Diet For Immunity: कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटपासून वाचायचं असेल तर आजपासूनच खा ‘हे’ पदार्थ

मानसी मांडे,  Tv9 मराठी

Updated on: Dec 26, 2022 | 2:39 PM

चीनमध्ये कोरोनाने हाहाकर माजवला असून जगभरातील रुग्ण पुन्हा वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर भारतातही हाय अलर्ट असून कोरोनापासून बचाव करायचा असेल रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यावर भर दिला पाहिजे. त्यासाठी काही पदार्थांचा आहारात समावेश करता येऊ शकतो.

Diet For Immunity: कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटपासून वाचायचं असेल तर आजपासूनच खा 'हे' पदार्थ
Image Credit source: Freepik

नवी दिल्ली – चीनमध्ये कोरोनाच्या (corona) वाढत्या केसेसच्या पार्श्वभूमीवर भारतही सतर्क झाला असून अनेक नवे नियम जारी करण्यात आले आहेत. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सरकारतर्फे पाऊले उचलण्यात येत असून लोकांनाही सावध राहण्यास सांगितले जाते. कोरोनाचा नवा BF.7 हा व्हेरिएंट (new variant) धोकादायक असून त्यापासून बचाव करण्यासाठी मजबूत रोगप्रतिकारक शक्ती आवश्यक आहे. थंडीच्या दिवसात रोगप्रतिकारक शक्ती (immunity) कमकुवत होते,ज्यामुळे लोक सहजपणे संसर्गाचे शिकार होऊ शकतात. काही पदार्थांचा आहारात समावेश केल्याने तुम्ही रोगप्रतिकारक शक्ती वाढवू शकता.

हळद – औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेली हळद आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरते. त्यामध्ये असलेले अँटी-बॅक्टेरिअल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी खूप प्रभावी ठरतात. याशिवाय हळदीच्या सेवनाने सर्दी, खोकला, घसा खवखवणे, ताप इत्यादीपासून आराम मिळतो. कोरोनापासून बचाव करण्यासाठी दररोज दुधात हळद मिसळून पिणे फायदेशीर ठरेल.

पालक – हिरव्या पालेभाज्या आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. हिवाळ्यात अनेक प्रकारच्या हिरव्या पालेभाज्या मुबलक उपलब्ध असतात. त्यापैकीच एक भाजी म्हणजे पालक, हा रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठीही खूप फायदेशीर आहे. पालकामध्ये अनेक पौष्टिक तत्वं असतात, तसेच रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि आपल्या दृष्टीसाठी फायदेशीर आहे. पालकामध्ये असलेले व्हिटॅमिन सी, झिंक वॉलेट आणि अँटीऑक्सिडंट्स आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात.

अंडी – अंड्यांमध्ये जीवनसत्त्वे, ओमेगा 3 फॅटी ॲसिड आणि खनिजे इत्यादींनी भरपूर प्रमाणात असल्याने ती रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी खूप फायदेशीर आहेत. अंड्यांचे नियमित सेवन केल्याने केवळ प्रतिकारशक्तीच मजबूत होत नाही तर ऊर्जाही मिळते. कोरोनापासून बचाव करण्यासाठी आहारात अंड्यांचा समावेश करणे फायदेशीर ठरू शकते.

सुका मेवा /ड्राय फ्रुट्स – खीर किंवा गोड पदार्थांमध्ये वापरण्यात येणारे ड्राय फ्रूट्स हे कोरोनाला रोखण्यासाठी फायदेशीर ठरतील. ड्रायफ्रुट्स ही प्रथिने, जीवनसत्त्वे, अँटी-ऑक्सिडंट्स आणि खनिजे यांसारख्या पोषक तत्वांनी समृद्ध असतात. ती खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासोबतच शरीराला ऊर्जाही मिळते.

व्हिटॅमिन सी – व्हिटॅमिन सीने समृद्ध असलेली लिंबूवर्गीय फळे आपल्या प्रतिकारशक्तीसाठी खूप फायदेशीर ठरतात. व्हिटॅमिन सी आपल्या शरीराला संसर्गाशी लढण्यास मदत करते. अशा परिस्थितीत, कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी आपण आहारात संत्री, मोसंबी, पेरू, आवळा, लिंबू, किवी या फळांचा नक्कीच समावेश करू शकता.

हे सुद्धा वाचा

(डिस्क्लेमर- संबंधित विकारांची प्राथमिक माहिती, लक्षणे, तसेच काय करता येईल, याची माहिती देण्याचा आमचा हा प्रयत्न आहे, पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI