AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लहान वयात केस पांढरे होण्याची कारणे! हे सगळं कसं थांबवायचं?

काही वेळा यामागे अनुवांशिक कारणे असू शकतात, जी टाळणे जवळजवळ अशक्य असते. परंतु अनेकदा आपल्या जीवनशैलीतील काही चुका त्यामागे जबाबदार असतात.

लहान वयात केस पांढरे होण्याची कारणे! हे सगळं कसं थांबवायचं?
White hair
| Updated on: Mar 04, 2023 | 4:01 PM
Share

25 ते 30 वयोगटातील तरुणांना पहिल्यांदाच डोक्यावर पांढरे केस दिसू लागला तर टेन्शन येणं साहजिक आहे, मग एवढ्या लहान वयात असं का घडतंय, असा विचार तो करतो. काही वेळा यामागे अनुवांशिक कारणे असू शकतात, जी टाळणे जवळजवळ अशक्य असते. परंतु अनेकदा आपल्या जीवनशैलीतील काही चुका त्यामागे जबाबदार असतात. लहान वयात केस पिकण्याची कारणे कोणती असू शकतात आणि ते कसे टाळणे शक्य आहे हे जाणून घेऊया.

लहान वयात केस पांढरे होण्याची कारणे

अस्वास्थ्यकर आहार

  • अनावश्यक तणाव
  • जीवनसत्त्वे आणि खनिजांची कमतरता
  • अस्वास्थ्यकर आहाराचे सेवन – रसायनयुक्त केस उत्पादनांचा वापर
  • अल्कोहोल आणि सिगारेटचे सेवन
  • अनुवांशिक कारणे

केस पिकण्यापासून कसे रोखायचे?

  1. शॅम्पूचा दैनंदिन वापर टाळा. जर तुम्ही दररोज शॅम्पू वापरत असाल तर आजच ते करणे थांबवा. त्याऐवजी सौम्य आणि सेंद्रिय शैम्पू वापरा. सहसा शॅम्पू आणि कंडिशनरमध्ये अशी रसायने असतात ज्यामुळे केस पांढरे होतात.
  2. जर तुम्ही जास्त तेलकट, फास्ट आणि जंक फूड खाल्ले तर केसांना अंतर्गत पोषण मिळणार नाही आणि लहान वयातच केस पांढरे होऊ लागतील हे उघड आहे. अशावेळी व्हिटॅमिन बी-2 असलेली फळे आणि हिरव्या पालेभाज्या जास्त प्रमाणात खाणे गरजेचे आहे.
  3. आजकाल बाजारात रासायनिक घटक असलेले हेअर ऑईल आहेत, अनेकदा आपण केसांमध्ये काही सुगंधी तेल लावतो, ज्यामुळे पोषण मिळत नाही, त्याऐवजी बदाम, नारळ आणि ऑलिव्ह सारखे तेल डोक्यावर लावा.
  4. सिगारेट आणि अल्कोहोलमुळे आपले फुफ्फुस आणि यकृत तर खराब होतेच, पण ते केसांनाचेही शत्रू आहेत, यामुळे केस लवकर पांढरे आणि कमकुवत होतात. या वाईट सवयी जितक्या लवकर सोडल्या जातील तितके चांगले.
  5. केस पांढरे होण्याचं एक मोठं कारण म्हणजे अनावश्यक टेन्शन, अनेकदा परिस्थिती आपल्या नियंत्रणात नसते, पण त्याचा विचार करून आपण वारंवार तणावाला खतपाणी घालतो. जर तुम्ही आनंदी असाल तर त्याचा केसांवर ही सकारात्मक परिणाम होईल.

(डिस्क्लेमर: दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा दिलेला नाही.)

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...