हिवाळ्यात मधुमेहांच्या रूग्णांनी कोणते पदार्थांचे सेवन टाळावे? आहारतज्ज्ञांनी दिली यादी

हिवाळ्याच्या दिवसात लोकांच्या खाण्याच्या सवयी अनेकदा बदलतात. त्यामुळे मधुमेही रुग्णांनी त्यांच्या आहाराकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. या हंगामात मधुमेही रुग्णांनी कोणते पदार्थ टाळावेत हे आहारतज्ज्ञ यांच्याकडून जाणून घेऊयात.

हिवाळ्यात मधुमेहांच्या रूग्णांनी कोणते पदार्थांचे सेवन टाळावे? आहारतज्ज्ञांनी दिली यादी
diabetic patient food
| Edited By: | Updated on: Dec 26, 2025 | 4:19 PM

हिवाळा येताच आपण आपल्या खाण्या-पिण्याच्या सवयी बदलत असतो. थंडीमुळे भूक जास्त लागते आणि अशातच अनेकजण गरम, गोड आणि तळलेले पदार्थ अधिक प्रमाणात सेवन करत असतात. त्यातच या ऋतूमध्ये मधुमेही रुग्णांनी सावधगिरी बाळगणे खूप महत्वाचे आहे. या थंडीच्या दिवसात खाण्याकडे दुर्लक्ष केल्याने रक्तातील साखरेचे असंतुलन होऊ शकते. हिवाळ्यात काही पदार्थ मधुमेही रूग्णांच्या आरोग्यासाठी नुकसानकारक असू शकतात हे अनेकदा समजत नाही. म्हणूनच थंडीच्या दिवसात कोणते पदार्थ सेवन करणे टाळावेत हे मधुमेही रुग्णांना जाणून घेणे महत्त्वाचे ठरते.

योग्य माहिती आणि संतुलित आहार घेतल्यास हिवाळ्यातही मधुमेहावर चांगले नियंत्रण ठेवता येते . या ऋतूमध्ये मधुमेही रुग्णांनी कोणत्या आहारातील खबरदारी घ्याव्यात याबद्दल आजच्या लेखात जाणून घेऊयात.

कोणत्या गोष्टी खाऊ नयेत?

दिल्लीतील जीटीबी हॉस्पिटलमधील आहारतज्ज्ञ सांगतात की, मधुमेहाच्या रुग्णांनी हिवाळ्यात जास्त गोड पदार्थ सेवन करणे टाळावेत. गूळपासुन तयार पदार्थ, मिठाई आणि साखरेचे पदार्थ रक्तातील साखरेचे प्रमाण झपाट्याने वाढवू शकतात. शिवाय समोसे, कचोरी, पकोडे आणि बेकरी पदार्थ, रिफाइंड पीठाचे पदार्थ देखील मधुमेही रूग्णांच्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकतात.

हिवाळ्यात अनेकजण सुकामेवा जास्त प्रमाणात खातात, परंतु मधुमेह असलेल्यांनी काजू, मनुका आणि खजूर यांचे सेवन मर्यादित करावे. जास्त तळलेले आणि फास्ट फूड वजन वाढण्यास आणि साखरेची पातळी बिघडवण्यास कारणीभूत ठरू शकतात. पॅकेज्ड ज्यूस आणि कोल्ड्रिंक्स सारख्या साखरयुक्त पेयांपासून दूर राहणे देखील महत्त्वाचे आहे.

कोणत्या गोष्टी खाव्यात?

मधुमेहींनी हिवाळ्यात हंगामी हिरव्या भाज्यांचा आहारात समावेश करावा. पालक, मेथी, भोपळा आणि गाजर यासारख्या भाज्या फायदेशीर आहेत. संपूर्ण धान्य, डाळी आणि ओट्स रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत करतात.

प्रथिनांसाठी तुम्ही डाळी, कॉटेज चीज आणि दही खाऊ शकता. बदाम आणि अक्रोड देखील मर्यादित प्रमाणात खाऊ शकता. शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी आणि रक्तातील साखरेची पातळी संतुलित ठेवण्यासाठी भरपूर कोमट पाणी पिणे देखील आवश्यक आहे.

हे देखील आवश्यक आहे

  • नियमित वेळी जेवण करा.
  • थंड हवामानातही शारीरिक हालचाल सुरू ठेवा.
  • तुमच्या रक्तातील साखरेची नियमित तपासणी करा.
  • डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार डाएट प्लॅन करून त्याचे पालन करा.
  • जास्त वेळ उपाशी राहू नका.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)