Big News: चीननंतर आता इंग्लंडमध्येही कोविडच्या रुग्णांमध्ये पुन्हा 77 टक्क्यांची अचानक वाढ, भारतालाही सावध रहावं लागणार?

| Updated on: Mar 16, 2022 | 10:12 AM

कोरोना विषाणूच्या (Corona) संसर्गाचं संकट कमी झाल्याने जगाने सुटकेचा निश्वास घेतला होता. मात्र, आता परत एकदा जगाचे टेन्शन वाढवणारी बातमी पुढे येते आहे. कोरोना विषाणू संसर्गाची सुरुवात झालेल्या चीनमध्ये (China) कोरोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने परत एकदा धोका निर्माण झालेला असतानाच आता इंग्लंडमध्ये कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे.

Big News: चीननंतर आता इंग्लंडमध्येही कोविडच्या रुग्णांमध्ये पुन्हा 77 टक्क्यांची अचानक वाढ, भारतालाही सावध रहावं लागणार?
कोविड प्रतिबंधात्मक मात्रेच्या किमान कालावधीत कपात; भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाचे निर्देश
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : कोरोना विषाणूच्या (Corona) संसर्गाचं संकट कमी झाल्याने जगाने सुटकेचा निश्वास घेतला होता. मात्र, आता परत एकदा जगाचे टेन्शन वाढवणारी बातमी पुढे येते आहे. कोरोना विषाणू संसर्गाची सुरुवात झालेल्या चीनमध्ये (China) कोरोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने परत एकदा धोका निर्माण झालेला असतानाच आता दुसरी मोठी बातमी पुढे येते आहे. चीन पाठोपाठ आता इंग्लंडमध्येही (England) कोरोना रूग्णांची संख्या ही झपाट्याने वाढताना दिसते आहे. जगातील इतर देशांमध्येही कोरोना रुग्णसंख्या वाढताना दिसते आहे, ही धोक्याची घंटा आहे.

इंग्लंडमध्ये कोरोनाच्या केसेसमध्ये झपाट्याने वाढ

सध्याच्या परिस्थितीत इंग्लंडमध्ये एका आठवड्यात कोरोनाच्या केस 77% ने वाढून 100,000 च्या वर गेल्या आहेत. मात्र, यादरम्यान दिलासादायक बाब म्हणजे मृत्यूचे प्रमाण अगदी कमी आहे. स्कॉटलंडमधील चार दिवसांच्या संसर्ग डेटाचा समावेश आहे, जिथे सातत्याने केस वाढताना दिसत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या माजी अधिकार्‍याने सांगितल्याप्रमाणे येथे ओमिक्रॉन सबवेरिएंटचा संसर्ग आहे. याचदरम्यान कोविड हॉस्पिटलायझेशनमध्ये आठवड्यामध्ये 12.7% वाढ झाली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या माजी अधिकाऱ्याने दिला इशारा

जागतिक आरोग्य संघटनेच्या एका माजी अधिकार्‍याने सांगितले की, BA.2 हा 40 टक्के जास्त संसर्गजन्य आहे. विशेष म्हणजे शास्त्रज्ञांना माहित असलेल्या सर्वात संसर्गजन्य रोगांपैकी एक आहे. यामुळे धोका अधिक निर्माण झाला आहे. यापूर्वी आलेला डेल्टा वेरिएंट हा अधिक धोकादायक होता तर ओमिक्रॉन हा अधिक संक्रमक होता. त्यामुळेच मोठ्या प्रमाणावर लोक संक्रमित झाले होते.

भारताचेही टेन्शन वाढले…! 

आता चीन पाठोपाठ इंग्लंडमध्येही कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ होताना दिसते आहे. तसेच फ्रान्स, नेदरलँड, डेन्मार्क अशा काही देशांमध्ये देखील कोरोनाने डोकेवर काढले आहे. भारतामध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रूग्णांची संख्या कमी झाल्याने दिलासा मिळाला होता. मात्र, चीन आणि इतर देशांमध्ये वाढलेली रूग्ण संख्या पाहता काळजी घेण्याची गरज आहे. यामुळे भारतालाही सावध भूमिका घेत, कोरोनाने पाय पसरवण्याचा अगोदरच उपायोजना आखाव्या लागणार आहेत.

संबंधित बातम्या : 

Pregnancy Diet : गरोदर आहात, सिजर टाळायचे आहे? मग ‘या’ फळांचा आहारात समावेश नक्की करा!

नागरिकांनो काळजी घ्या…! कोकणात पुढील 3 दिवस उष्णतेची लाट, उष्माघाताची लक्षणे, उपाय आणि काय करू नये हे जाणून घ्या!