चालाल तर वाचाल… मधुमेहाच्या रुग्णांनी रोज ‘एवढी’ पावलं चालणं फायदेशीर

मधुमेहाच्या रुग्णांनी दररोज 30 ते 45 मिनिटे चालले पाहिजे. पण मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी किती पावले चालले पाहिजे हे तुम्हाला माहीत आहे का?

चालाल तर वाचाल... मधुमेहाच्या रुग्णांनी रोज एवढी पावलं चालणं फायदेशीर
Image Credit source: freepik
| Updated on: Jun 17, 2023 | 1:58 PM

Diabetes Managing Tips : आजकाल डायबिटीस (Diabetes) म्हणजेच मधुमेह हा खूप कॉमन झाला आहे. जगातील बरेचसे लोक या आजाराने ग्रस्त असतात. मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी योग्य जीवनशैली पाळणे आवश्यक आहे. दररोज चालणे (walking daily) , हे टाइप 2 मधुमेह असलेल्या लोकांमध्ये ग्लायसेमिक नियंत्रण सुधारण्यास मदत करू शकते. शारीरिक हालचालींमुळे मधुमेहाच्या रुग्णांमध्ये रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते, हे काही संशोधनातून समोर आले आहे.

याशिवाय मधुमेहाचे रुग्ण हे संतुलित आहाराचे सेवन, औषधे आणि नियमित तपासणी करूनही आपल्या रक्तातील साखरेची काळजी घेऊ शकतात. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, मधुमेहाच्या रुग्णांनी दररोज 30 ते 45 मिनिटे चालले पाहिजे. पण मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी किती पावले चालले पाहिजे हे तुम्हाला माहीत आहे का ? तज्ज्ञ काय सांगतात, ते जाणून घेऊया.

किती पावलं चालणं फायदेशीर ?

मधुमेहाच्या रुग्णांसाठी रक्तातील साखर अर्थात ब्लड शुगर मॅनेज करणे कठीण असते. मधुमेहाचे रुग्ण नियमित शारीरिक हालचाली करून स्वतःला तंदुरुस्त ठेवू शकतात. आरोग्य तज्ञांच्या मते, दररोज सुमारे 10,000 पावले चालणे खूप उपयुक्त ठरू शकते. तथापि, ते लोकांवर देखील अवलंबून आहे. परंतु ब्लड शुगर मॅनेज करण्यासाठी, व्यायामाची वेळ आणि तीव्रता, म्हणजेच आपण किती व्यायाम करतो, यावर लक्ष देणे आवश्यक आहे.

5000 पावलांनी सुरुवात करा

मधुमेहाच्या रुग्णांसाठी एरोबिक व्यायामाचे अनेक आरोग्य फायदे आहेत. अमेरिकन कॉलेज ऑफ स्पोर्ट्स मेडिसिन आणि अमेरिकन डायबिटीस असोसिएशनच्या मते, आठवड्यातून किमान पाच दिवस 30 मिनिटे चालणे हे टाइप 2 मधुमेह नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. मधुमेहाचे रुग्ण दररोज किमान 5000 पावले चालून याची सुरुवात करू शकतात.

शेड्युल बनवा

आरोग्य तज्ञ सांगतात की जर तुम्हाला सलग 10,000 पावले चालणे शक्य नसेल तर 30 मिनिटे चाला. काही लोकांना सतत व्यायाम करण्यात किंवा एकसलग चालण्यात अडचण येऊ शकते. त्यामुळे तुमच्या दिनक्रमाचे शेड्यूल आखावे. तुमचे 30-मिनिटे चालण्याचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी, सकाळी 10 मिनिटे, दुपारी 10 मिनिटे आणि संध्याकाळी 10 मिनिटे चालू शकता. एकूण किती पावलं चालली आणि किती बाकी आहेत, यासाठी तुम्ही मोबाईल फोन किंवा स्मार्ट घड्याळाचीही मदत घेऊ शकता.