Health : अंथरूणातून उठल्यावर ही 4 लक्षणे दिसलीत तर तुमच्यासाठी धोक्याची घंटा, नेमकं काय जाणून घ्या

सकाळी उठल्यानंतर तुम्हाला खालीलपैकी कोणतीही लक्षणे दिसली तर ती तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतात. तर ही लक्षणे कोणती याबाबत आपण जाणून घेणार आहोत. कारण उच्च रक्तदाबाच्या रुग्णांमध्ये हृदयविकाराचा धोका मोठ्या प्रमाणात असतो. पण बहुतेक लोकांना उच्च रक्तदाबाची लक्षणे माहिती नसतात. 

Health : अंथरूणातून उठल्यावर ही 4 लक्षणे दिसलीत तर तुमच्यासाठी धोक्याची घंटा, नेमकं काय जाणून घ्या
do these yog asanas after wake up
| Updated on: Nov 30, 2023 | 10:23 PM

मुंबई : आजकालच्या बदलत्या जीवनशैलीमुळे लोकांमध्ये उच्च रक्तदाबाची समस्या मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. यामध्ये मग अनहेल्दी फुड, बदलतं वातावरण, अनुवंशिक कारणं, ताण-तणाव अशा अनेक कारणांमुळे उच्च रक्तदाबाची समस्या निर्माण होते. महत्त्वाचं म्हणजे आताच्या तरूण- तरूणींना देखील उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ लागला आहे. तर रक्तदाब नियंत्रणात न राहिल्यामुळे ते आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते.

थकवा येणे – जर तुम्ही रात्री चांगली, शांत झोप घेतली तर सकाळी उठल्यानंतर तुम्हाला फ्रेश वाटतं. पण रात्री जर झोप नीट घेऊनही तुम्हाला थकवा जाणवत असेल तर त्याचं कारण उच्च रक्तदाब असू शकतो. जर तुम्हाला सकाळी उठल्यानंतर अशक्तपणा, थकवा जाणवत असेल तर तातडीनं डॉक्टरांकडे जाऊन योग्य तो उपचार घ्या.

चक्कर येणे – सकाळी उठल्यानंतर तुम्हाला चक्कर येत असेल तर ते उच्च रक्तदाबाचे लक्षण आहे. तसंच सकाळी उठल्या उठल्या तुम्हाला उलटी आल्यासारखं वाटत असेल, गरगरत असेल तर ते देखील उच्च रक्तदाबाचे लक्षण आहे. त्यामुळे या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका.

खूप तहान लागणे – बहुतेक लोकांना सकाळी उठल्यानंतर तहान लागते, त्यांचा घसा कोरडा होतो. पण हेच तुमच्यासाठी घातक ठरू शकते. कारण सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला खूप तहान लागत असेल तर ते उच्च रक्तदाबाचे लक्षण आहे.

अंधुक दृष्टी होणे – काही लोकांना सकाळी उठल्यानंतर थोडेसे अंधुक दिसते. तर हे लक्षण उच्च रक्तदाबाचे लक्षण आहे. त्यामुळे तुम्हालाही सकाळी उठल्यानंतर अंधुक दिसत असेल तर ताबडतोब डॉक्टरांकडे जाऊन योग्य तो सल्ला घ्या.

उच्च रक्तदाब नियंत्रणात आणण्यासाठी काय करावे?

– जेवणात मिठाचं प्रमाण मर्यादित ठेवा. मिठाचं सेवन जास्त करू नका.
– दररोज सकाळी व्यायाम करा
– ताण-तणावापासून दूर रहा. फ्री रहायला शिका.
– फास्टफूड जास्त प्रमाणात खाऊ नका.
– मद्यपान करणं टाळा.