AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Detox Drinks | रक्त स्वच्छ करायचं असेल तर रोज प्या हे 4 ड्रिंक्स!

लिंबाचे सेवन करण्याचा सल्ला बहुतेक आरोग्य तज्ञांकडून दिला जातो, त्यात असलेले आम्लीय गुणधर्म रक्त शुद्ध करण्यास मदत करतात. रोज एक ग्लास लिंबूपाणी प्यायल्यास रक्त स्वच्छ होईल आणि सर्व विषारी पदार्थ बाहेर पडतील.

Detox Drinks | रक्त स्वच्छ करायचं असेल तर रोज प्या हे 4 ड्रिंक्स!
detox drinks
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Aug 13, 2023 | 3:58 PM
Share

मुंबई: आपण स्वत:ला निरोगी ठेवण्यासाठी बरेच प्रयत्न करतो. आपल्या शरीरात अनेक प्रकारचे टॉक्सिन्स असतात जे काढून टाकणे खूप गरजेचे आहे, अन्यथा आपण अनेक आजारांना बळी पडू. शरीर डिटॉक्स केल्याने आपले रक्त स्वच्छ होते, रक्ताच्या साहाय्याने शरीराच्या प्रत्येक भागात ऑक्सिजन पोहोचतो, त्यामुळे प्रत्येक परिस्थितीत रक्त स्वच्छ असणे महत्वाचे आहे. चला तर मग जाणून घेऊया रक्त स्वच्छ करण्यासाठी तुम्ही कोणत्या गोष्टी खाऊ शकता.

लिंबाचे सेवन करण्याचा सल्ला बहुतेक आरोग्य तज्ञांकडून दिला जातो, त्यात असलेले आम्लीय गुणधर्म रक्त शुद्ध करण्यास मदत करतात. रोज एक ग्लास लिंबूपाणी प्यायल्यास रक्त स्वच्छ होईल आणि सर्व विषारी पदार्थ बाहेर पडतील. लिंबामध्ये व्हिटॅमिन सी देखील आढळते, जे आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते.

आले आणि गूळ चहा: आपण रोज जे दूध आणि साखर चहा पितो त्यामुळे आरोग्याला हानी पोहोचते, त्याऐवजी आले आणि गूळ चहा पिण्याची सवय लावा, यामुळे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडतात आणि रक्तही साफ होते. हे प्यायल्याने सर्दी, खोकला टाळता येते.

हिरवी कोथिंबीर आणि पुदिन्याची पाने आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात, यामुळे शरीर डिटॉक्स होते, ज्यामुळे पोटाशी संबंधित आजार कमी होतात. यासाठी हिरव्या कोथिंबीर-पुदिन्याचा हर्बल चहा तयार करून दिवसातून किमान एकदा तरी प्यावा.

भारतात बरेच लोक आपल्या अंगणात तुळशीचे रोप नक्कीच लावतात, त्याच्या पानांमध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटी-व्हायरल गुणधर्म असतात. आपण एकतर त्याची पाने धुऊन थेट चावू शकता, तसेच जर आपण दररोज तुळशीचा हर्बल चहा प्यायला तर ते शरीर डिटॉक्स करण्यास आणि रक्त साफ करण्यास मदत करेल.

(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही या वृत्ताला दुजोरा देत नाही.)

Follow Us
निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह दिलं नाही तरी... विलिनीकरणाच्या विषयावर...
निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह दिलं नाही तरी... विलिनीकरणाच्या विषयावर शरद पवारांचं मोठं विधान
सत्तेत राहण्यापेक्षा विरोधात जास्त... सुप्रिया सुळे भर मंचावरून...
सत्तेत राहण्यापेक्षा विरोधात जास्त... सुप्रिया सुळे भर मंचावरून नेमकं काय म्हणाल्या?
348 तालुके संकटात; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शरद पवारांचा सरकारला इशारा
348 तालुके संकटात; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शरद पवारांचा सरकारला इशारा, नेमकं काय म्हणाले?
अभिजीत दीपकेंवर बड्या नेत्याचा हल्लाबोल; गद्दार आणि दलितविरोधी म्हणत..
अभिजीत दीपकेंवर बड्या नेत्याचा हल्लाबोल; गद्दार आणि दलितविरोधी म्हणत केला गंभीर आरोप
सोलापुरात काँग्रेसचे ज्ञानेश कुमारांविरोधात आंदोलन, प्रणिती शिंदे...
सोलापुरात काँग्रेसचे ज्ञानेश कुमारांविरोधात आंदोलन, प्रणिती शिंदे आक्रमक
पुन्हा महिला आयोगाचं पद चर्चेत, महिला नेत्यानेच केली मोठी मागणी; थेट..
पुन्हा महिला आयोगाचं अध्यक्षपद चर्चेत, महिला नेत्यानेच केली मोठी मागणी; थेट म्हणाल्या, सहा महिने...
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे...
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे संकेत
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट..
Nagpur : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट बॅरिकेड्सवर चढले, पुतळा जाळत...
मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा
Manoj Jarange Patil : मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा, पुढे म्हणाले...
गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
Goregaon : गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...