AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Black Eggs vs White Eggs : काळं अंड विरुद्ध सफेद अंड, प्रोटीनमध्ये खरा बादशाह कोण? कुठलं अंड शरीरासाठी जास्त फायद्याचं? जाणून घ्या

Black Eggs vs White Eggs : आता काळ्या अंड्यांची सुद्धा चर्चा आहे. तुम्ही या बद्दल ऐकलं असेल किंवा सोशल मीडियावर पाहिलं असेल. सफेद अंड्यांपेक्षा काळी अंडी वेगळी दिसतात. याचं कवच काळं असतं.

Black Eggs vs White Eggs : काळं अंड विरुद्ध सफेद अंड, प्रोटीनमध्ये खरा बादशाह कोण? कुठलं अंड शरीरासाठी जास्त फायद्याचं? जाणून घ्या
black eggs vs regular white eggs
| Updated on: Nov 06, 2025 | 3:51 PM
Share

आजकाल लोक आपल्या प्रकृतीबद्दल जास्त सर्तक झालेत. सोप्या शब्दात सांगायच झाल्यास कधी काय खायचं? लोक याची काळजी घेतात. बहुतांश लोक पौष्टिक फूड्‍सला प्रोत्साहन देतात. यात अंडी सुद्धा आहेत. मार्केटमध्ये सफेदपासून तपकिरी रंगाची अंडी उपलब्ध आहेत. आता काळ्या अंड्यांची सुद्धा चर्चा आहे. तुम्ही या बद्दल ऐकलं असेल किंवा सोशल मीडियावर पाहिलं असेल. सफेद अंड्यांपेक्षा काळी अंडी वेगळी दिसतात. याचं कवच काळं असतं. यात जास्त प्रोटिन, विटामिन आणि मिनरल्स असतात. केस, स्कीन आणि इम्युनिटीसाठी हे विटामिन्स चांगले असतात. सफेद, तपकिरी आणि काळी अंडी यात वेगळेपण काय? यात जास्त प्रोटीन असतं की नाही? जाणून घेऊया.

काळी अंडी कडकनाथ कोंबडीची असतात. भारतात आढळणाऱ्या कोंबड्या खास प्रजातीच्या आहेत. काळे पंख, ब्लॅक मीट आणि डार्क कलर. कडकनाथ कोंबडी मध्य प्रदेशच्या आदिवासी भागात आढळते. या कोंबडीची अंडी जास्त स्वादिष्ट, जास्त प्रोटीन आणि कमी फॅटची असतात. पण फिटनेसची आवड असणाऱ्या लोकांना ही अंडी आवडतात.

कडकनाथ अंडी शानदार ऑप्शन

कडकनाथ अंडी पोषणाच्या बाबतीत इतर नॉर्मल अंड्यांपेक्षा पुढे आहेत. 100 ग्रॅम काळ्या अंड्यात जवळपास 15.6 ग्रॅम प्रोटीन असतं. सफेद आणि तपकिरी अंड्याच्या तुलनेत हे प्रमाण दुप्पट आहे. त्याशिवाय यात फॅट (1 ग्रॅम)आणि कोलेस्ट्रॉल (180 मिलीग्रॅम) खूप कमी आहे.नॉर्मल अंड्यामध्ये फॅट जवळपास 5.8 ग्रॅम आणि कोलेस्ट्रॉल 372 मिलीग्रॅम आहे. जर, तुम्ही जिममध्ये जाता. मसल्स बनवायचेत, वजन कंट्रोलमध्ये ठेवायचय, तर कडकनाथ शानदार ऑप्शन आहे. फक्त यात प्रोटीनच नाही, तर हेल्दी सुद्धा आहेत.

कडकनाथ अंड्यात काय असतं?

कडकनाथ अंड्यात फक्त प्रोटीनच नाही, तर विटामिन, मिनरल आणि अमीनो एसिड्सचा सुद्धा चांगला सोर्स आहे. यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. सर्वप्रथम रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. म्हणजे शरीर वेगवेगळ्या आजारांशी उत्तम प्रकारे लढू शकतं. सोबतच स्नायू मजबूत होतात.

कुठली अंडी जास्त फायद्याची?

काळी आणि सफेद दोन्ही अंडी शरीरासाठी फायद्याची आहेत. पण पोषण क्वालिटीचा विषय असेल, तर कडनाथ अंडी खूप पुढे आहेत. यात नॉर्मल अंड्यापेक्षा जास्त प्रोटीन, कमी फॅट आणि एंटीऑक्सीडेंट्स घटक आहेत. त्यामुळे शरीर अजून मजबूत होतं.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.