Egg freezing: प्रेग्नन्सीसाठी सध्या नाही वेळ ? मग ‘हा’ पर्याय तुमच्यासाठी ठरू शकतो उपयुक्त

आपल्या करीअरमध्ये बिझी असल्यामुळे एखाद्या महिलेला प्रेग्नन्सीसाठी वेळ नसेल तर एग फ्रीजिंगच्या पर्यायामुळे तिला वाढत्या वयातही आई बनण्याची संधी मिळू शकते. एग फ्रीजिंगबद्दल महत्वाची माहिती जाणून घेऊया.

Egg freezing: प्रेग्नन्सीसाठी सध्या नाही वेळ ?  मग 'हा' पर्याय तुमच्यासाठी ठरू शकतो उपयुक्त
Follow us
| Updated on: Nov 22, 2022 | 5:06 PM

नवी दिल्ली – एग फ्रीजिंग ही एक अशी प्रक्रिया आहे ज्याद्वारे एखादी स्त्री तिच्या इच्छेनुसार वयाच्या ४० व्या वर्षानंतरही (Pregnancy after 40) सुरक्षितपणे गर्भधारणा करू शकते. या प्रक्रियेमध्ये, महिला त्यांची अंडी गोठवू (Egg freezing) शकतात. ज्यामुळे वयानुसार प्रजनन क्षमता कमी होण्याची चिंता रहात नाही. एग फ्रीजिंगच्या मदतीने महिला वाढत्या वयातही सुरक्षितपणे गर्भधारणा करू शकता. सध्याच्या काळातही अनेक महिलांना एग फ्रीजिंगबद्दल पुरेशी माहिती (information regarding egg freezing) नसून त्या या प्रक्रियेबद्दल अनभिज्ञ आहेत.

एग फ्रीजिंगबद्दल महत्वाची आणि सविस्तर माहिती मिळवण्यासाठी या प्रकियेबद्दल नेहमी विचारण्यात येणारे काही प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेऊया.

1) एग फ्रीजिंग म्हणजे नक्की काय ?

हे सुद्धा वाचा

एग फ्रीजिंग किंवा अंडी गोठवणे ही एक अशी प्रक्रिया आहे जी महिलांची प्रजनन क्षमता सुरक्षित ठेवण्यासाठी केली जाते. तज्ञांच्या मते, गोठवलेल्या अंड्यांद्वारे झालेली गर्भधारणा ही नवीन अंड्यांमुळे झालेल्या गर्भधारणेइतकीच सुरक्षित असते.

2) एग फ्रीजिंगचा पर्याय कोणत्या महिलांनी निवडावा ?

ज्या महिलांना सध्या गर्भधारणा अथवा प्रेग्नन्सी नको आहे, मात्र भविष्यात गर्भधारणेच्या आपल्या क्षमतेबद्दल खात्री हवी आहे, अशा महिला एग फ्रीजिंगचा सुरक्षित पर्याय निवडू शकतात.

3) एग फ्रीजिंगसाठी कोणत्या गोष्टींची काळजी घेणे जरूरी आहे ?

एग फ्रीजिंग ही एक तांत्रिक प्रक्रिया आहे, ती करण्यापूर्वी तुम्हाला काही गोष्टींकडे लक्ष द्यावे लागेल. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, एखाद्या महिलेला कॅन्सर झाला असेल तर त्यावरील उपचार सुरू होण्यापूर्वी तिने तिची अंडी फ्रीज करावीत. कारण कॅन्सरच्या उपचारासाठी केली जाणारी केमोथेरपी आणि रेडिओथेरपी ही अंड्यांसाठी विषारी ठरू शकते. त्याशिवाय ज्या स्त्रियांच्या कुटुंबात रजोनिवृत्ती (मेनोपॉज) लवकर येण्याचा इतिहास आहे, त्यांनी देखील याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.

4) एग फ्रीजिंगमुळे कोणत्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो?

तज्ञांच्या मते, ज्या स्त्रिया अंडी गोठवतात त्यांना रक्तस्त्राव, संसर्ग आणि मूत्राशय किंवा ओटीपोटाच्या अवयवांना इजा होण्याचा धोका असू शकतो. त्याव्यतिरिक्त, मूड स्विंग्स, डोकेदुखी, ओटीपोटात वेदना होणे, वजन वाढणे, मळमळ होणे तसेच जिथे इंजेक्शन दिले आहे, तिथे तीव्र वेदना होणे, असा त्रास सहन करावा लागू शकतो.

एक फ्रीजिंगच्या माध्यमातून गर्भधारणा झाल्यानंतर मूल जन्माला येताना काही दोष उद्भवत नाहीत, अशी माहिती अनेक संशोधनातून समोर आली आहे.

5) कोणत्या वयापर्यंत एग फ्रीजिंग करता येऊ शकते ?

अनेक स्त्रियांना असं वाटतं की अंडी कधीही गोठविली जाऊ शकतात. त्यामुळे त्या 40 व्या वर्षापर्यंत वाट पाहतात. मात्र डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, 25 ते 37 या वयादरम्यान एग फ्रीजिंगचा पर्याय निवडणे उत्तम ठरते. ज्या स्त्रियांना अंडी गोठवायची आहेत त्यांनी वयाच्या 34 व्या वर्षाच्या आधी अंडी गोठवावीत. एग फ्रीजिंगचे परिणाम लक्षात घेऊन कोणतीही स्त्री या पर्यायाचा अवलंब करू शकते.

(टीप- संबंधित विकारांची प्राथमिक माहिती, लक्षणे, तसेच काय करता येईल, याची माहिती देण्याचा आमचा हा प्रयत्न आहे, पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.