
कोरोना साथीने संपूर्ण जगाला हादरा दिला. कोरोनावरील लसीमुळे अनेकांचे प्राण वाचल्याचे सांगितले जाते. परंतू कोरोनाची लस तयार करणारी कंपनी ॲस्ट्राझेनेका हीने ( AstraZeneca ) युकेच्या कोर्टात एक कबुली दिली आहे. या लसीच्या वापराने दुर्लभ प्रकरणात साईड इफेक्ट होतो असे धक्कादायक प्रतिज्ञापत्र कोर्टात केले आहे. ॲस्ट्राझेनेकाच्या मदतीने भारतात कोव्हीशील्ड लस तयार करण्यात आली होती. भारतात दोन अब्ज लोकांचे लसीकरण झाले आहे. त्यातील 170 कोटी लोकांना कोव्हीशील्ड लस दिली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या मनात भीतीची लकेर उमटली आहे. या प्रकरणावर तज्ज्ञांचे मत काय ? याचा घेतलेला मागोवा जोपर्यंत तज्ज्ञ व्यक्ती यासंदर्भात काही अभ्यास करुन डाटा सादर करीत नाहीत. तोपर्यंत केवळ दुर्लभ प्रकरणातच या लसीचा साईड इफेक्ट होतो अशी बोळवण सरकारने करणे योग्य नसल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. कोरोनाच्या लाटेनंतर जानेवारी 2020 मध्ये भारतात लसीकरणाला सुरुवात झाली होती. सुरुवातीला केवळ अत्यावश्यक वर्गवारीतील कर्मचारी जसे डॉक्टर, नर्स, एसटी...