दीर्घायुषी आणि आनंदी जगायचे आहे तर या टिप्स फॉलो करा

| Updated on: Jan 21, 2024 | 12:39 PM

जर तुम्हाला दीर्घायुषी व्हायचे असेल तर आपल्या लाईफस्टाईलमध्ये काही बदल करावे लागतील. हे बदल तुम्हाला फिट आणि आनंदी करण्यास मदत करतील. त्यामुळे तुमच्या आयुष्यातील काही वर्षे नक्कीच वाढतील. रोज व्यायाम करण्याबरोबर अजून काही करता येईल का ते पाहूयात...

दीर्घायुषी आणि आनंदी जगायचे आहे तर या टिप्स फॉलो करा
happy life
Image Credit source: TV9MARATHI
Follow us on

मुंबई | 21 जानेवारी 2024 : आनंदी जगणे आपल्या हातात असते. काही लोकांना आपण पहातो त्यांच्या चेहऱ्यावरुन त्यांच्या वयाचा आपल्याला अंदाज येत नाही. त्यांच्या सळसळता उत्साह तरुणांना लाजवणारा असतो. तणावापासून दूर राहून आपण आपल्या आयुष्य वाढवू शकतो. परंतू हा एकमेव उपाय नाही आणखी देखील काही गोष्टी आपल्याला करायला लागतात. त्यामुळे आपले आयुष्य वाढते आणि आनंदी जीवन जगता येते. जर तुम्हालाही आनंदी आयुष्य जगायचे आहे तर काही टिप्स पाहूयात…

1 ) हलक्या फुलक्या एक्टीविटी करा

रोज थोडी बहुत फिजिकल एक्टीविटी केल्याने आपण केवळ फिट न राहता आपले वय देखील वाढू शकते असे संशोधनातून स्पष्ट झाले आहे. मग आपण लिफ्टचा वापर न करता जिने चढू आणि उतरू शकतो. बागकाम करु शकतो. थोडावेळ मोकळ्या हवेत फिरायला जाऊ शकतो. योगासने करु शकतो. फिजिकल एक्टीविटी वाढत्या वयात होणाऱ्या आजारापासून आपल्याला दूर ठेवू शकतात.

2 ) सोशली एक्टीव्ह राहा

जे लोक सोशली एक्टीव्ह राहतात, ते इतरांपेक्षा दीर्घाषुयी आणि आनंदी जीवन जगतात. त्यामुळे कुटुंब, मित्र परिवार आणि नातलगांसोबत वेळ घालवा. जर खूपच बिझी असाल तर आठवड्यातून त्यांच्या एक दोन वेळा बोलावे.

3) ताण-तणावापासून दूर राहा

काम, जबाबदारी, कुटुंब, तब्येत आणि इतरही काही घटक आपला ताण वाढविण्यासाठी जबाबदार असतात. परंतू तुम्हाला बॉडी तुमच्या बॉडी आणि माईंडला हेल्दी राखयाचे असेल तर तणावापासून दूर राहाण्याच्या उपायांकडे लक्ष द्यावे. वरील दोन्ही उपाय ताणतणाव कमी करण्यास मदत करतील.

4 ) मेंदूला सतत बिझी ठेवा

जर तुम्हाला चांगले दीर्घायुषी व्हायचे असेल तर आपल्या मनाला सतत कशात तरी गुंतवा. मेंदू एक्टीव रहाण्यासाठी नवनवीन गोष्टी शिका. नवीन भाषा, नवीन इंस्ट्रमेंट, माइंड गेम्स अशा सारख्या कोणत्याही गोष्टी शिका.

5 )  स्वत:ला आनंदी ठेवा

ज्या गोष्टी केल्याने तुम्हाला आनंद वाटतो त्यासाठी वेळ काढा.यामुळे शरीरात हॅप्पी हार्मोन्स रिलीज होतात. ज्यामुळे ताणतणाव दूर होतो. आतून आनंदी असलेला व्यक्ती दीर्घायुषी होतो.