AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फेकून देणं पटत नाही म्हणून शिळे अन्न खातो, पण हे पदार्थ चुकूनही नका खाऊ!

अन्न वाया जाऊ नये म्हणून आपण अनेक तासांनी किंवा दुसऱ्या दिवशी उरलेले अन्न खातो. काही लोक आळशी असतात. ते भरमसाठ प्रकारचे अन्न एकत्र शिजवतात आणि वेगवेगळ्या वेळी कमी प्रमाणात सेवन करतात, मग ते अन्न शिळं असतं. हे अन्न आरोग्यासाठी घातक असतं हे वेगळं सांगायची गरज नाही.

फेकून देणं पटत नाही म्हणून शिळे अन्न खातो, पण हे पदार्थ चुकूनही नका खाऊ!
eating stale food
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Jun 23, 2023 | 12:58 PM
Share

मुंबई: घरात जास्त लोक असतात तेव्हा अनेकदा जेवणाचा अंदाज येत नाही, कधी जेवण वाया जातं, कधीतरी आपलीच फार खायची इच्छा नसते. अन्न वाया जाऊ नये म्हणून आपण अनेक तासांनी किंवा दुसऱ्या दिवशी उरलेले अन्न खातो. काही लोक आळशी असतात. ते भरमसाठ प्रकारचे अन्न एकत्र शिजवतात आणि वेगवेगळ्या वेळी कमी प्रमाणात सेवन करतात, मग ते अन्न शिळं असतं. हे अन्न आरोग्यासाठी घातक असतं हे वेगळं सांगायची गरज नाही. पण यातही पदार्थांचे काही प्रकार असतात जे शिळे झाल्यावर अजिबातच खाऊ नये. हे खाल्ल्याने आपल्या आरोग्याचे भयानक नुकसान होऊ शकते.

तेलकट पदार्थ

भारतात स्वयंपाकाच्या तेलाचा खप खूप जास्त आहे, कारण तेलात शिजवलेले अन्न खाणाऱ्या लोकांची कमतरता नाही, असे अनेक स्वादिष्ट पदार्थ या देशात खाल्ले जातात जे अतिशय चविष्ट असतात. अनेकदा लग्नसमारंभात किंवा पार्ट्यांमध्ये आपण हे तेलकट पदार्थ पॅक करून घरी घेऊन येतो. हे पदार्थ आपण दुसऱ्या दिवशी गरम करून खातो, आपल्याकडे हे सर्रास चालतं. तेलकट पदार्थ पुन्हा गरम करून खाल्ल्याने हृदयविकाराचा धोका अनेक पटींनी वाढतो, तसेच वजन वाढण्यास ही कारणीभूत हे कारणीभूत असतं.

उकडलेले बटाटे

उकडलेले बटाटे खाण्याची आवड अनेकांना असते. मसालेदार भाज्या, भजी, बटाटा चाट आणि टिक्की अशा मिश्रित बटाट्यांपासून अनेक प्रकारच्या पाककृती बनवता येतात. विशेषत: स्ट्रीट फूडमध्ये याचा भरपूर वापर केला जातो. परंतु बाजारात जुने उकडलेले बटाटे अनेकदा ते खाण्यासाठी वापरले जातात, ज्यामुळे बटाट्याच्या आतील क्लोस्ट्रिडियम बोटुलिनम सडण्यास सुरवात होते, ज्यामुळे आपल्या पोटात गडबड होऊ शकते.

अंडी

अंडी खाणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे हे आपल्या सर्वांना माहित आहे, म्हणून विशेषत: नाश्त्यात ते खाण्याचा सल्ला दिला जातो, परंतु शिळे अंडी खाणे शहाणपणाचे नाही कारण या सुपरफूडमध्ये अनेक प्रकारचे बॅक्टेरिया असतात जे आपल्या आरोग्यास हानी पोहोचविण्यासाठी पुरेसे आहेत.

(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)

Follow Us
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी...
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी नाकारली तरी मनोज जरांगे ठाम
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना...
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना दिले महत्त्वाचे आवाहन
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही
Lalbag Cha Raja : अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही उपस्थित
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी..
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी घेतले गणपती बाप्पांचे दर्शन
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... फडणवीसांचं मराठा आंदोनलनाबाबत
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... देवेंद्र फडणवीस यांचे मराठा आरक्षणावर मोठे विधान
राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
Parag Shah | गुरूंच्या आदेशाने राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक गणेश मूर्ती