AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वजन कमी करण्यासाठी धावणे चांगले की चालणे ? जास्त परिणामकारक काय ?

वजन कमी करण्याचे दोन सर्वात लोकप्रिय मार्ग म्हणजे धावणे आणि चालणे. या दोन पद्धतींपैकी कोणती पद्धत अधिक चांगली आहे, हे जाणायचे असेल तर हा लेख तुमच्यासाठी आहे. चला तर मग जाणून घेऊया, धावणे की चालणे, यांपैकी सर्वात अधिक चांगले काय ?

वजन कमी करण्यासाठी धावणे चांगले की चालणे ? जास्त परिणामकारक काय ?
Walking v/s Running
| Updated on: Mar 19, 2026 | 6:07 PM
Share

वजन कमी करायचे असेल तर सर्वांच्या समोर चालणे किवा धावणे हे दोन पर्याय असतात. लोकांना नेहमीच वाटते जेवढा वेगवान आणि जास्त मेहनत होणारा व्यायाम असेल तेवढे लवकर वजन कमी होते. परंतू प्रत्येकाला धावणे जमेल असे नाही. अनेक लोक लवकर थकतात. गुडघे दुखी मुळे किंवा स्टॅमिनाची कमतरता यामुळे लोक वेगाने धावू शकत नाहीत. त्यामुळे केवळ वेगाने चालणे हे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे का ? असा प्रश्न मनात तयार होतो.

मात्र, फिटनेसच्या बाबतीत चालणे आणि धावणे यांच्या वेगवेगळे फायदे आहेत. हे संपूर्णपणे व्यक्तीचे शरीर आणि लाईफस्टाईलवर अवलंबून असते. रनिंगमुळे कॅलरी वेगाने बर्न होत असते. तर वॉकिंग बराच काळ सहज करता येते. त्यामुळे चालणे हा अनेकांसाठी जास्त टीकाऊ आणि सुरक्षित पर्याय बनतो. चला तर या आर्टिकलमध्ये पाहूयात. धावण्यापेक्षा चालणे बेस्ट आहे का ?

वजन कमी करण्यासाठी रनिंग की वॉकिंग बेस्ट ?

वजन कमी करण्यासाठी धावणे आणि चालण दोन्हींना परिणामकारक मानले जाते. परंतू संशोधन सांगते की यांचा परिणाम वेगवेगळ्या प्रकारे होत असतो. कोणता पर्याय चांगला ठरतो हे तुमचे शरीर, वेळ आणि निरंतरता यावर ठरत असते.  Journal of Obesity study  मध्ये प्रसिद्ध झालेल्या स्टडीनुसार धावणाऱ्या लोकांमध्ये समान अंतर पार केल्यानंतर वॉकिंग करणाऱ्यांच्या तुलनेत जास्त वेगाने वजन आणि बॉडी फॅट कमी होते. जर तुम्ही कमी वेळात जास्त कॅलरी बर्न करु इच्छीत असाल तर रनिंग जास्त महत्वाची मानली जाते.

परंतू दुसरीकडे हार्वर्ड मेडिकल स्कुलच्या अहवालानुसार ७० किलो वजनवाल्या व्यक्ती ३० मिनिटे रनिंग केल्याने सुमारे ३०० कॅलरी बर्न करु शकतात. मात्र त्याच वेळात वेगाने चालण्याने सुमारे १४० ते १६० कॅलरी बर्न होऊ शकतात. त्यामुळे स्पष्ट होते की रनिंग जेवढे इंटेंसिटीने जास्त तेवढ्या वेगाने रिजल्ट देऊ शकते.

वॉकिंग कमी परिणामकारक असते ?

अशांत प्रश्न उठतो की वॉकिंग कमी परिणामकारक असते का ? त्याचे उत्तर आहे की ‘नाही’… अभ्यासाच्या मते जर नियमित रुपाने योग्य वेगाने ( brisk walking ) आणि दीर्घकाळ चालले तर वजन घटवण्यात खूप मदतगार सिद्ध होऊ शकते. खासकरुन सुरुवातीच्या लोकांत, जास्त वजन असणाऱ्या व्यक्ती वा जॉईंट पेनने त्रस्त असणारे लोकांसाठी वॉकींग जास्त सुरक्षित आणि टिकाऊ ऑप्शन असते.

दोन्हीत जास्त परिणामकारक काय ?

रनिंग आणि वॉकींगमध्ये वजन कमी करण्यास जास्त चांगले काय हे निवडणे कठीण आहे. कारण दोन्हींचे वेगवेगळे फायदे आणि रिझल्ट आहेत. उदा. कमी वेळा जास्त कॅलरी बर्न करायची आहे तर धावणे हा उत्तम पर्याय आहे. मात्र, तुम्हाला हळूहळू वजन कमी करायचे असेल तर कंसटेंट रहायचे असेल तर चालणे फायद्याचे आहे. तुम्ही किती नियमितपणे आणि किती वेळ एक्सरसाईज करता यावर हे चालणे की धावणे योग्य आहे हे ठरवता येते. जर तुम्ही रोज ४५ ते ६० मिनिटे वेगाने चालत असाल तर तेवढीच कॅलरी बर्न करता जेवढी कमी वेळात धावण्याने होते.

Follow Us
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...
महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
Sanjay Raut | महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... संजय राऊतांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल
मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या...
Radhakrishna Vikhe Patil | मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या संसदेत मिळवलं स्थान
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त