AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

World Hypertension Day 2022: ज्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे, त्यांनी हे पदार्थ खाणे टाळाच

मुंबईः उच्च रक्तदाबाला हायपर टेन्शन (Hypertension) असं देखील म्हणतात, सध्याच्या जगात अनेक जण या समस्येमुळे लोक त्रस्त आहेत. या समस्यावर वेळीच नियंत्रण ठेवले गेले नाही तर उच्च रक्तदाबामुळे हृदयविकाराचा झटका, पक्षाघात किंवा हृदयाशी संबंधित दुसऱ्या कोणत्याही समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने रक्तदाब नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे. ही समस्या अनेक नागरिकांना असल्यानेच आणि त्याबाबत जागरूकता निर्माण […]

World Hypertension Day 2022: ज्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे, त्यांनी हे पदार्थ खाणे टाळाच
| Updated on: May 12, 2022 | 4:44 PM
Share

मुंबईः उच्च रक्तदाबाला हायपर टेन्शन (Hypertension) असं देखील म्हणतात, सध्याच्या जगात अनेक जण या समस्येमुळे लोक त्रस्त आहेत. या समस्यावर वेळीच नियंत्रण ठेवले गेले नाही तर उच्च रक्तदाबामुळे हृदयविकाराचा झटका, पक्षाघात किंवा हृदयाशी संबंधित दुसऱ्या कोणत्याही समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने रक्तदाब नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे. ही समस्या अनेक नागरिकांना असल्यानेच आणि त्याबाबत जागरूकता निर्माण करावी म्हणून दरवर्षी 17 मे रोजी जागतिक उच्च रक्तदाब दिन (World Hypertension Day) साजरा केला जातो.

उच्च रक्तदाबाचा (High Blood Pressure) त्रास अनेकांना होत असल्यानेच नागरिकांनी निरोगी जीवनशैली आणि निरोगी आहाराचे पालन करणे महत्वाचे आहे. अनेक वेळा जास्त तळलेले, जास्त गोड आणि इतर अनेक आरोग्याला हानीकारक असलेले पदार्थ खाल्ल्याने देखील ही समस्या भेडसावते.

कोणत्याही व्यक्तीचा उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवायचा असेल तर आहारात सकस पदार्थांचा समावेश करा, या काळात कोणते पदार्थ टाळावे तेही जाणून घ्या, आम्ही तुम्हालाचा त्याविषयी माहिती देत आहोत.

मीठ

जे पदार्थ जास्त काळ टिकवून ठेवता येतात त्यामध्ये मिठाचे प्रमाण जास्त असते. कारण मीठ अन्न पदार्थ जास्त काळ टिकवून ठेवते. पण हे पदार्थ जास्त वेळ ठेवल्याने त्यामध्ये सोडियमचे प्रमाण वाढत असते. त्यामुळे अशा स्थितीत उच्च रक्तदाब आणि हृदयविकार अशी समस्या निर्माण होण्याची शक्यता असते.

ब्रेड

अनेक व्यक्तींना नाश्त्यामध्ये ब्रेडसोबत बटर खायला आवडत असते. पिठापासून बनवलेल्या ब्रेड असला तरी तो आरोग्यासाठी हानिकारक असू शकतो. त्यामु ब्रेडच्या सततच्या सेवनामुळे वजन तर वाढतेच पण शुगरही वाढते. त्यामुळे उच्च रक्तदाबाच्या समस्या ही उद्भवतेच.

प्रक्रिया केलेले मांस

कोणत्याही मासावर ज्यावेळी प्रक्रिया केली जाते त्यावेळी त्यामध्ये सोडियम मोठ्या प्रमाणात वापरले जाते. सँडविचसाठी सॉस, लोणचे यासाठीही ते वापरले जाते. त्यामुळे शरीरातील सोडियमची पातळी निश्चितच वाढते. त्यामुळे उच्च रक्तदाबाची समस्या निर्माण होते.

कॉफी

कॉफीमध्ये कॅफिनचे प्रमाण जास्त असल्याने त्यामुळे रक्तदाब वाढतो. कॅफिन आणि साखर रक्तदाब वाढवण्याचे काम करतात. त्यामुळे उच्च रक्तदाबाचा त्रास असलेल्यांनी एनर्जी ड्रिंक्सचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो.

साखर

मिठाई आणि इतर स्नॅक्समध्ये साखरेचे प्रमाण मोठ्या असते. या अशा परिस्थितीत एखादी व्यक्ती आपल्या दैनंदिन जीवनात आवश्यकतेपेक्षा जास्त साखर वापरते. त्याचा दुष्परिणाम म्हणजे हे आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे. त्यामुळे रक्तदाब वाढतो. त्यामुळे उच्च रक्तदाबाच्या समस्येला सामोरे जावे लागते.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.