AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

असली, नकली दारू कशी ओळखायची? काही सेकंदातच ओळखाल; एक्सपर्टने सांगितली सोपी युक्ती

विषारी दारूमुळे होणारे गंभीर धोके आणि मृत्यू टाळण्यासाठी असली आणि नकली दारू ओळखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. एक्सपर्टनुसार, नकली दारूत तिखट वास, मोठे बुडबुडे आणि अंधूक बाटली हे मुख्य संकेत असतात. मिथाइल अल्कोहल डोळ्यांसाठी घातक ठरू शकते. या सोप्या टिप्स वापरून तुम्ही काही सेकंदात नकली दारू ओळखू शकाल, तरीही दारू पिणे टाळणे हाच सर्वोत्तम उपाय आहे.

असली, नकली दारू कशी ओळखायची? काही सेकंदातच ओळखाल; एक्सपर्टने सांगितली सोपी युक्ती
Fake AlcoholImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 27, 2026 | 12:24 PM
Share

मध्यप्रदेशातील सागर जिल्ह्यात काही महिन्यांपूर्वी दारू प्यायल्याने 36 लोकांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे एकच हाहा:कार उडाला होता. कुणाचा बाप, कुणाचा मुलगा, कुणाचा भाऊ तर कुणाचा नवरा या विषारी दारूमुळे दगावला होता. अनेक कुटुंबाचे आधार गेले होते. या घटनेमुळे देशात मोठी खळबळ उडाली आहे. मात्र, एवढी मोठी दुर्घटना घडूनही लोक सर्रासपणे दारू पित आहेत. त्यामुळे मदिरापान करणाऱ्यांना किमान असली आणि नकली दारू कोणती आहे हे समजलं पाहिजे. त्यामुळे किमान तुमचं नुकसान तरी होत नाही. एक्सपर्टने नकली दारू ओळखण्याच्या काही ट्रिक्स सांगितल्या आहेत. त्यामुळे काही सेकंदातच तुम्ही नकली दारू ओळखू शकाल.

एक्सपर्टच्या मते, इथाइल अल्कोहल आणि मिथाइल अल्कोहल असतात. मिथाइल अल्कोहलमुळे आंधळेपणा येतो. दोघांचा रंग आणि गंध एक सारखाच असतो. पण जेव्हा नकली दारू बनवली जाते तेव्हा ती तिखट करण्यासाठी त्यात यूरिया, रतनजोत वा धोत्र्याचे बीज कुटून टाकले जातात. त्याचा गंध अत्यंत तिखट म्हणजे उग्र असतो. थिनर वा नेल पेंट सारखा हा उग्र वास असतो.

बुडबुडे आले की समजा…

जेव्हा तुम्ही दारू हलवता तेव्हा नकली दारूच्या बॉटलमध्ये बुडबुडे तयार होतात. हे मोठमोठे बुडबुडे असतात. जर दारूत केवळ इथाइल अल्कोहल असेल तर त्यात क्षणित बुडबुडे बनतात आणि लगेच गायब होतात. या बुडबुड्यांच्या आधारे दारू नकली असल्याचं समजतं. ज्या दारूत जास्त बुडबुडे असतात ती दारू नकली असते. तसेच दारूची बाटली समोर धरल्यास असली दारूची बॉटल पारदर्शी दिसते. या बॉटलमधून बाहेरचं आरपार दिसतं. तर नकली दारूची बॉटल अंधूक असते. त्यातून बाहेरचं आरपार दिसत नाही. सूर्याच्या दिशेने ही बॉटल धरली तर त्यात बाटलीत खाली तळाला काही तरी जमा झाल्यासारखं दिसतं. त्यावरून या बॉटलमध्ये इथाइल अल्कोहलशिवाय आणखी काही मिसळल्याचं लक्षात येतं, असं एक्सपर्ट सांगतात.

दारू पिणं टाळा…

लॅबोरेटरीच्या हिशोबाने पाहिलं तर दारूच्या अनेक टेस्ट असतात. मदिरापान करणाऱ्यांना त्याची गंधवार्ताही नाहीये. त्यामुळे त्यांच्याशी याबाबत बोलणं कठिणच आहे. दारू असली आहे की नकली हे ओळखण्यापेक्षा दारू पिणं बंद केलं पाहिजे. दारू प्यायल्याने त्याचा आरोग्यावर परिणाम होतो. त्यामुळे दारू सोडण्यासाठी प्रॉपर मनोवैज्ञानिक उपचार घेतले पाहिजे. दारू सोडण्याच्या दिशेने प्रयत्न केले पाहिजे. असंख्य लोकांनी दारू सोडलेली आहे. म्हणजे हे व्यसन सोडता येण्यासारखं आहे. फक्त मद्यपींनी मनावर घेतलं पाहिजे, असंही एक्सपर्ट सांगतात.

(वैधानिक सूचना : दारूचे सेवन आरोग्यास हानिकारक आहे. आम्ही दारूच्या सेवनाचे समर्थन करत नाही. वरील मजकूर इंटरनेटवरील स्रोतांच्या आधारे तयार करण्यात आला असून, त्यातील सर्व माहितीशी आम्ही सहमत असूच असे नाही.)

Follow Us
एकूण सहा फेऱ्यांनंतर प्रत्यक्षात मतमोजणीला सुरुवात होणार
Maharashtra MLC Election 2026 Result : एकूण सहा फेऱ्यांनंतर प्रत्यक्षात मतमोजणीला सुरुवात होणार
शिवसेनेच्या 6 बंडखोर खासदारांचं भवितव्य आज ठरणार; सुप्रीम कोर्टात....
Shivsena : शिवसेनेच्या 6 बंडखोर खासदारांचं भवितव्य आज ठरणार; सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी
प्रचंड लक्ष्मी दर्शन झालं, पण विजय सरस्वतीचाच; सतेज पाटलांचा....
Satej Patil : प्रचंड लक्ष्मी दर्शन झालं, पण विजय सरस्वतीचाच; सतेज पाटलांचा विरोधकांना टोला
झाडं तोडणारे कसाबचे बाप; वृक्षतोडीवरून संजय राऊत आक्रमक
Sanjay Raut : झाडं तोडणारे कसाबचे बाप; वृक्षतोडीवरून संजय राऊत आक्रमक
छत्रपती शिवरायांच्या सह्याद्रीच्या रांगा नष्ट करतायत! संजय राऊतांचा...
Sanjay Raut : छत्रपती शिवरायांच्या सह्याद्रीच्या रांगा नष्ट करतायत! संजय राऊतांचा सरकारवर घणाघात
आम्हाला कुणी विकत घेऊ शकत नाही...; मतपेटीत सापडली चिठ्ठी; नेमकं काय...
MLC Election 2026 Maharashtra : आम्हाला कुणी विकत घेऊ शकत नाही...; मतपेटीत सापडली चिठ्ठी; नेमकं काय लिहिलंय?
25-25 मतांचे गठ्ठे, पसंतीक्रमाची मोजणी; विधानपरिषद निवडणुकीचा निकाल...
Maharashtra MLC Election 2026 Result : 25-25 मतांचे गठ्ठे, पसंतीक्रमाची मोजणी; विधानपरिषद निवडणुकीचा निकाल नेमका कधी लागणार?
पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीत गोंधळ; तब्बल ६ ते ८ मतपेट्यांवर....
Pune MLC Election 2026 : पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीत गोंधळ; तब्बल ६ ते ८ मतपेट्यांवर....
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; राजेंद्र शिंदेंनंतर आता...
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; राजेंद्र शिंदेंनंतर आता...
70 टेबलांवर 13 फेऱ्यांमध्ये होणार प्राथमिक मतमोजणी
Maharashtra MLC Result 2026 Complete Overview : 70 टेबलांवर 13 फेऱ्यांमध्ये होणार प्राथमिक मतमोजणी