Pregnancy Diet : गरोदर आहात, सिजर टाळायचे आहे? मग ‘या’ फळांचा आहारात समावेश नक्की करा!

प्रत्येक महिलेसाठी आई होणे ही जगातील सर्वात सुंदर भावना आहे. गर्भावस्थेच्या 9 महिन्यांचा प्रवास खूप कठीण असतो. या दरम्यान शरीरात अनेक बदल होतात. गर्भधारणेदरम्यान महिलांनी त्यांच्या आरोग्याची अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. गरोदरपणात ताजी फळे खाणे फार महत्वाचे आहे.

Pregnancy Diet : गरोदर आहात, सिजर टाळायचे आहे? मग 'या' फळांचा आहारात समावेश नक्की करा!
गरोदरपणामध्ये या फळांचा आहारात समावेश करा.
Follow us
| Updated on: Mar 15, 2022 | 11:32 AM

मुंबई : प्रत्येक महिलेसाठी आई होणे ही जगातील सर्वात सुंदर भावना आहे. गर्भावस्थेच्या (Pregnancy) 9 महिन्यांचा प्रवास खूप कठीण असतो. या दरम्यान शरीरात अनेक बदल होतात. गर्भधारणेदरम्यान महिलांनी (Women) त्यांच्या आरोग्याची अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. गरोदरपणात ताजी फळे खाणे फार महत्वाचे आहे. आई आणि बाळ दोघांच्याही आरोग्यासाठी ते आवश्यक आहे. विशेष म्हणजे फळांमध्ये अनेक जीवनसत्त्वे आणि पोषक घटक असतात. याव्यतिरिक्त फळे आपल्याला अनेक जीवनसत्त्वे (Vitamins) देतात. चला जाणून घेऊया गरोदरपणात कोणती फळे खाणे आपल्या आरोग्यासाठी जास्त फायदेशीर आहे.

  1. जर्दाळू- जर्दाळूमध्ये विटामिन ए, सी, ई, कॅल्शियम, लोह, पोटॅशियम आणि फॉस्फरस भरपूर प्रमाणात असतात. हे अॅनिमियापासून संरक्षण करण्याचे काम करते. हे मुलाच्या आरोग्यासाठी खूप चांगले आहे.
  2. सफरचंद- गरोदरपणात सफरचंद देखील खूप फायदेशीर आहे. यामध्ये व्हिटॅमिन ए, सी आणि फायबर मुबलक प्रमाणात असते. सफरचंद मुलाचे कोणत्याही प्रकारच्या ऍलर्जीपासून संरक्षण करते. यामुळे याचा दररोजच्या आहारामध्ये नक्की समावेश करा.
  3. आंबा- 1 कप चिरलेला आंबा व्हिटॅमिन ए आणि सीने समृद्ध आहे. हे व्हिटॅमिन सी ची रोजची गरज पूर्ण करते. तसेच मुलाची रोगप्रतिकार शक्ती मजबूत करते.
  4. किवी-  गरोदरपणात हे फळ खाणे खूप फायदेशीर आहे. त्यात जीवनसत्त्वे सी, ई, ए, पोटॅशियम, फॉलिक अॅसिड असते. हे फळ खाल्ल्याने खोकला आणि अस्वस्थतेची समस्या दूर होते.
  5. चिकू- चिकू गर्भधारणेदरम्यान चक्कर येणे आणि मळमळ टाळण्यास मदत करते. अतिसार यांसारख्या पोटाशी संबंधित आजारांची समस्या दूर करण्याचेही हे फळ काम करते.
  6. संत्री- व्हिटॅमिन सी, फोलेट आणि पाणी समृद्ध, संत्री लोह शोषण्यास मदत करते. यामुळे गर्भधाऱणेदरम्यान आपल्या दररोजच्या आहारामध्ये संत्रीचा नक्कीच समावेश करा.
  7. डाळिंब- डाळिंबात भरपूर जीवनसत्त्वे, कॅल्शियम, प्रथिने आणि लोह असते. हे तुम्हाला ऊर्जावान ठेवण्यास मदत करते. तसेच हाडे मजबूत होण्यास मदत होते.
  8. नाशपाती- फायबर, फोलेट आणि पोटॅशियम भरपूर असल्याने नाशपाती गरोदरपणात बद्धकोष्ठता निर्माण करत नाही. यामुळे मुलाचे हृदय निरोगी राहते.

संबंधित बातम्या : 

मधुमेहींनी या गोष्टींपासून दूर रहावे… जाणून घ्या कसा असावा आहार…

Skin Care Tips : दह्यापासून बनवलेले ‘हे’ फेस स्क्रब वापरा आणि चमकदार त्वचा मिळवा!

Non Stop LIVE Update
कलंकित, वाया गेलेला मंत्री; जालन्यातून जरांगेंची पुन्हा भुजबळांवर टीका
कलंकित, वाया गेलेला मंत्री; जालन्यातून जरांगेंची पुन्हा भुजबळांवर टीका.
वयाच्या 48व्या वर्षी प्रमोद महाजनांचा मुलगा राहुल चौथ्यादा करणार लग्न?
वयाच्या 48व्या वर्षी प्रमोद महाजनांचा मुलगा राहुल चौथ्यादा करणार लग्न?.
भाजपच्या स्क्रिप्टनुसार शिंदे बोलतात, मुख्यमंत्र्यांवर कुणाची टीका
भाजपच्या स्क्रिप्टनुसार शिंदे बोलतात, मुख्यमंत्र्यांवर कुणाची टीका.
राजीनाम्याच्या मागणीवर भुजबळ म्हणाले, तर मी एक क्षणसुद्धा थांबणार नाही
राजीनाम्याच्या मागणीवर भुजबळ म्हणाले, तर मी एक क्षणसुद्धा थांबणार नाही.
... तेव्हा दमडी दिली नाही, बुटानं हाणलं पाहिजे, खडसेंचा निशाणा कुणावर?
... तेव्हा दमडी दिली नाही, बुटानं हाणलं पाहिजे, खडसेंचा निशाणा कुणावर?.
ठाकरे शिंदे यांना पुन्हा नालायक म्हणाले अन् मांडली अन्नदात्याची व्यथा
ठाकरे शिंदे यांना पुन्हा नालायक म्हणाले अन् मांडली अन्नदात्याची व्यथा.
... आम्हाला गाफील ठेवलं गेलं, अजितदादांचा त्या गुप्तभेटीवर गौप्यस्फोट
... आम्हाला गाफील ठेवलं गेलं, अजितदादांचा त्या गुप्तभेटीवर गौप्यस्फोट.
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी या जागा लढवणार, अजित दांदानी थेट म्हटलं..
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी या जागा लढवणार, अजित दांदानी थेट म्हटलं...
छगन भुजबळ यांच्या जीवाला धोका? सलग आले १२ धमकीचे मॅसेज अन्...
छगन भुजबळ यांच्या जीवाला धोका? सलग आले १२ धमकीचे मॅसेज अन्....
मुख्यमंत्र्यांसंबंधित प्रकरणात दत्ता दळवींना जामीन, का झाली होती अटक?
मुख्यमंत्र्यांसंबंधित प्रकरणात दत्ता दळवींना जामीन, का झाली होती अटक?.