Health Tips : 35 व्या वर्षानंतर कमकुवत होतात हाडं ! हेल्दी राहण्यासाठी महिलांनी करावेत हे उपाय…

वयाच्या 35 व्या वर्षानंतर हाडांमध्ये वेदना होणे किंवा ती कमकुवत होणे, असा त्रास बहुतांश लोकांना होतो. 35 व्या वर्षानंतरही महिला फिट अँड फाइन कशा राहू शकतात, ते जाणून घेऊया.

Health Tips : 35 व्या वर्षानंतर कमकुवत होतात हाडं ! हेल्दी राहण्यासाठी महिलांनी करावेत हे उपाय...
Follow us
| Updated on: Jul 25, 2023 | 7:39 PM

नवी दिल्ली | 25 जुलै 2023 : आजकाल भारतातील बहुतांश महिलांना 35 वर्षांचा टप्पा ओलांडताच कमकुवत हाडांच्या ( weak bones) समस्येचा सामना करावा लागतो. एक काळ असा होता की म्हातरपणी सांधेदुखी किंवा हाडांशी संबंधित समस्या उद्भवत असतं. पण आताची परिस्थिती खूपच बदलली आहे. महिला असोत किंवा पुरुष, आजकाल प्रत्येकाला वयाच्या ३० व्या वर्षांनंतर आरोग्याच्या अनेक समस्या सहन कराव्या लागतात. विशेषत: 35 व्या वर्षांनंतर महिलांना हाडं दुखणे किंवा हाडं कमकुवत होणं यासारख्या दुखण्यांना सामोरं जावं लागतं.

बिझी लाइफ आणि खाण्या पिण्याच्या चुकीच्या सवयी, पौष्टिक अन्नाचा अभाव यामुळे हा त्रास होऊ शकतो. 35 व्या वर्षानंतरही महिला फिट अँड फाइन कशा राहू शकतात, ते जाणून घेऊया.

कॅल्शिअम युक्त पदार्थ

आपल्या शरीरात कॅल्शिअमची कमतरता असेल तर त्यामुळे हाडं झपाट्याने कमकुवत होऊ शकतात. ती हाडं मजबूत करण्यासाठी अथवा ती निरोगी रहावीत यासाठी ज्यामध्ये कॅल्शिअम जास्त असेल अशा पदार्थांचे सेवन केले पाहिजे. दूध, चीज यांसारख्या दुग्धजन्य पदार्थांनी कॅल्शिअमच्या कमतरतेवर मात करता येते.

पालकाचे पदार्थ

पालक हा आयर्न अर्थात लोहाचा उत्तम स्त्रोत मानला जातो. त्यामुळे हाडांसाठीही पावकाचे सेवन फायदेशीर असते. नियमितपणे पालकाचे सेवन केल्यास शरीरातील रक्ताची कमतरताही दूर होते आणि त्याचा फायदा हाडांना होतो. पालकाची भाजी, सूप, पराठे किंवा ज्यूस या स्वरूपात तुम्ही पालकाचे सेवन करू शकता.

आलू बुखार

आलू बुखार हे असे फळ आहे जे खाल्ल्याने शरीरातील ऑस्टिओपोरोसिसचा धोका कमी होतो. हा हाडांशी संबंधित आजार आहे जो खूप त्रास देऊ शकतो. आलू बुखार थेट खाणे चांगले असते अथवा तुम्ही त्याचा रसही पिऊ शकता.

दही ठरते फायदेशीर

दही हे चविष्ट तर असतेच पण हेल्दीही असते. दिवसभरात एकदा तरी दह्याचे सेवन केले पाहिजे. त्यामध्ये हाडांसाठी महत्वाचे असलेले कॅल्शिअम मोठ्या प्रमाणात असते. तसेच पोठासाठीही दह्याचे सेवन उत्तम असते.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Non Stop LIVE Update
मी निष्क्रिय खासदार मग मोदींची...ओमराजे यांचा पंतप्रधानांवर निशाणा काय
मी निष्क्रिय खासदार मग मोदींची...ओमराजे यांचा पंतप्रधानांवर निशाणा काय.
डोंबिवलीत उद्धव ठाकरे गटाला खिंडार, शहरप्रमुखच हाती घेणार धनुष्यबाण
डोंबिवलीत उद्धव ठाकरे गटाला खिंडार, शहरप्रमुखच हाती घेणार धनुष्यबाण.
राज्याचे महानालायक उद्धव ठाकरे, भाजपच्या बड्या नेत्यानं काढली लायकी
राज्याचे महानालायक उद्धव ठाकरे, भाजपच्या बड्या नेत्यानं काढली लायकी.
खैरेंच्या 'त्या' वक्तव्यावरून शिरसाटांचा निशाणा तर दानवेंचा पलटवार काय
खैरेंच्या 'त्या' वक्तव्यावरून शिरसाटांचा निशाणा तर दानवेंचा पलटवार काय.
लोकसभेचं तिकीट मिळताच रवींद्र वायकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
लोकसभेचं तिकीट मिळताच रवींद्र वायकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
सुप्रिया सुळेंचा 'हा' लकी नंबर, प्रत्येक भाषणातून होतोय वारंवार उल्लेख
सुप्रिया सुळेंचा 'हा' लकी नंबर, प्रत्येक भाषणातून होतोय वारंवार उल्लेख.
हे मटण खाणारे ब्राम्हण, देवेंद्र फडणवीसांवर कुणाचा निशाणा?
हे मटण खाणारे ब्राम्हण, देवेंद्र फडणवीसांवर कुणाचा निशाणा?.
भुताटकी, आत्मा, ढोंग आणि बरंच काही..., राऊतांचा मोदींवर हल्लाबोल काय?
भुताटकी, आत्मा, ढोंग आणि बरंच काही..., राऊतांचा मोदींवर हल्लाबोल काय?.
कॉलर उडवताना सकाळ की संध्याकाळ पहावं..., शरद पवारांचा उदयनराजेंना टोला
कॉलर उडवताना सकाळ की संध्याकाळ पहावं..., शरद पवारांचा उदयनराजेंना टोला.
ते टरबूज उन्हाळ्यात तरी कामी येतं, पण हे ..., ठाकरेंची फडणवीसांवर टीका
ते टरबूज उन्हाळ्यात तरी कामी येतं, पण हे ..., ठाकरेंची फडणवीसांवर टीका.