AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health : ऑक्टोबरमध्ये बदलत्या हवामानामध्ये ‘ही’ 5 फळे खावून वाढवा रोग प्रतिकारशक्ती

5 Best Fruits to Prevent Seasonal Disease : काही अशी फळ आहेत ज्यांच्या साहाय्याने आपण आपली प्रतिकार शक्ती मजबूत करू शकतो आणि व्हायरल इन्फेक्शन पासून दूर राहण्यास आपल्याला मदत होते. तर आता ही फळे कोणती आहेत याबाबत  जाणून घ्या.

Health : ऑक्टोबरमध्ये बदलत्या हवामानामध्ये 'ही' 5 फळे खावून वाढवा रोग प्रतिकारशक्ती
fruits for blood circulationImage Credit source: Social Media
| Updated on: Oct 05, 2023 | 9:28 PM
Share

मुंबई : सध्याच्या बदलत्या वातावरणामुळे अनेक वेगवेगळे आजार निर्माण होताना दिसतात. बदलत्या वातावरणामुळे व्हायरल इन्फेक्शन देखील मोठ्या प्रमाणात होताना दिसते. या वातावरणामध्ये व्हायरल आणि बॅक्टेरियाचे संसर्ग झपाट्याने वाढतात. मग सर्दी, खोकला अशा आजारांना सामोरे जावं लागू शकतं. ऑक्टोबरच्या या महिन्यात हवामान बदलते त्यामुळे सर्दी, ताप, खोकला अशा समस्या निर्माण होतात. तसेच लोकांची प्रतिकारशक्ती देखील कमकुवत होते. तर या आजारांवरती मात करण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती स्ट्राँग करण्यासाठी आपल्या आहारात काही फळांचा समावेश करणे गरजेचे आहे.

पेरू –  बहुतेक लोकांना पेरू हे फळ खायला आवडते. तर ऑक्टोबर महिन्यात पेरू हे फळ बाजारात सर्वत्र उपलब्ध होते. पेरू हे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. कारण पेरूमध्ये विटामिन सी असते जे आपल्याला अनेक आजारांपासून वाचवते. तसेच आपली रोगप्रतिकार शक्ती देखील वाढण्यास मदत होते.

पपई – पपई आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. पपईमध्ये देखील विटामिन सी असते जे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवते. तसेच व्हायरल आणि बॅक्टेरियाचा संसर्गचा धोका देखील कमी होण्यास मदत होते. त्यामुळे पपई आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहे.

डाळिंब – डाळिंब हे बदलत्या ऋतूत खूप फायदेशीर असते. डाळिंबामध्ये अँटिऑक्सिडंट, विटामिन सी असे गुणधर्म असतात जे आपल्या शरीरासाठी गुणकारी असतात. डाळिंबामुळे आपल्या शरीरातील जळजळ कमी होण्यास मदत होते. तसेच वायरल आणि संसर्गजन्य आजारांपासून देखील आपली सुटका होण्यास मदत होते.

किवी – किवी या फळामुळे आपल्या पांढऱ्या रक्तातील पेशी वाढवण्यास मदत होते. त्यामुळे पेशी कमी झाल्यानंतर किवी फळ खाणे गरजेचे आहे. तसेच किवीमध्ये पोटॅशियम, फॉलेट बी, विटामिन के आणि विटामिन सी आढळते जे आपल्या शरीराला खूप फायदेशीर असते.

लिंबूवर्गीय फळ – लिंबूवर्गीय फळांमध्ये विटामिन सी असते जे आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते. लिंबूवर्गीय फळांमध्ये तुम्ही संत्री, मोसंबी, लिंबू, द्राक्षं अशा फळांचा समावेश करू शकता. तर अशी लिंबूवर्गीय फळ देखील आपल्या शरीरासाठी गुणकारी असतात.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.