Health : आवळा खाल्ल्यावर खरंच पांढरे केस होतात का काळे? जाणून घ्या!

जर तुम्ही आवळ्याचे सेवन करत असाल तर तुमच्या केसांचा रंग सुधारण्यास मदत होते. तर काळे केस होण्यासाठी आवळ्याचा कसा वापर केला जातो आणि तो कसा प्रभावी ठरतो याबाबत आपण जाणून घेणार आहोत.

Health : आवळा खाल्ल्यावर खरंच पांढरे केस होतात का काळे? जाणून घ्या!
Follow us
| Updated on: Nov 08, 2023 | 3:15 PM

मुंबई : आजकाल बहुतेक लोकांना पांढरे केस होण्याची समस्या सतावताना दिसते. यामध्ये मग तरूण मुला-मुलींचे केसही पांढरे होताना दिसतात. वाढतं प्रदुषण, ताण-तणाव अशा अनेक गोष्टींमुळे बहुतेक लोकांचे केस पांढरे होताना दिसतात. तसंच लोक पांढऱ्या केसांपासून सुटका मिळवण्यासाठी केस कलर असतात. पण त्यांना हवा तसा रिझल्ट मिळत नाही. पण तुम्हाला माहितीये का की आवळा हा तुमच्या केसांसाठी प्रभावी ठरतो. आवळ्यामध्ये काही असे गुणधर्म आहेत जे तुमचे केस काळे करण्यास उपयोगी पडतात.

आवळा हा आपल्या केसांसाठी फायदेशीर मानला जातो. कारण आवळ्यामध्ये तांबे असते जे मेलेनिन रंगद्रव्य वाढवण्यास मदत करते. हे मेलेनिन तुमचे केस काळे करण्यास मदत करते. तसेच आवळ्यामध्ये झिंक असते व्हिटॅमिन सी असते जे आपले केस दाट आणि काळे बनवते. सोबतच केसांच्या इतर समस्यांपासून देखील सुटका मिळते. आवळ्यामुळे कोंडा दूर होतो, रक्ताभिसरण वाढते.

केसांसाठी तुम्ही दोन प्रकारे आवळ्याचा वापर करू शकता. त्यात पहिलं म्हणजे तुम्ही आवळ्याचा ज्यूस पिऊ शकता, आवळा सुपारी, कँडी खाऊ शकता. तर दुसरं म्हणजे आवळ्याचं पाणी तुम्ही तुमच्या केसांना लावा. यामुळे तुमचे केस निरोगी राहण्यास मदत होते. तसंच पांढरे केस काळे होण्यास मदत होते. त्यामुळे आवळ्याचे सेवन करणं आपल्या केसांसाठी फायदेशीर ठरते.

आवळा हा अनेक प्रकारे आपल्या केसांसाठी गुणकारी ठरतो. आवळ्यामुळे आपले केस मजबूत, सॉफ्ट, रेशमी होण्यास मदत होते. भरपूर लोकांचे केस पातळ असतात, गळत असतात. ही समस्या देखील आवळ्यामुळे नाहीशी होते. आवळ्यामुळे आपला टाळू निरोगी राहतो आणि आवळा रक्ताभिसरण गतिमान करते. त्यामुळे केसाशी संबंधित सर्व समस्या दूर होण्यासाठी आवळा खूप प्रभावी ठरतो. त्यामुळे आवळ्याचा वापर करणं खूप गरजेचं आहे.

Non Stop LIVE Update
दिशा सालियन प्रकरणात हात, शिंदे गटाच्या नेत्याचा आदित्य ठाकरेंवर आरोप
दिशा सालियन प्रकरणात हात, शिंदे गटाच्या नेत्याचा आदित्य ठाकरेंवर आरोप.
शिंदे गटाच्या आमदाराची वैभव नाईकांना पक्षप्रवेशाची थेट ऑफर; म्हणाले...
शिंदे गटाच्या आमदाराची वैभव नाईकांना पक्षप्रवेशाची थेट ऑफर; म्हणाले....
अरे ऐक रे.. शिंदे गट अन ठाकरे गटाच्या आमदारांमध्ये 'कोट'वरून जुंगलबंदी
अरे ऐक रे.. शिंदे गट अन ठाकरे गटाच्या आमदारांमध्ये 'कोट'वरून जुंगलबंदी.
जितेंद्र आव्हाड राजकारणातील राखी सावंत, कुणाची जिव्हारी लागणारी टीका?
जितेंद्र आव्हाड राजकारणातील राखी सावंत, कुणाची जिव्हारी लागणारी टीका?.
आगामी निवडणुकीच्या तोंडावर आमदारांना भरमसाठ निधी, एकाला किती कोटी?
आगामी निवडणुकीच्या तोंडावर आमदारांना भरमसाठ निधी, एकाला किती कोटी?.
दिशा सालियान प्रकरण नेमकं काय? आदित्य ठाकरेंशी का लावलं जातंय कनेक्शन?
दिशा सालियान प्रकरण नेमकं काय? आदित्य ठाकरेंशी का लावलं जातंय कनेक्शन?.
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी होणार SIT चौकशी?
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी होणार SIT चौकशी?.
आव्हाडांना दणका,विधानभवन परिसरातील NCP च्या कार्यालयाची नेमप्लेट हटवली
आव्हाडांना दणका,विधानभवन परिसरातील NCP च्या कार्यालयाची नेमप्लेट हटवली.
वाढलेली ढेरी, अजितदादा आणि आव्हाड यांच्यात पोटसूड, काय केली टीका?
वाढलेली ढेरी, अजितदादा आणि आव्हाड यांच्यात पोटसूड, काय केली टीका?.
गळ्यात संत्र्यांची माळ अन निषेध; बळीराजाच्या प्रश्नावरून विरोधक आक्रमक
गळ्यात संत्र्यांची माळ अन निषेध; बळीराजाच्या प्रश्नावरून विरोधक आक्रमक.