
High Blood Pressure Problem : सध्या हाय ब्लडप्रेशर म्हणजेच उच्च रक्तदाब ही समस्या फारच वाढली आहे. उच्च रक्तदाबामध्ये रक्ताचा दबाव हा सामान्य प्रमाणापेक्षा अदिक असतो. यामुळे हृदय, किडनी, मेंदू तसेच शरीरातील इतर अवयवांवर परिणाम पडू शकतो. या समस्येवर वेळीच नियंत्रण न मिळवल्यास भविष्यात शरीरावर गंभीर परिणाम पडू शकतात. या समस्या आयुष्यात निर्माण होऊ नयेत यासाठी बाबा रामदेव यांनी काही उपाय सांगितले आहेत. या उपायांचे पालन केल्यास तुमची उच्च रक्तदाबापासून सुटका मिळू शकते.
उच्च रक्तदाबापासून सुटका मिळवायची असेल तर बाबा रामदेव यांनी काही योगासने, प्राणायमांची माहिती दिलेली आहे. या योगासन, प्राणायामुळे तुमचा रक्तदाम सामान्य होऊ शकते, असे रामदेव बाबा यांचे मत आहे. मानसिक तणाव, लठ्ठपणा, मिठाचे अधिक सेवन करणे, धुम्रपान, मद्यपान, चुकीची जीवनशैली यासारख्या काही कारणांमुळे उच्च रक्तदाबाची समस्या येते. उच्च रक्तदाबाची समस्या दीर्घकाळ राहिल्यास शरीरातील नसा कठोर होात. त्यामुळे संपूर्ण शरीरभर रक्त पोहोचवण्यासाठी हृदयाला अधिक परीश्रम घ्यावे लागतात. परिणाम भविष्यात हृदयविकाराचा झटका, ब्रेन स्ट्रोक, डोळ्यांनी न दिसणे, मुत्रपिंड निकामी होणे यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. अगोदर उच्च रक्तदाबाची डोकेदुखी, थकवा, दम लागणे अशी काही सामान्य लक्षणं असू शकतात. या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे.
उच्च रक्तदाबावर विजय मिळवायचा असेल तर त्यासाठी काही प्राणायाम आणि योगासने मदतीला येऊ शकतात, असे बाबा रामदेव यांचे मत आहे. अनुलोम विलोम हा प्राणामाय यात सर्वाधिक प्रभावी ठरू शकतो. अनुलोम आणि विलोम प्राणायाममध्ये एका नाकपुडीने श्वास घेऊन तो दुसऱ्या नाकपुडीने सोडायचा असतो. यामळे चिडचिट, तणाव, चिंता दूर होते. परिणामी वाढलेला रक्तदाब कमी होतो.
भ्रामरी प्राणायाममुळे मानसिक शांती लाभते. सोबतच मज्जासंस्थेलाही आराम मिळतो. तणाव कमी झाल्याने वाढलेला रक्तदाब कमी व्हायला मदत मिळते. कपालभाती प्राणायाम केल्यास शरीरातील हानिकारक तत्त्वे बाहेर पडतात. रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुधारते. हा प्राणायाम रोज केल्यावस हृदयाची कार्यक्षमता वाढते.
रक्तदाबावर विजय मिळवण्यासाठी सूर्यनमस्कार हा सर्वोत्तम पर्याय आहे. योगिक जॉगिंगमुळेही शरीरातील रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुधारते, असे बाबा रामदेव यांचे मत आहे. सोबतच उच्च रक्तदाबाची समस्या येऊ नये यासाठी तळलेल्या अन्नाचे सेवन कमी करावे. रोज सात ते आठ तास झोप घ्यावी. नियमित योगा आणि ध्यान करावे. सोबतच नियमितपणे रक्तादाबाची तपासणी करावी.