AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुमचं मूलही सतत चिडचिड करतंय का ? या व्हिटॅमिनच्या कमतरतेचा असू शकतो परिणाम

शरीरात व्हिटॅमिनची कमतरता असेल तर न्यूरोलॉजिलकल हेल्थवर परिणाम होऊ शकतो. यामुळे मुलांचा स्वभाव बजलू शकतो. क्वचित ती चिडचिडीही होऊ शकतात. त्यासाठी खाण्यापिण्याकडे योग्य लक्ष देणे महत्वाचे असते.

तुमचं मूलही सतत चिडचिड करतंय का ? या व्हिटॅमिनच्या कमतरतेचा असू शकतो परिणाम
| Updated on: Jun 22, 2023 | 3:39 PM
Share

Vitamin deficiency : तुमचं मूल अचानक चिडचिड करू लागलं आहे का ? खेळता खेळता मूल अचानकच (grumpy child) रागवायला लागलं आहे का ? तुम्हालासुद्धा ही लक्षण दिसू लागली असतील तर त्याकडे वेळीच लक्ष द्यावे. मुलांची चिडचिड वाढणे, (angry child) रागावणे ही सर्व व्हिटॅमिनच्या कमतरतेची लक्षणे आहेत. व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे हा त्रास होऊ शकतो. आपल्या शरीराची न्यूरोलॉजिकल हेल्थ उत्तम राखण्यासाठी हे व्हिटॅमिन अतिशय गरजेचे असते.

शरीरात व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता निर्माण झाल्यास त्याचा थेट परिणाम मुलांच्या आरोग्यावर आणि वागण्यावर होतो. त्यांचा स्वभाव चिडचिडा होऊ शकतो. खाण्यापिण्याकडे पुरेसे लक्ष न देणे तसेच काही प्रकरणात अनुवांशिक कारणांमुळेही मुलांमध्ये व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता निर्माण होऊ शकते. हे नेमके का होते व त्याची लक्षणे काय हे जाणून घेऊया.

व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे निर्माण होऊ शकतात न्यूरोलॉजिकल समस्या

डॉक्टरांच्या सांगण्यानुसा, व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेचा आपल्या मुलांच्या न्यूरोलॉजिकल आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. यामुळे त्यांना नेहमी थकवा येणे तसेच कमी भूक लागणे अशा समस्याही जाणवू शकतात. ज्या मुलांमध्ये व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता असते ती मुलं चिडचिडी होऊ शकतात, सतत रागावू शकतात. तुमच्या मुलांमध्येदेखील ही सर्व लक्षणे दिसली तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे उत्तम ठरते.

कशामुळे निर्माण होते व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता ?

खाण्यापिण्याकडे नीट लक्ष दिले गेले नाही तर व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता निर्माण होऊ शकतो. पण काही प्रकरणांत हा त्रास अनुवांशिक कारणांमुळेही होऊ शकतो. तुमच्या मुलांतही ही लक्षणे दिसत असतील किंवा तर त्यांची ब्लड टेस्ट करून घ्यावी. जेणेकरून नक्की काय त्रास आहे, हे व्हिटॅमिन कमी आहे की नाही हे नीट समजू शकेल. त्यानुसार डॉक्टर्स योग्य औषधे आणि सप्लीमेंट्स देऊ शकतील.

कमतरता कशी पूर्ण करावी ?

व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता पूर्ण करण्यासाठी, मुलांच्या आहाराकडे काटेकोरपणे लक्ष देणे आवश्यक आहे. यासाठी मुलांच्या आहारात दूध, अंडी, मासे यांचा समावेश करता येईल. जर तुमची मुलं नॉनव्हेज खात नसतील तर प्रत्येक ऋतूनुसार उपलब्ध असलेल्या हिरव्या भाज्या आणि फळे आहारात यांचा आहारात अव्शय समावेश करावा.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

सुरेश धसांकडून तीन हल्ले! मेहबूब शेख यांचा गंभीर आरोप
सुरेश धसांकडून तीन हल्ले! मेहबूब शेख यांचा गंभीर आरोप.
इंडिगोला दणका! डीजीसीएची कारणे दाखवा नोटीस
इंडिगोला दणका! डीजीसीएची कारणे दाखवा नोटीस.
तो एक व्हिजन असलेला प्रतिनिधी! शिंदेंकडून लेकाचं कौतुक
तो एक व्हिजन असलेला प्रतिनिधी! शिंदेंकडून लेकाचं कौतुक.
सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार
सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार.
रवींद्र चव्हाणांशी चर्चेनंतर शिंदेंची आक्रमक देहबोली!
रवींद्र चव्हाणांशी चर्चेनंतर शिंदेंची आक्रमक देहबोली!.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.