंद, मृतदेहांना घेऊन नातेवाईक तासंतास रांगेत, कल्याण डोंबिवलीतील भयाण वास्तव

(covid19 new Symptoms in coronavirus second wave health news)