AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नागरिकांनो काळजी घ्या…! कोकणात पुढील 3 दिवस उष्णतेची लाट, उष्माघाताची लक्षणे, उपाय आणि काय करू नये हे जाणून घ्या!

कोकणात पुढील तीन दिवस उष्णतेची लाट असणार आहे. 15 आणि 17 मार्च दोन दिवसात तापमानाचा (Temperature) पारा जास्त चढणार आहे. हवामान खात्याने तसा इशारा देखील नागरिकांना दिला आहे. दुपारी 12 नंतर उन्हाच्या झळा अधिक तीव्र होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. उष्णतेच्या लाटेपासून वाचण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मार्गदर्शक सुचना जारी केल्या आहेत.

नागरिकांनो काळजी घ्या...! कोकणात पुढील 3 दिवस उष्णतेची लाट, उष्माघाताची लक्षणे, उपाय आणि काय करू नये हे जाणून घ्या!
पुढील तीन दिवस कोकणाचा पारा चढणार. Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Mar 15, 2022 | 9:25 AM
Share

रत्नागिरी : कोकणात (Konkan) पुढील तीन दिवस उष्णतेची लाट असणार आहे. 15 आणि 17 मार्च दोन दिवसात तापमानाचा (Temperature) पारा जास्त चढणार आहे. हवामान खात्याने तसा इशारा देखील नागरिकांना दिला आहे. दुपारी 12 नंतर उन्हाच्या झळा अधिक तीव्र होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. उष्णतेच्या लाटेपासून वाचण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मार्गदर्शक सुचना जारी केल्या आहेत. उष्णतेच्या लाटेपासून (Heat wave) वाचण्यासाठी नागरिकांनी काळजी घेण्याचे आव्हान जिल्हा प्रशासनानं केलंय. जिल्हा प्रशासनाने नेमक्या कोणत्या सूचना नागरिकांना दिलेल्या आहेत, याबद्दल जाणून घेऊयात.

उष्माघाताची प्रमुख लक्षणे

थकवा येणे, ताप येणे, त्वचा कोरडी पडणे, भूक न लागणे, चक्कर येणे, निरुत्साही होणे, डोके दुखणे, रक्तदाब वाढणे, बेचैन अस्वस्थता, बेशुद्धावस्था इत्यादी आहेत. जर या दोन दिवसांमध्ये एखाद्या व्यक्तीला ही लक्षणे आढळली तर संबंधीत व्यक्तीस हवेशीर खोलीत ठेवावे. खोलीत पंखे, कुलर असावे. रुग्णाचे तापमान खाली आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करा. रुग्णास थंड पाण्याने आंघोळ घालावी, रुग्णाच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्यात, जर हे सर्व करूनही रूग्णाच्या शरीराचे तापमान खाली येत नसेल तर लगेचच डाॅक्टरांचा सल्ला घ्यावा.

उष्माघात टाळण्यासाठी हे उपाय करा

उष्माघातामध्ये तहान लागलेली नसली तरीसुद्धा जास्तीत जास्त पाणी प्यावे. हलकी, पातळ सूती कपडे वापरावेत. बाहेर जाताना गॉगल्स, छत्री/ टोपी, बुट यांचा वापर करावा. प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत ठेवावी. उन्हात काम करीत असलेल्या व्यक्तीनी डोक्यावर टोपी किवा छत्रीचा वापर करावा तसेच ओल्या कपड्यांनी डोके, मान व चेहरा झाकावा शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओआरएस, घरी बनविण्यात आलेली लस्सी, लिंबू-पाणी, ताक इत्यादीचा नियमित वापर करावा.

ही लक्षणे दिसत असतील तर लगेचच डाॅक्टरांचा सल्ला घ्या

अशक्तपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम, चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. गुरांना छावणीत ठेवावे तसेच त्यांना पिण्यासाठी पुरेसे पाणी द्यावे. घरे थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर, व सनशेडचा वापर करावा, तसेच थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करावे. कामाच्या ठिकाणी जवळच थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. सूर्यप्रकाशाशी थेट संबंध टाळण्याचे कामगारांना सूचित करावे. पहाटेच्यावेळी जास्तीत जास्त बाहेरील कामे करून घ्यावीत. गरोदर महिला, कामगार व आजारी लोकांनी अधिक काळजी घ्यावी. रस्त्याच्या कडेला उन्हापासून संरक्षणाकरिता शेड उभारावेत. जागोजागी पाणपोईची सुविधा उभारावी.

उष्माघातामध्ये या गोष्टी अजिबात करू नका!

लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या किंवा पार्क केलेल्या वाहनात ठेऊ नयेत. दुपारी 12.00 ते 3.30 कालावधीत उन्हात बाहेर जाणे टाळावे. गडद, घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे. बाहेर तापमान अधिक असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावीत. उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळावे तसेच मोकळ्या हवेसाठी स्वयंपाक घराची दारे व खिडक्या उघडावी. शक्यतो दुपारच्या वेळी घरामध्येच राहा.

संबंधित बातम्या : 

आजपासून दहावीच्या बोर्डाची परीक्षा, एका तासापुर्वीच परीक्षा केंद्रावर उपस्थित राहण्याची सुचना

शेतीला दिवसा वीज द्या अन्यथा वीज खरेदीतील घोटाळा बाहेर काढू, राजू शेट्टी यांचा इशारा

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.