AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘हे’ 5 पदार्थ तूमच्या शरीरात पाण्याची कमतरता निर्माण करतात, जाणून घ्या

आपल्या शरीरासाठी पाणी खूप महत्वाचे आहे. कारण जेव्हा पाण्याची कमतरता असते तेव्हा तुम्हाला डिहायड्रेशनची समस्या उद्भवू शकते. म्हणूनच नेहमी डॉक्टर आपल्याला भरपूर पाणी पिण्याचा सल्ला देतात. तर हायड्रेटेड राहण्यासाठी पाणी पिणे पुरेसे नसते. त्यामुळे आपण आपल्या जीवनशैली आणि आहाराकडे लक्ष दिले पाहिजे. चला तर मग जाणून घेऊया कोणते पदार्थ चुकूनही खाऊ नयेत जेणेकरून डिहायड्रेशनची समस्या उद्भवणार नाही.

'हे' 5 पदार्थ तूमच्या शरीरात पाण्याची कमतरता निर्माण करतात, जाणून घ्या
| Edited By: | Updated on: Jun 30, 2025 | 7:14 PM
Share

बऱ्याचदा आपण आपल्या आहाराकडे लक्ष देत नाही ज्यामुळे आपल्याला डिहायड्रेशनची समस्या येते आणि नंतर चक्कर येणे आणि अशक्तपणा यासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते. असे बहुतेकदा उन्हाळ्यात घडते जेव्हा शरीरात पाण्याची कमतरता असते. उन्हाळ्यात शरीरात पाण्याची कमतरता असणे सामान्य आहे. तर यावेळी ज्येष्ठ वैद्य डॉ. कमलजीत सिंह कैंथ यांनी सांगितले की, उन्हाळ्यात घामाद्वारे शरीरातून पाणी बाहेर पडत राहते. शरीराचे तापमान नियंत्रित करण्यासाठी पुरेशा प्रमाणात पाण्याची आवश्यकता असते, परंतु जेव्हा पाण्याची कमतरता असते तेव्हा डिहायड्रेशनचा धोका वाढतो. तुम्हाला माहिती आहे का की असे काही अन्नपदार्थ आहेत ज्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते? उन्हाळ्यात कोणत्या गोष्टी तुम्ही कमी प्रमाणात खाव्यात किंवा प्याव्यात हे जाणून घ्या.

1. उन्हाळ्यात मसालेदार पदार्थ टाळावेत. कारण त्यात अतिरिक्त तेल असते ज्यामुळे वारंवार तहान लागते आणि मसालेदार पदार्थांमध्ये कॅप्सेसिन देखील असते जे तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकते. यामुळे तुम्हाला डिहायड्रेशन होऊ शकते.

2. उन्हाळ्यात फास्ट फूडचे सेवन करू नये. बर्गर, समोसे आणि फ्रेंच फ्राईजसारखे तळलेले पदार्थ खाऊ नयेत. कारण हे तेलकट पदार्थ असतात आणि त्यात मीठाचे प्रमाणही जास्त असते, ज्यामुळे डिहायड्रेशनची समस्या वाढते.

3. उन्हाळ्यात तहान खूप लागत असते. तर अनेकजण तहान भागवण्यासाठी थंडगार कोल्ड्रिंक्स पित असतात. अशातच हे सॉफ्ट ड्रिंक्स शरीराला थंड करतात पण त्यात भरपूर साखर असते, ज्यामुळे ते प्यायल्यानंतरही तहान लागते आणि शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते.

4. ऋतू कोणताही असो बहुतेक लोकांना कॉफी प्यायला खूप आवडते कारण कॉफीच्या सेवनाने थकवा आणि आळस दूर करण्यास मदत होते. परंतु जास्त प्रमाणात कॉफीचे सेवन केल्याने तुमच्या शरीरात डिहायड्रेशनची समस्या निर्माण होऊ शकते आणि शरीराचे तापमान देखील वाढू शकते, ज्यामुळे अपचन देखील होऊ शकते.

5. आपल्या निरोगी आरोग्यासाठी जरी सुका मेवा खूप फायदेशीर असला तरी उन्हाळ्यात सुकामेवा खाणे टाळले पाहिजेत. कारण या सुकामेव्यांचा स्वरूपही उष्ण असतो ज्यामुळे शरीराचे तापमान वाढू शकते आणि शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होऊ शकते.

6. ग्रीन टी ला खूप चांगले आणि हेल्दी ड्रिंक म्हणतात. कारण यात अँटीऑक्सिडंट्स असतात जे शरीर निरोगी ठेवण्याचे काम करतात, परंतु तूम्हाला माहित आहे का की हे ग्रीन टी च्या अति सेवनाने आपले शरीर डिहायड्रेट होते. त्यामुळे ग्रीन टीचे सेवन कमी केले पाहिजे. कारण ते आपल्या शरीरातील पाणी शोषून घेते.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल.
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी.
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.