AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health : जर अर्ध्या रात्री कान दुखायला लागला तर घाबरू नका, करा हे घरगुती उपाय

अचानक रात्रीच्या वेळी कान दुखायला लागल्यानंतर पहिल्यांदा नेमकं करायचं काय? असा प्रश्न बहुतेक लोकांना पडतो. तर आता आपण काही अशा सोप्या घरगुती उपायांबाबत जाणून घेणार आहोत ज्यामुळे तुमचा कान दुखायचा कमी होईल.

Health : जर अर्ध्या रात्री कान दुखायला लागला तर घाबरू नका, करा हे घरगुती उपाय
Image Credit source: प्रातिनिधीक फोटो
| Updated on: Dec 11, 2023 | 9:41 PM
Share

मुंबई : बहुतेक वेळा आपण झोपलो की रात्री अचानक आपला कान दुखू लागतो. कान दुखल्यामुळे आपल्याला असह्य वेदना होतात, काही सुचत नाही. तसेच नीट झोप देखील लागत नाही. त्यात कान दुखल्यामुळे बहुतेक लोकांना ताप येणे, चिडचिड होणे किंवा कमी ऐकायला येणे अशा अनेक समस्या होताना दिसतात. त्यात कानातून घाण पाणी देखील निघते. तर कधी कधी कान दुखल्यामुळे आपला कान देखील समजतो.

कांदा – जर तुमचा रात्री अचानक कान दुखायला लागला तर कांद्याचा वापर करा. कांद्यामुळे तुमची कानदुखी कमी होण्यास मदत होईल. तर यासाठी एक चमचा कांद्याचा रस करून घ्या. कांद्याचा रस कोमट करून त्याचे दोन ते तीन थेंब तुमच्या कानात टाका. असं तुम्ही दिवसातून दोन ते तीन वेळा केल्यामुळे तुमच्या कानाला आराम मिळेल आणि तुमची कानदुखी देखील बंद होईल.

लसूण- तुमचा कान दुखत असेल तर कान दुखी कमी करण्यासाठी लसूण प्रभावी ठरतो. यासाठी लसणाचे दोन तुकडे घ्या आणि ते ठेचा.  लसणाचे तुकडे दोन चमचे मोहरीचे तेल घेऊन त्यामध्ये शिजवा. मग हे तयार झालेले तेल थोडा वेळ थंड होण्यास ठेवा, ते कोमट झाले की त्याचे एक ते दोन थेंब तुमच्या कानात टाका. यामुळे तुमची कान दुखी कमी होण्यास मदत होईल आणि तुमच्या कानाला आराम मिळेल.

मोहरीचे तेल – तुमचा कान अचानक रात्री दुखायला लागला तर कानात मोहरीचे तेल टाका. मोहरीच्या तेलामुळे तुमचा कान दुखायचा कमी होईल. यासाठी तुमच्या कानामध्ये मोहरीच्या तेलाचे दोन ते तीन थेंब टाका आणि ते दहा ते पंधरा मिनिटे तसेच ठेवा. यामुळे तुमचा कान दुखायचा बंद होईल.

पेपरमिंट – जर तुमचा कान दुखत असेल तर पेपरमिंटचा वापर करा. यासाठी पुदिन्याची पाने घेऊन त्याचा रस तयार करा आणि या पुदिनाच्या पानांचा रस घेऊन त्याचे एक ते दोन थेंब तुमच्या कानात टाका. यामुळे तुमच्या कानाला आराम मिळण्यास मदत होईल.

त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य.
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक.
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे.
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.