AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सकाळच्या वेळेस चहा की ब्लॅक कॉफी पिणं ठरेल आरोग्यासाठी फायदेशीर

आपल्यापैकी अनेकजणांना सकाळी उठल्या उठल्या चहा किंवा कॉफी पिण्याची सवय असते. चहाच्या एका दिवसाची सुरूवात उत्तम होते. पण आजच्या लेखात आपण सकाळी उठल्यावर चहा की ब्लॅक कॉफी या पैकी कोणतं पिणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल ते आजच्या लेखात जाणून घेऊयात.

सकाळच्या वेळेस चहा की ब्लॅक कॉफी पिणं ठरेल आरोग्यासाठी फायदेशीर
| Edited By: | Updated on: Jan 30, 2026 | 2:11 PM
Share

आपल्या देशात अनेक लोकांची सकाळची सुरूवात चहा किंवा कॉफीच्या कपानेच होते. कारण बहुतांश उठल्यावर गरम गरम चहा लागतो, तर काहीना कॉफीने सुरूवात करतात. पण अशावेळेस काहींच्या मनाला प्रश्न पडतो की चहा की कॉफी नेमकी कोणतं पेयं आरोग्यासाठी जास्त चांगलं आहे. मात्र काही तज्ञ कॉफीला चहापेक्षा आरोग्यदायी मानतात, तर काही तज्ञांच्या मते विशेषतः हर्बल चहा हे पेय आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. तथापि आजकाल तज्ञ ब्लॅक कॉफीला चहापेक्षा चांगले मानतात. ब्लॅक कॉफी चहापेक्षा चांगली का आहे आणि ब्लॅक कॉफी पिण्याचे शरीरावर कोणते फायदे होतात ते आजच्या लेखात आपण जाणून घेऊयात.

चहा असो किंवा ब्लॅक कॉफी जर तुम्ही सकाळी उठून यापैकी एक पेय प्यायलात तर त्यांच्यातील खरा फरक समजून घेणे महत्त्वाचे आहे. कारण चहा आणि ब्लॅक कॉफीमधील सर्वात मोठा फरक म्हणजे त्यात असलेल्या कॅफिनचे प्रमाण. एका कप ब्लॅक कॉफीमध्ये अंदाजे 90 ते 100 मिलीग्राम कॅफिन असते. त्याच प्रमाणात ब्लॅक टीमध्ये फक्त 25-50 मिलीग्राम कॅफिन असते. कॅफिनचे हे जास्त प्रमाण ब्लॅक कॉफीला अधिक ऊर्जा देणारे पेय बनवते.

जेव्हा तुम्ही सकाळी उठता आणि चहा किंवा ब्लॅक टीऐवजी ब्लॅक कॉफी पिता तेव्हा ते मेंदूची क्रियाशीलता वाढवते. कॅफिन मज्जासंस्था सक्रिय करते, ऊर्जा प्रदान करते. यामुळे तुम्हाला लक्ष केंद्रित करणे, लक्ष देणे आणि काम करण्याची क्षमता सुधारते. तुम्ही ऑफिसला जा किंवा सकाळी अभ्यास करा, योग्य प्रमाणात ब्लॅक कॉफी प्या, कारण ते तुम्हाला चहापेक्षा शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अधिक सक्रिय ठेवेल.

वजन नियंत्रित करण्यासाठी ब्लॅक कॉफी देखील प्रभावी ठरू शकते. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर ब्लॅक कॉफी प्या. त्यात कॅलरीजचे प्रमाण खूप कमी असतात. साखर किंवा दुधाशिवाय सेवन ब्लॅक कॉफी प्यायलास शरीरातील चयापचय वाढवते आणि फॅट बर्न करण्याच्या प्रक्रियेत देखील मदत करते. साखर आणि दूधपासून तयार केलेल्या चहाचे सेवन केल्याने सहसा शरीरातील कॅलरीज वाढतात.

ब्लॅक कॉफीमध्ये पॉलीफेनॉल आणि क्लोरोजेनिक ॲसिडसारखे अँटीऑक्सिडंट्स असतात. हे शरीरातील जळजळ कमी करतात आणि हृदयरोग आणि मधुमेहासारख्या दीर्घकालीन आरोग्य समस्यांचा धोका कमी करण्यास मदत करतात. चहामध्ये अँटीऑक्सिडंट्स देखील असतात, परंतु कॉफीमधील संयुगे अधिक वैविध्यपूर्ण असतात.

स्मरणशक्ती आणि मेंदूच्या आरोग्यासाठी ब्लॅक कॉफी अधिक फायदेशीर आहे. अनेक अभ्यासातून असे दिसून आले आहे की दररोज ब्लॅक कॉफी प्यायल्याने स्मरणशक्ती सुधारते. त्यामुळे अल्झायमर आणि पार्किन्सन सारख्या मज्जातंतूंशी संबंधित आजारांचा धोका देखील कमी होऊ शकतो. चहा मेंदूसाठी देखील फायदेशीर आहे, परंतु ब्लॅक कॉफीचे परिणाम अधिक स्पष्ट आहेत.

जी लोकं नियमितपणे व्यायाम करण्यासाठी जिममध्ये जातात. व्यायाम करतात किंवा खेळाडू आहेत त्यांच्यासाठी ब्लॅक कॉफी खूप फायदेशीर आहे. व्यायामापूर्वी ब्लॅक कॉफी प्यायल्याने शरीरात अॅड्रेनालाईन वाढते, ज्यामुळे ताकद आणि सहनशक्ती सुधारते. यामुळे तुम्ही जास्त वेळ आणि अधिक प्रभावीपणे व्यायाम करू शकता.

ब्लॅक कॉफी पिण्याचा आरोग्यदायी मार्ग

खऱ्या कॉफी बीन्सपासून बनवलेली ब्लॅक कॉफी सर्वोत्तम आहे. तर कॉफी बनवताना साखर, क्रीमर किंवा कृत्रिम फ्लेवर्स मिक्स करणे टाळा, कारण हे आरोग्यदायी असतात. चवीसाठी थोडीशी दालचिनी मिक्स करणे योग्य आहे. जर कमी प्रमाणात सेवन केले तर ब्लॅक कॉफी हे एक उत्कृष्ट पेय आहे ज्यामध्ये चहापेक्षाही जास्त फायदे आहेत.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
पुण्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! चटणी-भाकरी खाऊन सरकारचा...
पुण्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! चटणी-भाकरी खाऊन सरकारचा निषेध, शेतकऱ्यांसाठी अनुदानाची मागणी
सिलसिला बैठकांचा निर्णय विलीनीकरणाचा? पार्थ पवारांची पुन्हा एकदा...
NCP Merger : सिलसिला बैठकांचा निर्णय विलीनीकरणाचा? पार्थ पवारांची पुन्हा एकदा सिल्व्हर ओकवर बैठक
दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकर...
Omraje Nimbalkar : दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकरांचं मोठं विधान
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय...
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय म्हणाले?
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी;
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी; हर हर महादेवचा जयघोष!
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर...
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर निर्णयांची Inside Story
नाशिक TCS प्रकरणात मोठी अपडेट! इम्तियाज जलील, मतीन पटेल यांच्यासह...
नाशिक TCS प्रकरणात मोठी अपडेट! इम्तियाज जलील, मतीन पटेल यांच्यासह 11 जणांविरोधात पुरवणी दोषारोपपत्र दाखल
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल...
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल वापरण्याची...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत कशी साजरी होणार दिवाळी?
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी...
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी गेले असताना शेतकऱ्यान मांडली व्यथा