India’s Strongest Bodybuilder: भारताचा सर्वाधिक मजबूत बॉडीबिल्डर! जाणून घ्या, कोण होता हा बॉडीबिल्डर ज्याने तुरुंगात राहून कमावले पिळदार शरीर

स्टंटमॅन म्हणून आपल्या करिअरची सुरवात करणाऱ्या भारतातील सर्वात वयस्कर बॉडीबिल्डरचे नाव मनोहर आयीच होते, ज्याचे 2016 मध्ये निधन झाले. कोण होते मनोहर आयीच? मनोहर आयीच यांनी कोणते विजेतेपद जिंकले? मनोहर आयीच यांचा आहार आणि व्यायामाचा दिनक्रम काय होता? याबाबत जाणून घ्या, सविस्तर माहिती.

India's Strongest Bodybuilder: भारताचा सर्वाधिक मजबूत बॉडीबिल्डर! जाणून घ्या, कोण होता हा बॉडीबिल्डर ज्याने तुरुंगात राहून कमावले पिळदार शरीर
भारताचा सर्वाधिक मजबूत बॉडीबिल्डर!
Follow us
| Updated on: Sep 03, 2022 | 8:40 PM

भारतात असे एकापेक्षा एक बॉडीबिल्डर (Bodybuilder) झाले आहेत. ज्यांनी, परदेशात देशाचे नाव कमावले आहे. जिथे पूर्वीच्या काळी कुस्ती-मल्लविद्या होत असत, आजच्या काळात त्यांची जागा बॉडी बिल्डिंगने घेतली आहे. आपली शरीरयष्टी मजबूत आणि पिळदार घडवून अनेक देशी पैलवानांनी परदेशी पैलवानांना चीत केले होते. अशाच भारतातील सर्वात वयस्कर (the oldest) अशा शरीरसौष्ठवपटूचे नाव मनोहर आयीच होते. मनोहर आयीच हे एक नाव आहे जे आपल्यापैकी अनेकांना माहीत नसेल. परंतु आम्ही तुम्हाला सांगतो की, त्यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत तीन सुवर्णपदके (Three gold medals) जिंकली होती. मिस्टर युनिव्हर्सचा (Mr Universe) किताब पटकावणारे ते, दुसरे भारतीय क्रीडापटू ठरले. त्यांचा अगदी साधा आहार असताना त्यांनी आपले शरीर अशा प्रकारे पिळदार घडवले होते की, त्याच्यासमोर भले-भले पैलवान अपयशी ठरले. कोण होते मनोहर आयीच? मनोहर आयीच यांनी कोणते विजेतेपद जिंकले? मनोहर आयीच यांचा आहार आणि व्यायामाचा दिनक्रम काय होता?

कोण होते मनोहर आयीच

Newyorktimes च्या मते, मनोहर आयीच यांचा जन्म 17 मार्च 1913 रोजी कोमिल्ला जिल्ह्यातील पुतिया गावात झाला होता. तो त्यावेळी ब्रिटिश शासीत भारताचा भाग होता. आता बांगलादेशमध्ये आहे. मनोहर आयीच यांनी महान जादूगार पीसी सोरकर यांच्यासोबत स्टंटमॅन म्हणून करिअरची सुरवात केली. ते प्रेक्षकांना त्याच्या दातांनी स्टीलचे बार वाकवून दाखवत होते. त्याचप्रमाणे 1000 पानांचे जाडजूड पुस्तक आपल्या हातांनी फाडू शकत होते. ते ‘पॉकेट हरक्यूलिस’ या नावाने प्रसिद्ध होते. मनोहर आयीच यांनी वयाच्या 39 व्या वर्षी बॉडी बिल्डिंग सुरू केली. त्यानंतर मिस्टर युनिव्हर्स स्पर्धा जिंकली. वर्ष 1951 मध्ये, मिस्टर युनिव्हर्स स्पर्धेत त्यांनी दुसरे स्थान पटकावले. पुढच्‍याच वर्षी ( 1952 मध्ये) त्यांनी उत्कृष्ट कामगिरीसह मिस्टर युनिव्हर्सचा किताब जिंकला. 1951 (नवी दिल्ली), 1954 (मनिला) आणि 1958 (टोकियो) मध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत त्यांनी तीन सुवर्णपदके जिंकली. तोपर्यंत तो बॉडी बिल्डिंगच्या स्पर्धांमध्ये भाग घेऊन त्या जिंकत राहिले. मनोहर आयीच यांनी 2003 मध्ये शेवटची बॉडी बिल्डिंग स्पर्धा खेळली होती. त्यावेळी त्यांचे वय 90 वर्षे होते.

हवाई दलात सामील झाले

मनोहर आयीच 1942 मध्ये हवाई दलात दाखल झाले होते. पण एका ब्रिटिश अधिकाऱ्याला कानशिलात मारल्याबद्दल त्यांना तुरुंगात टाकण्यात आले होते. तुरुंगात असताना मनोहर आयीच 12 तास वेटलिफ्टींगचा सराव करायचे. त्यासाठी ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्यांच्यासाठी खास आहाराची व्यवस्था केली. त्यांच्या चांगल्या वागणुकीमुळे एक-दोन वर्षांनी त्यांची सुटका झाली. त्याने तुरुंगात बनवलेल्या शरीरासह 1950 मध्ये मिस्टर हरक्यूलिस स्पर्धा जिंकली.

हे सुद्धा वाचा

मनोहर आयीच नारळ विकायचे

मनोहर आयीच यांचे वडील आजारी पडल्यावर त्यांनी स्टंट करायला सुरवात केली. तलवारीच्या जोरावर शरीराचा तोल सांभाळायचे चित्तथरारक स्टंट ते करायचे. एकदा स्टंट दाखवताना झालेल्या चुकीमुळे त्याच्या मानेवर दुखापत झाली होती. कलकत्त्याला गेल्यावर पैसे मिळवण्यासाठी त्यांनी रेल्वे स्टेशनवर नारळ विकून पोट भरले. मिस्टर आयीच हे भारतातील प्रसिद्ध शरीरसौष्ठवपटू प्रेमचंद डोग्रा यांच्यापेक्षा इतके लहान होते की त्यांनी नवी दिल्लीतील एका स्पर्धेदरम्यान (1993) मनोहर आयीचला खांद्यावर उचलले. मिस्टर आयीच यांनी 1951 मध्ये लंडनमधील त्यांच्या पहिल्या मिस्टर युनिव्हर्स स्पर्धेत भाग घेतला, ज्यामध्ये त्यांनी दुसरे स्थान मिळवले. यानंतर, लंडनमध्ये एक वर्ष प्रशिक्षण घेतल्यानंतर आणि ब्रिटिश रेल्वेमध्ये काम केल्यानंतर, त्यांनी 1952 मध्ये पुन्हा मिस्टर युनिव्हर्स स्पर्धेत भाग घेतला आणि तो विजेता ठरले. इतके पुरस्कार जिंकूनही मनोहर आयीच यांना पैशाची अडचण होती पण त्यांनी त्याबद्दल कधीही तक्रार केली नाही.

डाएट आणि वर्कआउट (Manohar’s Diet and Workout)

मनोहर आयीच शारीरिक आणि तात्त्विकदृष्ट्या खूप मजबूत असल्याचे म्हटले जाते. त्याने कधीही मद्यपान व धूम्रपान केले नाही. ते नेहमी तांदूळ, मासे, भाज्या, कडधान्ये, फळे, दूध यांचे सेवन करत असत. व्यायामाबद्दल बोलायचे झाले तर ते आधुनिक व्यायाम टाळायचे. फक्त देशी व्यायाम करायचे. एकावेळी हजार पुशअप्स आणि सूर्यनमस्कार करत असतं.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.