चांगल्या सवयी आणि ‘निरोगी जीवनशैली’ स्विकारल्याने टळू शकतो ‘अल्झायमर रोग’ चा धोका.. जाणून घ्या, सुदृढ आरोग्याचे सात कानमंत्र!

अनुवांशिक जोखीम असलेल्या लोकांमध्ये स्मृतीभ्रंशाच्या धोका अधिक असतो. असे असले तरी, तुम्ही निरोगी जिवनशैली स्विकारल्यास, हा धोका कमी होतो. ‘अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोलॉजी’ च्या नवीन संशोधनानुसार, स्मृतीभ्रंशाचा त्रास कमी करण्यासाठी काही महत्वाच्या बाबींवर प्रकाश टाकण्यात आला आहे.

चांगल्या सवयी आणि ‘निरोगी जीवनशैली’ स्विकारल्याने टळू शकतो ‘अल्झायमर रोग’ चा धोका.. जाणून घ्या, सुदृढ आरोग्याचे सात कानमंत्र!
‘अल्झायमर रोग’ चा धोका.. जाणून घ्या, सुदृढ आरोग्याचे सात कानमंत्र!
Image Credit source: facebook
| Updated on: Jun 15, 2022 | 7:18 PM

‘अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोलॉजी’ च्या नवीन संशोधनात, अल्झायमर रोग म्हणजेच ‘अनुवांशिक स्मृतिभंश’ आजारावर काही गोष्टी स्पष्ट करण्यात आल्या आहेत. संशोधकांनी यात, जीवनशैलीतील (Lifestyle) सात निरोगी सवयी (Healthy Habits) व्यक्तींमध्ये स्मृतिभ्रंश होण्याचे प्रमाण कमी करण्यात महत्वाची भूमिका बजावू शकत असल्याचे सांगीतले आहे. सदर संशोधनाचे निष्कर्ष ‘न्यूरोलॉजी’ जर्नलमध्ये प्राकाशित झाले असून, यात सुदृढ आरोग्याचे ‘सात कानमंत्र’ सांगण्यात आले आहेत. ‘अमेरिकन हार्ट असोसिएशन’ ने, ‘लाइफ्स सिंपल 7’ म्हणून ओळखले जाणारे कानमंत्र सांगितले आहेत, ज्यामुळे हृदय व मेंदूचे आरोग्य निरोगी राहते आणि अनुवंशिक स्मृतिभंशासारखे आजारही बरे होण्यास मदत होते. ‘लाइफ्स सिंपल 7’ मध्ये, व्यक्तीने सक्रिय असणे, चांगले खाणे, वजन कमी करणे, धूम्रपान न करणे (No Smoking), रक्तदाब नियंत्रणात ठेवने, कोलेस्ट्रॉल नियंत्रित करणे आणि रक्तातील साखर कमी करणे या गोष्टींचा समावेश आहे.

स्विकारा आरोग्यदायी जीवनशैली

‘लाइफ्स सिंपल 7’ मधील या आरोग्यदायी सवयींचा संबंध स्मृतिभ्रंशाच्या कमी जोखमीशी जोडला गेला आहे, परंतु उच्च अनुवांशिक जोखीम असलेल्या लोकांना हे लागू होते की नाही हे अनिश्चित असल्याचे, मिसिसिपी विद्यापीठातील जेष्ठ लेखक अॅड्रिएन टिन, पीएचडी यांनी सांगितले. दरम्यान, आरोग्यदायी जिवनशैली स्विकारल्यानंतर स्मृतिभ्रंशाचा धोका कमी असण्याची शक्यता अधिक असल्याचे सांगण्यात आले आहे. “या अभ्यासात युरोपीय वंशाच्या 8,823 लोकांचा आणि आफ्रिकन वंशाच्या 2,738 लोकांचे 30 वर्षातील जिवनशैलीचा अभ्यास करण्यात आला होता. अभ्यासाच्या सुरुवातीला लोकांचे सरासरी वय 54 होते. यात, तीस वयाच्या वरील लोकांना स्मृतिभंशाचा त्रास अधिक असल्याचे समोर आले आहे.

युरोप आणि अफ्रिकेच्या लोकांवर केले संशोधन

अभ्यासात सहभागींनी सर्व सात आरोग्य घटकांमध्ये त्यांची पातळी नोंदवली. संशोधकांनी अभ्यासाच्या सुरूवातीला अलझायमर रोगाची जीनोम-विस्तृत आकडेवारी वापरून अनुवांशिक जोखीम गुणांची गणना केली, ज्याचा उपयोग स्मृतिभ्रंशाच्या अनुवांशिक जोखमीचा अभ्यास करण्यासाठी केला गेला आहे. संशोधकांनी युरोपियन वंशाच्या आणि आफ्रिकन वंशाच्या लोकांचा गटात विभागून अभ्यासाठी वापर केला. अभ्यासाच्या शेवटी, युरोपियन वंशाच्या 1,603 लोकांना स्मृतिभ्रंश झाला आणि आफ्रिकन वंशाच्या 631 लोकांना स्मृतिभ्रंश झाला. अभ्यासाअंती संशोधकांना असे आढळून आले की, जिवनशैलीवरच स्मृतिभ्रंशाचा सर्वाधिक अनुवांशिक धोका असतो. तर, निरोगी जिवनशैली स्विकारलेल्या लोकांमध्ये स्मृतिभ्रंशाचा धोका कमी असतो. संशोधनाअंती अभ्सासकांनी अनुवंशिक स्मृतिभंशाची तक्रार दूर करायची असल्यास, निरोगी जिवनशैली स्विकारण्याचा सल्ला दिला आहे. नॅशनल हार्ट, लंग, अँड ब्लड इन्स्टिट्यूट, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ, डिपार्टमेंट ऑफ हेल्थ अँड ह्युमन सर्व्हिसेस आणि नॅशनल ह्युमन जीनोम रिसर्च इन्स्टिट्यूट यांनी या अभ्यासाला पाठिंबा दिला होता.