Health : कमी पाणी प्यायल्याने कोलेस्ट्रॉल वाढते का? जाणून घ्या
जर तुम्ही कमी पाणी पिलं तर त्याचा तुमच्या हृदयावर परिणाम होऊ शकतो. कमी पाणी पिल्यामुळे तुमचा रक्तदाब उच्च होऊन हृदयविकार झपाट्याने वाढण्याची शक्यता असते.

मुंबई : आपले हृदयाचे आरोग्य हे आपल्या आहारावर अवलंबून असते. आपण काय खातो काय पितो यावर आपल्या हृदयाचे आरोग्य निरोगी राहते. पण आपली जीवनशैली आणि आहार योग्य नसेल तर त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. त्यामुळे हृदयाशी संबंधित समस्यांचा आपल्याला सामना करावा लागू शकतो. तसंच योग्य आहारासोबतच पाणी पिणे शरीरासाठी खूप गरजेचं असतं.
डॉक्टरसुद्धा प्रत्येकाला नेहमी पाणी पिण्याचा सल्ला देतात. पाणी पिल्यामुळे आपले शरीर नेहमी हायड्रेट आणि निरोगी राहते. पण जर तुम्ही कमी पाणी पिलं तर त्याचा तुमच्या हृदयावर परिणाम होऊ शकतो. कमी पाणी पिल्यामुळे तुमचा रक्तदाब उच्च होऊन हृदयविकार झपाट्याने वाढण्याची शक्यता असते.
हृदयाचे आरोग्य निरोगी ठेवायचे असेल तर पाणी पिणे गरजेचे आहे. कारण पाणी हे आपल्या हृदयाच्या कार्याला चालना देते. तसंच पाणी हे हृदयाच्या सर्व कक्षांना निरोगी ठेवते, रक्त परिसंचरण सुधारते, ऑक्सिजनचे परिसंचारण वाढवते. या सर्व गोष्टींमुळे आपल्या हृदयाचे आरोग्य निरोगी राहते आणि हृदयविकाराचा धोकाही कमी होतो.
जर तुम्ही कमी पाणी पिले तर त्याचा परिणाम तुमच्या कोलेस्टेरॉलच्या पातळीवर होतो. कारण पाणी हे एक डिटॉक्सिफायिंग एजंट आहे जे कोलेस्टेरॉल पातळीव वाढवते. तसंच पाणी कमी पिल्यामुळे डीहायड्रेशन होते आणि डीहायड्रेशनमुळे आपले लिव्हर रक्तामध्ये अधिक कोलेस्टेरॉल सोडते. त्यामुळे रक्तातील कोलेस्टेरॉल झपाट्याने वाढते आणि हृदयविकाराचा धोका निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रत्येकाने दररोज पाणी पिणे गरजेचे आहे.
