AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Green Chilli Benefits : वाढलेला BP ते ‘या’ आजारांवर प्रभावी ठरते लवंगी मिरची, जाणून घ्या.

मिरची ही खुप महत्त्वाची असते, पण तुम्हाला माहितीये का की मिरची आपल्या शरीरासाठी गुणकारी असते. आता ती कशी गुणकारी आहे याबाबत जाणून घ्या.

Green Chilli Benefits : वाढलेला BP ते 'या' आजारांवर प्रभावी ठरते लवंगी मिरची, जाणून घ्या.
| Updated on: Jul 17, 2023 | 10:42 PM
Share

मुंबई : हिरवी मिरची ही अशी आहे जी बहुतेक पदार्थांमध्ये वापरली जातेच. मिरची शिवाय पदार्थ हे अपूर्ण वाटतात. कारण प्रत्येक पदार्थामध्ये थोडासा तिखटपणा लागतोच. त्यामुळे मिरची ही खुप महत्त्वाची असते. पदार्थांमध्ये तर मिरचीचा वापर करतातच पण तुम्हाला माहितीये का की मिरची आपल्या शरीरासाठी गुणकारी असते. आता ती कशी गुणकारी आहे याबाबत जाणून घेणार आहोत.

1. डोळे निरोगी ठेवण्यासाठी फायदेशीर मिरची ही डोळ्यांसाठी फायदेशीर असते. मिरचीमुळे आपले डोळे निरोगी राहतात. कारण मिरचीमध्ये बीटा कॅरोटीन असते जे आपले डोळे निरोगी ठेवते. तसंच संशोधनात असा आढळून आलं आहे की, मिरचीमध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म आढळतात त्यामुळे हे गुणधर्म डोळ्यांसाठी फायदेशीर ठरतात.

2. पचनास उपयुक्त ठरते आपली पचन संस्था नीट राहण्यासाठी हिरवी मिरची महत्त्वाची भूमिका बजावते  कारण हिरवी मिरची गॅस्ट्रोइंटेस्टाइनल विकारांवर परिणाम दर्शवते. पोटाच्या या विकारांमध्ये बद्धकोष्ठता, अपचन या लक्षणांचा समावेश असतो. तर पोटाच्या समस्या कमी करण्यासाठी मिरची उपयुक्त ठरते.

3. रक्तदाब नियंत्रित ठेवते हिरवी मिरची रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास देखील मदत करते. कारण हिरव्या मिरचीमध्ये कॅप्सिकम आढळते जे आपला उच्च रक्तदाब नियंत्रण ठेवण्यात उपयुक्त ठरते. मिरचीमध्ये हायपर टेन्सचे गुणधर्मही आढळतात जे आपले रक्तदाब नियंत्रणेत ठेवण्यास फायदेशीर ठरतात.

मिरचीचे शारीरिक फायदे जाणून घेतले. पण जेवढी मिरची शरीरासाठी फायदेशीर आहे तेवढीच ती हानिकारकही आहे. तर आता आपण मिरची खाल्ल्यानंतर होणाऱ्या नुकसानाबाबत जाणून घेणार आहोत.

1. जास्त प्रमाणात हिरवी मिरची खाल्ली तर पोटाच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. जसे की पोटात जळजळ होणे किंवा सूज येणे अशा प्रकारच्या समस्या निर्माण होतात, त्यामुळे मिरची खाणं टाळावं.

2. मिरची खाल्ल्यामुळे आपल्याला ॲसिडिटी देखील होऊ शकते. त्यामुळे कधीही मिरचीचे सेवन हे मर्यादित प्रमाणातच करावे.

3. बहुतेक वेळा काही लोक मिरची डायरेक्ट कच्चे खातात आणि ते जास्त प्रमाणात खातात. पण मिरची ही मर्यादित प्रमाणातच खावी कारण जास्त खाल्ल्यामुळे शरीरातील टॉक्सिन्सही वाढू शकतात.

शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.