पोट फुगणे आणि बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर नाश्त्यात या गोष्टीचा करा समावेश
रात्रीच्या वेळी पचनसंस्था मंदावते आणि जर अन्न नीट पचले नाही तर सकाळी पोट फुगणे आणि गॅस होऊ शकते. त्यामुळे सकाळचा नाश्ता करताना तुमच्या नाश्त्यात या पदार्थांचा समावेश करा.

आजकालच्या बदलत्या जीवनशैलीचा आपल्या आरोग्यावर परिणाम होत असतो. त्यामुळे आपल्यापैकी अनेकांन सकाळी उठल्यावर पोटात जडपणा जाणवणे, गॅस होणे किंवा बद्धकोष्ठता येणे हे आजकाल सामान्य झाले आहे. अशातच आपल्यापैकी अनेकजण रात्री उशिरा जेवणे, कमी पाणी पिणे आणि नाश्त्याच्या चुकीच्या सवयी यांचा समावेश आहे, ही प्रमुख कारणे मानली जातात. तर रात्रीच्यावेळेस पचनसंस्था मंदावते आणि त्यात तुम्ही जर रात्री उशिरा जेवण केले आणि त्यात अन्न योग्यरित्या पचले नाही तर सकाळी पोट फुगणे आणि गॅस होणे सामान्य आहे. म्हणून दिवसाची सुरुवात करण्यासाठी योग्य नाश्ता निवडणे आतड्याच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे बनते.
तज्ञांच्या मते नाश्ता केवळ भूक भागवण्यासाठीच नाही तर पचनसंस्था सक्रिय आणि शांत ठेवण्यासाठी देखील आवश्यक आहे. नाश्त्यात योग्य घटकांचा समावेश केल्याने गॅस, अपचन आणि बद्धकोष्ठता यासारख्या समस्यांपासून लक्षणीयरीत्या आराम मिळू शकतो. तर आजच्या लेखात आपण जाणून घेऊयात की तुम्हाला पोटफुगी आणि बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर तुम्ही नाश्त्यात काय खावे.
गॅस तयार होऊ नये म्हणून सकाळी रिकाम्या पोटी काय खावे?
सकाळी उठल्यावर सर्वात आधी एक ग्लास कोमट पाणी पिणे फायदेशीर मानले जाते. यामुळे रात्रीचे डिहायड्रेशन भरून निघते आणि पचनसंस्था सक्रिय होते. बरेच लोकं पाण्यात थोडेसे लिंबाचा रस मिक्स करून त्याचे सेवन करतात, ज्यामुळे हलके वाटण्यास मदत होते आणि पोटफुगी कमी होते.
तुमच्या नाश्त्यात ओट्स समाविष्ट करा
नाश्त्यात जड तळलेले किंवा खूप मसालेदार पदार्थ खाल्ल्याने पोटात गॅस वाढू शकतो. अशावेळेस सकाळच्या नाश्त्यात ओट्स हा एक चांगला पर्याय मानला जातो. त्यात भरपूर फायबर असतात, तसेच हळूहळू पचतात आणि जास्त काळ पोट भरलेले ठेवतात, ज्यामुळे बद्धकोष्ठता आणि पोटफुगी कमी होते. जर तुम्हाला हलका नाश्ता आवडत असेल तर केळी, सफरचंद किंवा पपई सारखी फळांचा आहारात समावेश करा. ही फळे सहज पचतात आणि पचनास जास्त ताण देत नाहीत. त्यातील फायबरचे प्रमाण पचन सुधारते आणि गॅस कमी करते.
भिजवलेले ड्रायफ्रुट्स फायदेशीर ठरतील
सकाळी रिकाम्या पोटी रात्रभर भिजवलेले बदाम, मनुका किंवा अक्रोड खाणे देखील पोटासाठी चांगले मानले जाते. त्यात हे भिजवलेले ड्रायफ्रुट्स पचनास मदत करतात आणि आपल्या शरीराला आवश्यक पोषक तत्वे प्रदान करतात, ज्यामुळे बद्धकोष्ठता आणि पोटफुगी दूर होते.
याव्यतिरिक्त दह्यासारखे प्रोबायोटिक पदार्थ आतड्यांमधील चांगल्या बॅक्टेरियांना संतुलित करण्यास मदत करतात. नाश्त्यात दही किंवा इडली आणि ढोकळा सारखे आंबवलेले पदार्थ कमी प्रमाणात समाविष्ट केल्याने आतड्यांचे आरोग्य सुधारते आणि गॅस कमी होतो. सकाळी साधे नारळ पाणी प्यायल्याने देखील शरीर हायड्रेट राहते आणि पोट थंड होते. नारळ पाणी गॅस आणि आम्लता कमी करण्यास मदत करते.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
