Water | जास्त पाणी पिणेही आरोग्यासाठी घातक, जाणून घ्या किती असावे प्रमाण

| Updated on: Apr 08, 2022 | 11:21 AM

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, शरीरात योग्य प्रमाणात पाणी घेणे आवश्‍यक आहे. खूप जास्त पाणी पिणेही आरोग्याच्या दृष्टीने धोकेदायक असू शकते. आपल्या लघवीच्या रंगानुसार आपण शरीरातील पाण्याची पातळी ओळखू शकतो. जर लघवीचा रंग पांढरा किंवा फिकट पिवळा असल्यास आपण योग्य प्रमाणात पाणी पित असल्याचे समजावे, जर रंग गडद पिवळा व दुर्गंधीयुक्त असल्यास शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्याचे समजावे.

Water | जास्त पाणी पिणेही आरोग्यासाठी घातक, जाणून घ्या किती असावे प्रमाण
प्रातिनिधीक फोटो
Image Credit source: टीव्ही9
Follow us on

मुंबई : एप्रिलची सुरुवात झाली आहे. सध्या सर्वत्र तीव्र उन्हाळा सुरु असून मोठ्या प्रमाणात गर्मीदेखील वाढली आहे. अनेक शहरांमध्ये तापमानाचा (Temperature) पारा 40 अंशाच्या वर गेल्याचेही दिसून येत आहे. परिणामी या दिवसांमध्ये शरीरात मोठ्या प्रमाणात बदल घडत असतात. या दिवसांमध्ये ‘लू’पासून वाचण्यासाठी आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ जास्त पाणी पिण्याचा सल्ला देत असतात. परंतु यात एक लक्षात ठेवलं पाहिजे, प्रमाणापेक्षा जास्त पाणी (water) पिणेही शरीरासाठी चांगले नसते. इंडियन स्पाईनल इंजरीज्‌ सेंटरमधील डॉ. विनीत नारंग यांनी सांगितले की, गरजेपेक्षा जास्त पाणी पिणेदेखील शरीरासाठी चांगले नसते. खासकरुन यात किडणी (kidney) प्रभावीत होण्याचा धोका वाढू शकतो. जास्त पाणी पिल्याने शरीरातील उत्सर्जन प्रकिया बिघडण्याचा धोका असतो.

खूप जास्त पाणी पिल्याने याचे शरीरावर चिडचिडपणाच्या माध्यमातून अनेक दुष्परिणाम दिसून येतात. या शिवाय शरीरातील इलेक्ट्रोलाइट्‌सच्या प्रमाणातही असंतुलन निर्माण होण्याचा धोका असतो. श्री. नारंग यांनी सांगितले, की पाण्याचे अधिक सेवन केल्याने रक्तात सोडिअमची कमतरता व मानसिक आरोग्याबाबत समस्या निर्माण करु शकते. जेव्हा तुम्ही जास्त पाणी पितात तेव्हा तुमची किडणी अतिरिक्त पाणी बाहेर उत्सर्जित करु शकत नाही, व त्यामुळे रक्तातील सोडिअमचे प्रमाण कमी होण्यास सुरुवात होते. जास्त पाणी पिल्याने शरीरातील सोडिअमवर सर्वाधिक परिणाम होत असतो. सोडिअम नसांमधील द्रवीय घटकांचे संतुलन करण्यास महत्वाची भूमिका निभावत असतात. त्यामुळे त्याचे संतुलन कायम ठेवणे अत्यंत आवश्‍यक असते. पाण्याच्या अतिरेकाने नसांमध्ये सूज येउन हे जीवावरदेखील बेतू शकते. या शिवाय नसांना सूज आल्याने व्यक्तीस भ्रम, निराशा, डोकेदुखी अशा अनेक समस्या निर्माण होउ शकतात. हायपरटेंशन व ह्रदयाशी संबंधित आजारदेखील निर्माण होउ शकतात. तज्ज्ञांच्या मते केवळ अशाच लोकांना जास्त पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो ज्यांना मुतखडा किंवा युरिनशी संबंधित काही आजार आहेत.

ही लक्षणे समजून घ्या :

डॉ. नारंग यांनी सांगितले, की योग्य प्रमाणात पाणी पिणे आवश्‍यक आहे. जास्त पाणी पिणे आरोग्यासाठी धोकेदायक असते. लघवीच्या रंगानुसार आपण आपल्या शरीरातील पाण्याची पातळी ओळखू शकतो. जर लघवीचा रंग पांढरा किंवा फिकट पिवळा असल्यास आपण योग्य प्रमाणात पाणी पित असल्याचे समजावे, जर रंग गडद पिवळा व दुर्गंधीयुक्त असल्यास शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्याचे समजावे.

जास्त पाणी पिण्याचे लक्षण असे :

डॉ. नारंग यांच्या मते, ओव्हरहायड्रेशनचे लक्षणदेखील डिहायड्रेशनसारखे दिसू शकतात. जेव्हा तुम्ही अधिक पाणी पितात तेव्हा किडणी क्षमतेपेक्षा जास्त द्रवीय घटकांचे उत्सर्जन करु शकत नाही. त्यामुळे ते घटक शरीरात जमा होउ लागतात. ज्यामुळे मनाची चलबिचल होणे, उलटी, हगवण आदी समस्या निर्माण होउ शकतात. जेव्हा तुम्ही अधिक पाणी पितात तेव्हा इलेक्ट्रोलाइटची पातळी कमी होत असते. त्यामुळे शरीराचे संतुलन बिघडते. त्यामुळ मांसपेशींमध्ये काहीसा तणाव निर्माण होण्याचीही शक्यता असते.

किती पाणी प्यावे?

‘वेबएमडी’च्या मते, एका व्यक्तीने दिवसभरात किती पाणी प्यावे याचे कुठलेही ठोस असे सूत्र नाही. पाण्याचं प्रमाण हे व्यक्तीचे वय, त्याचे वजन, दिवसभरातील क्रियाकलाप, लिंग आदींवर अवलंबून असते. 19 ते 30 वयाच्या महिलांनी दररोज किमान 2.7 लीटर पाणी पिणे आवश्‍यक असते. त्याच वयाच्या पुरुषांनी 3.7 लीटर पाणी पिणे गरजेचे असते. तहाण लागल्यानुसार महिला व पुरुषांनी पाणी पिण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे. तसेच दिवसातून किमान आठ ग्लास पाणी पिणे योग्य असल्याचेही तज्ज्ञ सांगतात.

संबंधित बातम्या :

Health Care : उन्हात निरोगी राहण्यासाठी सूर्यप्रकाशित पाणी प्या, वाचा फायदेच फायदे!

Photo gallery | आला आला उन्हाळा आता आरोग्य सांभाळा ….. ‘या’ टिप्स नेहमी लक्षात ठेवा

घरापासून तुम्ही लांब गेला असला तरीही तुम्ही स्वतःला तंदुरुस्त ठेवू शकता, या गोष्टींचा वापर करा