AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health Tips: हिवाळ्यात राहायचे असेल फिट, तर ‘या’ पाच गोष्टी नक्की करा

हिवाळ्याच्या दिवसात आरोग्य जपणे अतिशय महत्त्वाचे आहे. वातावरणातील बदलांना समोर जाण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती महत्त्वाची भूमिका बजावते.

Health Tips: हिवाळ्यात राहायचे असेल फिट, तर 'या' पाच गोष्टी नक्की करा
हिवाळा Image Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Dec 02, 2022 | 10:00 AM
Share

मुंबई, सध्या सगळ्यांचा आवडता ऋतू हिवाळा सुरू आहे. हिवाळा हा आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. हिवाळ्याच्या दिवसात रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवणे आवश्यक आहे. जेणेकरून वातावरणात झालेल्या बदलांमुळे आरोग्याच्या संबंधित तक्रारींशी लढता येईल. हिवाळ्याच्या दिवसात काही उपाय केल्यास हंगामी आजारांना दूर ठेवता येणे शक्य आहे.  जाणून घेऊया या उपायांबद्दल (Winter Health Tips).

  1.  सकस आहार घ्या: रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी निरोगी आहाराचे पालन करणे खूप महत्वाचे आहे. आपल्याला आवश्यक असलेली पोषकतत्त्वे प्रथिनेयुक्त आणि कमी कार्बोहायड्रेड आहारातून येतात. निरोगु आरोग्य राखण्यासाठी हिवाळ्याच्या दिवसात उपलब्ध असलेल्या भाज्या, फळे, कडधान्य खाणे आवश्यक आहे. तज्ज्ञांच्या मते रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी व्हिटॅमिन-बी6, व्हिटॅमिन-सी, व्हिटॅमिन-ई आणि झिंकची गरज असते. सर्दी आणि फ्लूच्या लक्षणांमध्येही झिंक आराम देते.
  2.   भरपूर शारीरिक हालचाली करा: शरीर निरोगी आणि सक्रिय ठेवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे दररोज व्यायाम करणे.  नियमितपणे व्यायाम केल्यास रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि तणाव कमी होतो. तसेच, जर तुमच्या शरीरात कोणत्याही प्रकारचा संसर्ग झाला तर तुमची यंत्रणा त्वरीत त्याच्याशी लढण्यासाठी तयार होते. रोजचा व्यायाम तुम्हाला हृदयविकारांपासूनही दूर ठेवतो.
  3.  पुरेशी झोप घ्या: रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी चांगली झोप देखील आवश्यक आहे. पुरेशी झोप घेतल्याने आपल्या रोगप्रतिकारक यंत्रणेला विश्रांती आणि ताजेतवाने होण्यास वेळ मिळतो. त्यामुळे जेव्हा तुम्ही झोपायला जाता तेव्हा मोबाईल, टॅब किंवा टीव्हीसारख्या इलेक्ट्रिक उपकरणांपासून दूर राहा.
  4. भरपूर पाणी प्या: पाणी हे जीवन आहे.  पाणी आपल्या शरीरात महत्त्वाची भूमिका बजावते, विशेषत: जेव्हा ते रोगप्रतिकारक कार्यासाठी येते. हायड्रेशनमुळे तुमच्या शरीरात संक्रमणाशी लढा देणार्‍या रोगप्रतिकारक पेशींचा योग्य प्रकारे प्रसार होतो.
  5.  तणाव कमी करण्याचा प्रयत्न करा: धकाधकीच्या जीवनात तणाव सामान्य झाला आहे.   तुम्ही ज्या तणावातून जात आहात त्याची पातळी कमी करणे ही कदाचित तुम्ही करू शकणार्‍या सर्वात कठीण गोष्टींपैकी एक आहे. जेव्हा तुमचे शरीर सतत तणावाखाली असते, तेव्हा शरीरात अनेक नकारात्मक बदल घडत असतात. या तणावामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते, ज्यामुळे संसर्गाशी लढा देणे कठीण होते.

Follow Us
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?