AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India Covid Cases: 7 महिन्यानंतर उच्चांक मोडला, देशातील रुग्णवाढ लाखांच्या पार, काय सांगते आकडेवारी?

गुरुवारी कोरोनाचे देशभरात तब्बल 1 लाख पेशंट आढळून आले. बुधवारच्या तुलनेतील ही आकडेवारी 28 टक्क्यांनी जास्त आहे. भारतात जवळपास सात महिन्यानंतर एवढी रुग्णवाढ दिसून आली आहे.

India Covid Cases: 7 महिन्यानंतर उच्चांक मोडला, देशातील रुग्णवाढ लाखांच्या पार, काय सांगते आकडेवारी?
प्रातिनिधिक छायाचित्र
| Edited By: मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Jan 07, 2022 | 12:29 PM
Share

नवी दिल्लीः देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येचा मागील आठच दिवसात मोठा विस्फोट झालेला पहायला मिळतोय. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी स्थानिक पातळीपासून राष्ट्रीय स्तरापर्यंत खबरदारी घेतली जात असतानाही रुग्णवाढीचा वेग देशाला धडकी भरवणारा आहे. गुरुवारी कोरोनाचे देशभरात तब्बल 1 लाख पेशंट आढळून आले. बुधवारच्या तुलनेतील ही आकडेवारी 28 टक्क्यांनी जास्त आहे. भारतात जवळपास सात महिन्यानंतर एवढी रुग्णवाढ दिसून आली आहे. सात महिन्यांपूर्वी म्हणजे 6 जूनला भारतात 1 लाखाहून अधिक रुग्ण आढळले होते. ही वाढ फक्त मागील आठ दिवसातच झाली आहे. आठ दिवसांपूर्वी भारतातील कोरोना रुग्णांची संख्या फक्त 10 हजार एवढी होती, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

काय आहे आकडेवारी?

– देशात बुधवारी 1 लाख 17 हजार 100 रुग्ण आढळले. – आतापर्यंत देशात 3 कोटी 52 लाख 26 हजार 386 कोरोनाबाधित रुग्ण आढळले. – सक्रीय रुग्णांची संख्या देशात 3 लाख 71 हजार एवढी आहे. – भारतात मागील 24 तासात 302 रुग्णांचा मृत्यू झाला. तर आतापर्यंत कोरोनामुळे 4 लाख 83 हजार लोकांचा मृत्यू झाला. – भारतातील कोरोनाचा रिकव्हरी रेट 97.57 टक्के एवढा आहे.

वेगानं फैलाव होणाऱ्या राज्यांची स्थिती काय?

महाराष्ट्रात- 36 हजार 235 पश्चिम बंगाल- 15 हजार 421 दिल्ली- 15 हजार 97, तमिळनाडू- 6 हजार 983 कर्नाटकात 5 हजार 31 रुग्ण आढळले. महाराष्ट्रातील आकडेवारी चिंताजनक असून एकूण रुग्णसंख्येपैकी 30.97 टक्के रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत.

इतर बातम्या-

Binge Watch | ‘पुष्पा’ ते ‘द टेंडर बार’ पर्यंत, पाहा या आठवड्यात OTT वर काय काय प्रदर्शित होणार?

Sphatik Mala | स्फटिक माळेचे जादूई उपयोग तुम्हाला माहीत आहेत का ? आजच वापरुन पाहा

Follow Us
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी राज-उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा