AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शांत झोपेसाठी हे आहेत उत्तम घरगुती उपाय!

प्रौढांनी रात्री किमान 7 ते 9 तास झोप घ्यावी. यासोबतच चांगली आणि गाढ झोप असणंही गरजेचं आहे. कारण झोपेच्या कमतरतेमुळे व्यक्तीला शारीरिक आणि मानसिक त्रास होऊ शकतो. जाणून घेऊया गाढ झोपेसाठीच्या पाच बेस्ट ड्रिंक्सबद्दल...

शांत झोपेसाठी हे आहेत उत्तम घरगुती उपाय!
good sleep
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Aug 20, 2023 | 5:33 PM
Share

मुंबई: अनेकदा असं होतं की रात्री लवकर झोपायचा प्रयत्न केला तरी चांगली झोप येत नाही किंवा लोकांना गाढ आणि निरोगी झोप मिळत नाही. पौष्टिक आहार जसा आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे, तशीच पुरेशी झोपही आपल्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. आरोग्य तज्ञ देखील वयानुसार पुरेशी झोप घेण्याचा सल्ला देतात. आपल्या वयानुसार आपण किती तास झोपले पाहिजे हे आपल्याला माहित असले पाहिजे. पण काही लोकांसाठी झोप न येणे ही मोठी समस्या असते. अशा वेळी तुम्ही डॉक्टरांशी संपर्क साधा. पण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही काही घरगुती उपायही करून पाहू शकता. यामुळे तुमच्या शरीराला आराम मिळेल आणि आरामदायी झोप ही मिळेल. जाणून घेऊया गाढ झोपेसाठीच्या पाच बेस्ट ड्रिंक्सबद्दल…

1. कॅमोमाइल टी –

जर तुम्हाला रात्री उशिरा उठण्याची सवय असेल तर झोपण्यापूर्वी कॅमोमाइल चहा प्या. यात असलेले अपीजेन नावाचे घटक आपल्याला आरामदायक झोप घेण्यास मदत करतात. यामुळे तुम्हाला गाढ झोप येईल.

2. गरम दूध –

रात्री झोपण्यापूर्वी गरम दुधात हळद किंवा मध मिसळून प्यावे. यामुळे तुम्हाला रात्री गाढ झोप येईल. खरं तर दुधात ट्रिप्टोफेन नावाचे अमिनो अॅसिड असते, जे झोपेसाठी फायदेशीर मानले जाते.

3. तुळशीचा चहा

तुळशीचा चहा बनवून रात्री चांगल्या झोपेसाठी प्या. यामुळे तुमच्या शरीराला आराम मिळेल तसेच चांगली झोपही येईल. तुळशीमध्ये असलेले अँटी-स्ट्रेस गुणधर्म आपल्याला आराम देतात. ज्यामुळे तुम्ही उशीरा उठत नाही आणि बेडवर पडताच झोपू शकता.

4. लॅव्हेंडर चहा –

लॅव्हेंडर हे एक सुगंधी फूल आहे ज्याचा चहा आपल्या डोक्याला आराम देण्यासाठी बनविला जातो. रात्री झोपण्यापूर्वी हा चहा प्यावा. यामुळे आपल्या मज्जासंस्थेला शांती मिळते ज्यामुळे झोप चांगली होते.

5. अक्रोडचे दूध –

तुम्ही बदाम किंवा अक्रोड दुधात मिसळून पिऊ शकता. रात्री झोपण्यापूर्वी 30 मिनिटे आधी हे दूध प्या. तुमच्या खोलीत शांततापूर्ण वातावरण निर्माण करा आणि मस्त झोप.

(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही या वृत्ताला दुजोरा देत नाही.)

Follow Us
जशी वेळ येईल तशा...; सुनेत्रा पवार यांनी सस्पेन्स वाढवला....
Sunetra Pawar : जशी वेळ येईल तशा...; सुनेत्रा पवार यांनी सस्पेन्स वाढवला, राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर पडदा कधी उठणार?
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
Dhananjay Munde : पंकजा मुंडे यांच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
Thackeray Brothers : ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू पुन्हा एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
Chandrashekhar Bawankule : दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्र...
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले, जीवनप्रवास प्रेरणादायी!
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी...
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी साजरी केली भाऊबीज
विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय...
Sunetra Pawar : विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाल्या?
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे...
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे सर्वांचे लक्ष!