
थंडीच्या दिवसांमध्ये अनेकांच्या घरी एक पदार्थ तयार केला जातो, तो पदार्थ म्हणजे मेथीचे लाडू… सांगायचं झालं तर, मेथी उत्तर भारतातील एक लोकप्रिय पदार्थ आहेत. कारण थंडीचं वातावरण त्याठिकाणी नेहमीच असतं म्हणून लाडू बनवलं जातात. तर मेथीचे लाडू बनवण्याची सोपी पद्धत आपण आज जाणून घेऊ… मेथीसाठी लागणारे साहित्य बाजारात मिळतात… एकाच दुकाणात देखील तुम्हाला सर्व साहित्य मिळेल… मेथीचे लाडू हे एक पौष्टिक आणि ऊर्जा देणारे पदार्थ आहेत.
मेथीचे लाडू बनवण्यासाठी मेथी दाणे – ½ कप गव्हाचे पीठ – 2 कप, तूप – 1 ते 1¼ कप (गरजेनुसार), गूळ – 1½ कप, किसलेले खोबरे – ½ कप, बदाम – ¼ कप, काजू – ¼ कप, खारीक/सुक्या खजूराची पूड – ½ कप (पर्यायी पण चविष्ट), खसखस – 2 टेबलस्पून (पर्यायी), सुंठ पावडर – 1 टीस्पून, जायफळ/वेलची पूड – 1 टीस्पून हे साहित्य लागतात.
सर्वात आधी मेथीचे दाणे भाजून घ्या.. मेथी दाणे मंद आचेवर हलके सोनेरी होईपर्यंत भाजून थंड करा. त्यानंतर थंड झालेल्या दाण्यांची मऊ पूड तयार करा. कढईत 3–4 टेबलस्पून तूप गरम करून गव्हाचे पीठ छान खमंग व रंग बदलू लागेपर्यंत भाजा.
त्यानंतर किसलेले खोबरे आणि सुका मेवा भाजूण घ्या. थोड्या तुपात खोबरे, बदाम, काजू वेगवेगळे हलके भाजून बाजूला ठेवा. भाजलेल्या गव्हाच्या पिठात मेथीची पूड, खारीक पूड, सुका मेवा, सुंठ व वेलची/जायफळ मिसळा…
त्यानंतर एका भांड्यात थोडे तूप घालून गूळ मंद आचेवर फक्त वितळवा गुळाचा पाक करू नका. सगळे मिश्रण एकजीव करुन घ्या. वितळलेला गूळ गव्हाचे-मेथीचे मिश्रणात घालून नीट हाताने एकजीव करा. मिश्रण घट्ट वाटल्यास थोडे गरम तूप वाढवू शकता. मिश्रण कोमट असताना हाताने लाडू वळा. थंड झाल्यावर एअरटाइट बॉक्समध्ये ठेवा.
मेथीमध्ये कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम आणि अँटिऑक्सिडंट्स असतात. मेथीचे लाडू शरीरात उष्णता निर्माण करतात. त्यामुळे थंडीमुळे होणारा त्रास, कमजोरी, गारवा कमी करण्यात मदत होऊ शकते. मेथी, खारिक, सुका मेवा, तुप यांमुळे शरीराला ताकद मिळते आणि प्रसूतीनंतर कमजोरी कमी करण्यास मदत होते… असं देखील मानलं जातं.