AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या वाईट सवयींमुळे किडनीचे होते नुकसान

प्रत्येक मनुष्याने आपल्या मूत्रपिंडाच्या आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे आहे, तसे न केल्यास त्याला आपला जीव गमवावा लागू शकतो. चला तर मग जाणून घेऊया अशा कोणत्या वाईट सवयी आहेत ज्यामुळे मूत्रपिंडाचे/ किडनीचे नुकसान होते.

या वाईट सवयींमुळे किडनीचे होते नुकसान
Kidney HealthImage Credit source: Social Media
| Updated on: Mar 09, 2023 | 2:12 PM
Share

सध्या मूत्रपिंडाचे आजार पूर्वीपेक्षा जास्त वाढले आहेत. जर आपली किडनी खराब झाली तर फिल्टरिंग प्रक्रियेवर शरीराचा वाईट परिणाम होतो, ज्यामुळे विषारी पदार्थ बाहेर पडत नाहीत. अशा वेळी इतर अनेक आजारांचा धोका वाढतो. प्रत्येक मनुष्याने आपल्या मूत्रपिंडाच्या आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे आहे, तसे न केल्यास त्याला आपला जीव गमवावा लागू शकतो. चला तर मग जाणून घेऊया अशा कोणत्या वाईट सवयी आहेत ज्यामुळे मूत्रपिंडाचे/ किडनीचे नुकसान होते.

सिगारेट, हुक्का, बिडी आणि गांजा यासारख्या गोष्टी पिणे शरीराच्या सर्वांगीण आरोग्यासाठी हानिकारक आहे, यामुळे आपल्या मूत्रपिंडाचेही खूप नुकसान होते कारण यामुळे मूत्रपिंडावर दबाव पडतो. धूम्रपान केल्याने रक्तवाहिन्यांवर परिणाम होतो, रक्ताभिसरणावर परिणाम होतो, ज्यामुळे मूत्रपिंडाचे नुकसान होते.

मूत्रपिंडाच्या आरोग्यावर आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींचा सर्वाधिक परिणाम होतो, म्हणून मूत्रपिंडासाठी फायदेशीर असा आहार निवडा. सतत जंक फूड खाल्ल्याने मूत्रपिंडाचे नुकसान होऊ शकते. आपण त्वरित आपल्या आहारातून प्रोसेस्ड फूड आणि सोडियम युक्त अन्न वगळले पाहिजे.

आळस सोडा! जर तुम्ही आळशी असाल तर तुम्ही नक्कीच कुठेतरी तुमच्या मूत्रपिंडाचे नुकसान करत आहात. दररोज व्यायाम किंवा शारीरिक हालचाल होणे आवश्यक आहे. यामुळे वजन नियंत्रणात राहील आणि रक्तदाब नीट राहिल्याने मूत्रपिंडही निरोगी राहतील.

निरोगी ठेवण्यासाठी पाणी पिणं खूप गरजेचं आहे, तरच फिल्टरिंगची प्रक्रिया व्यवस्थित होईल. डिहायड्रेशनमुळे किडनी खराब होऊ शकते. बहुतेक आरोग्य तज्ञ दिवसातून कमीतकमी 4 ते 8 ग्लास पाणी पिण्याचा सल्ला देतात.

(डिस्क्लेमर: दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा दिलेला नाही.)

शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.