Health: हिवाळ्यात शरीराला आतून ठेवायचे असेल गरम, तर अवश्य सेवन करा या गोष्टी

| Updated on: Dec 08, 2022 | 6:08 PM

Health If you want to keep your body warm inside in winter then you must consume these things

Health: हिवाळ्यात शरीराला आतून ठेवायचे असेल गरम, तर अवश्य सेवन करा या गोष्टी
हिवाळा
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई, सध्या थंडीचा (Winter) मोसम सुरू आहे, या दिवसात प्रकृतीला जपणे फार महत्त्वाचे आहे. या ऋतूमध्ये सर्दी, घसा खवखवणे, नाक वाहणे, ताप येणे असे आजार होतात. त्यामुळे या दिवसांमध्ये प्रकृतीला जपण्यासाठी शरीरामध्ये ऊर्जा टिकवून ठेवणे आवश्यक आहे. काही पदार्थ आहेत, ते हिवाळ्यात तुम्हाला आतून उबदार करण्याचे काम करतात. यासोबतच या गोष्टींचे रोज सेवन केल्यास वारंवार आजारी पडत नाही. चला जाणून घेऊया अशा गोष्टींबद्दल जे तुम्हाला आतून उबदार ठेवतात.

हिवाळ्यात या पदार्थांचे सेवन केल्याने शरीर आतून राहते उबदार

  1. तूप सेवन करा- जर तुम्हाला हिवाळ्यात निरोगी राहायचे असेल तर तुपाचे सेवन अवश्य करा. ते शरीराला आतून उबदार ठेवण्याचे काम करते, कारण यामध्ये मध्यम चेन फॅटी ऍसिड असते. यकृताला ऊर्जा देण्यासाठी ते थेट जाळले जातात. तुपात, विशेषत: ब्युटीरिक ऍसिड देखील असते, जे अन्न सहज पचण्यास मदत करते आणि रोग प्रतिकारशक्ती देखील वाढवते.
  2. तीळ- तिळात भरपूर फायबर असते. ज्यामुळे पचनक्रिया बरोबर राहते आणि बद्धकोष्ठता आणि फुगण्याची समस्या दूर होते. अशा परिस्थितीत शरीराला आतून उबदार ठेवायचे असेल तर तिळाचे सेवन अवश्य करा. यासाठी तुम्ही ते सॅलडवर टाकूनही खाऊ शकता.
  3. हर्बल चहा प्या- जर तुम्ही हिवाळ्यात वारंवार आजारी पडत असाल तर तुम्ही आले, ज्येष्ठमध आणि तुळस यांचा बनवलेला हर्बल चहा घेऊ शकता. चहा हिवाळ्यातही तुम्हाला आतून उबदार ठेवण्याचे काम करते.
  4. शेंगदाणे- हिवाळ्यात शेंगदाण्याचे सेवन केल्याने शरीरला ऊर्जा मिळते. शेंगदाण्याचा लाडू किंवा भाजलेले शेंगदाणे सेवन केल्याने थंडीमुळे होणाऱ्या त्रासांपासून बचाव होतो.
  5. हे सुद्धा वाचा