
पावसाळ्यात योग्य चपला घाला, कारण रबर आणि प्लास्टिकच्या चपलांचा वापर केलात तर तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे बूट आणि सँडल वापरण टाळा जेणेकरून पायाला ओलावा राहणार नाही.

पावसाळ्यात पायाची नखे वाढवणे टाळा कारण पायाची नखे वाढवणे ही मोठी चूक ठरू शकते. पावसाळ्यात त्यामध्ये घाण आणि ओलावा जमा होतो.

तुमचे शरीर कोरडे आणि स्वच्छ ठेवा, विशेषत: ज्या भागात तुम्हाला खूप घाम येतो. स्वच्छता सर्वात जास्त महत्त्वाची असून शरीराची काळजी घ्या.

आपली त्वचा स्वच्छ आणि कोरडी ठेवण्यासाठी नियमित आंघोळ करा. ओले कपडे आणि ओल्या असलेल्या चपळा घालणे टाळा.

पावसाळ्यात तुमचे पाय दिवसभर पावसाच्या पाण्यात भिजत असतील तर संसर्ग टाळण्यासाठी पाय मिठाच्या पाण्यात बुडवा. यासाठी एका टबमध्ये पाणी भरून त्यात दोन चमचे मीठ टाका. सुमारे 20 मिनिटे या पाण्यात पाय ठेवा, नंतर साध्या पाण्याने धुवा.