AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महिलांमध्ये हार्टअटॅकची लक्षणं पुरुषांपेक्षा वेगळी कशी काय ?

हृदय विकार हा सध्याच्या घडीला मृत्यूचे सर्वात मोठे कारण आहे. युवकांना हृदय विकार किंवा पक्षा घातांचे झटके येण्याचे प्रमाण वाढत आहे. अमेरिकेत तर दर ४० सेकंदांना एकाला हृदयविकाराचा झटका येत आहेय महिलांना देखील हा आजार आहे. परंतू पुरुषांपेक्षा महिलांमध्ये या आजाराची लक्षण भिन्न आहेत.

महिलांमध्ये  हार्टअटॅकची लक्षणं पुरुषांपेक्षा वेगळी कशी काय ?
Updated on: Jun 21, 2025 | 6:36 PM
Share

हृदय विकारचा झटका म्हणजेच हार्ट अटॅक ही एक गंभीर समस्या बनली आहे. या आजारात जर वेळेत वैद्यकीय उपचार मिळाले तरच जीव वाचतो. कारण थोडा जरी उशीर झाला तर प्राण गेलाच असे म्हटले जाते. कारण जितका उशीरा होईल तितके हृदयाचे स्नायू कायमचे मरत जातात. छातीत प्रचंड वेदना होणे, डाव्या बाजूला तीव्र स्वरुपात दुखणं, श्वास घेण्यास त्रास ही सर्वसामान्य हृदय विकाराच्या झटक्याची प्राथमिक लक्षणं मानली जातात. परंतू महिलांमध्ये मात्र हार्ट अटॅकची लक्षणं हलकी, अस्पष्ट आणि वेगळ्या प्रकारची असतात असे उघडकीस आले आहे.अनेकदा महिला त्यास कमजोरी, थकवा किंवा गॅसचा त्रास समजून दुर्लक्ष करीत असतात, परंतू नंतर ते धोकादायक ठरु शकते. पाहूयात महिलांमध्ये काय असतात लक्षणं…

कोणतेही जादा काम न करता थकावा येणे हे हार्ट अटॅकची सर्वसामान्य लक्षण मानले जाते. हा थकवा काही दिवस किंवा आठवडाभर देखील असू शकतो. आणि आराम केल्यानंतरही दूर होत नाही.

पाठ, मान, जबडा आणि खांद्यात दुखणं

नेहमीच महिलांना पाठीच्या वरच्या बाजूला दुखणे, मान, जबडा वा खांद्यात तीव्र दुखणे, वा दबाव जाणवू शकतो. हे दुखणं हळूहळू वाढू शकते.

पोटात दुखणे

अनेक महिलांना हार्ट अटॅक दरम्यान पोटात दुखतं, जळजळ किंवा जडपणा, दडपण जाणवते. ज्याला त्या नेहमीच गॅस किंवा एसिडिटी समजतात. आणि दुर्लक्ष करत असतात. आणि वेळीच उपचार केले नाही तर समस्या गंभीर होऊ शकते.

श्वास घेण्यास होतो त्रास

अनेकदा हार्ट अटॅकच्या वेळी महिलांना दम लागतो आणि श्वास घेताना त्रास होतो. कोणतेही दम लागणारे काम करीत नसताना देखील असे होणे म्हणजे धोका आहे आणि त्वरीत डॉक्टरांना दाखवणे गरजेचे असते.

उलट्या आणि चक्कर येणे

महिलांना उलटी येणे किंवा मळमळणे, डोके गरगरणे वा चक्कर येणे हे देखील हार्ट अटॅकचे संकेत असू शकतात

झोप न येणे आणि बैचेन होणे

हार्ट अटॅक यायच्या काही दिवस आधी किंवा आठवडाभराआधी झोप न येणे, बैचेनी, घाबरल्यासारखे वाटणे या समस्या जाणवू शकतात.

पुरुषांत हार्ट अटॅकची लक्षणं

छातीमध्ये तीव्र स्वरुपात दुखणे किंवा दबाव येणे

श्वास घेताना त्रास होणे

अचानक दरदरून घाम येणे

चक्कर येणे किंवा शुद्ध हरपणे

महिलामध्ये लक्षणं वेगळी का ?

महिलांच्या धमन्यांमध्ये ब्लॉक होण्याची पद्धत, हार्मोनल बदल आणि शरीराची संरचना वेगळी असते.

महिलांमध्ये नेहमीच छोट्या धमन्यांमध्ये ब्लॉकेज असतो, ज्यामुळे छातीत वेगाने कळा येत नाहीत.

महिलांना हार्ट अटॅकचा धोका अधिक का ?

मेनोपॉजनंतर महिलांमध्ये हार्ट अटॅकचा धोका पुरुषांच्या सारखाच किंवा अधिक असतो.

हाय ब्लड प्रेशर, डायबिटीज, लठ्ठपणा, तणाव, आणि जीवनशैली संबंधित कारणांनी महिलामध्ये हार्ट अटॅकचा धोका मोठा असतो.

महिलामध्ये लक्षणं हलकी आणि अस्पष्ट असतात ,त्यामुळे महिलांवरील उपचारात उशीर होतो

कसा कराल बचाव?

महिलांनी त्यांच्या शरीरातील बदलांकडे अजिबात दुर्लक्ष करु नये. शरीरातील बदल लागलीच डॉक्टरांना कळवायला हवेत…

आवश्यकता असेल तर लागलीच ईसीजी, ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल आणि शुगर लेव्हल तपासावी

संतुलित आहार घ्यावा, नियमित व्यायाम करावा, ताण-तनाव कमी करावा आणि धूम्रपान आणि मद्यपान करु नये

शरीरातील कोणतेही असामान्य लक्षण दिसल्यानंतर डॉक्टरांशी संपर्क करावा..

शिक्षकांच्या आंदोलनाला यश, महाजनांची मोठी घोषणा; येत्या 8 दिवसांत...
शिक्षकांच्या आंदोलनाला यश, महाजनांची मोठी घोषणा; येत्या 8 दिवसांत....
पावसाचा कहर, पूर परिस्थिती आणखी बिकट; चंद्रपूरात उद्या सुट्टी जाहीर
पावसाचा कहर, पूर परिस्थिती आणखी बिकट; चंद्रपूरात उद्या सुट्टी जाहीर.
आंदोलन मीरा-भाईंदर पोलीस आयुक्तांना भोवलं? तडकाफडकी बदली अन्..
आंदोलन मीरा-भाईंदर पोलीस आयुक्तांना भोवलं? तडकाफडकी बदली अन्...
आता कसा झेंडा घेऊ हाती? शेलारांनी ठाकरे बंधूंना डिवचलं अन्...
आता कसा झेंडा घेऊ हाती? शेलारांनी ठाकरे बंधूंना डिवचलं अन्....
एक चूक, उडाला गोंधळ; अंत्यसंस्काराची तयारी अन् पुढे जे झालं त्यानं...
एक चूक, उडाला गोंधळ; अंत्यसंस्काराची तयारी अन् पुढे जे झालं त्यानं....
टॉवेल, बनियानवर शिंदेंच्या आमदाराची गुंडागर्दी, बघा VIDEO घडलं काय?
टॉवेल, बनियानवर शिंदेंच्या आमदाराची गुंडागर्दी, बघा VIDEO घडलं काय?.
महाराष्ट्राला भिकारी म्हणणाऱ्या BJP खासदारानं फोन उचलणं केलं बंद?अन्..
महाराष्ट्राला भिकारी म्हणणाऱ्या BJP खासदारानं फोन उचलणं केलं बंद?अन्...
आलिया भट्टला पीएनंच घातला गंड्डा, 73 लाखांना लावला चुना, प्रकरण काय?
आलिया भट्टला पीएनंच घातला गंड्डा, 73 लाखांना लावला चुना, प्रकरण काय?.
राजस्थानच्या चुरूत भारतीय वायुसेनेचे विमान कोसळले, एकाचा मृत्यू
राजस्थानच्या चुरूत भारतीय वायुसेनेचे विमान कोसळले, एकाचा मृत्यू.
असं काय घडलं की, विद्यार्थीनींच्या अंगावरचे कपडे काढून तपासणी अन्...
असं काय घडलं की, विद्यार्थीनींच्या अंगावरचे कपडे काढून तपासणी अन्....