AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cyber Sickness : मोबाईलच्या अतिवापरामुळे महिला पोहोचली व्हीलचेअरवर, जाणून घ्या सायबर सिकनेसचा अर्थ

सध्या लोकांचा मोबाईलचा वापर अतीप्रचंड वाढला आहे. सतत स्क्रीनकडे पाहिल्याने लोकांना आरोग्याशी निगडीत अनेक त्रास सहन करावे लागतात. पोर्तुगालमध्ये नुकताच असा धक्कादायक प्रकार समोर आला आहे, ज्यामध्ये एका महिलेला मोबाईलचा अतीवापर केल्यामुळे व्हीलचेअरचा आसरा घ्यावा लागला.

Cyber Sickness : मोबाईलच्या अतिवापरामुळे महिला पोहोचली व्हीलचेअरवर, जाणून घ्या सायबर सिकनेसचा अर्थ
मोबाईलचा अतिवापर आरोग्यासाठी घातकImage Credit source: Freepik
| Updated on: Mar 01, 2023 | 1:10 PM
Share

नवी दिल्ली : आजकाल मोबाईल फोन आणि लॅपटॉप हे लोकांच्या जीवनाचे अविभाज्य अंग बनले आहेत. लहान मुलं, तरूण व्यक्ती किंवा प्रौढ नागरिक सर्वांचे डोळे आजकाल मोबाईलवर (mobile) खिळलेले असतात. प्रत्येक व्यक्तीचा स्क्रीनचा वापर खूप वाढला आहे. मात्र स्क्रीनचा हा वाढता वापर आपल्या आरोग्यासाठी देखील अतिशय हानिकारक (harmful for health) ठरू शकतो. त्यामुळे शारीरिकच नव्हे तर मानसिक समस्याही (affect on mental health) उद्भवू लागतात. नुकतेच पोर्तुगालमधून असेच एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे.

ज्यामध्ये एका महिलेला मोबाईलचा अतीवापर केल्यामुळे व्हीलचेअरचा आसरा घ्यावा लागला. खरंतर, फेनेला फॉक्स नावाच्या या महिलेला मोबाईलचे इतके व्यसन जडले की ती दिवसाचे 14 तास फोनवर घालवू लागली. त्यामुळे तिचं डोकं दुखू लागलं, मानेतही वेदना होऊ लागल्या. एवढंच नव्हे तर तिला चक्कर येणे व मळमळ होणे, असा त्रासही सहन करावा लागला. ही लक्षणे इतकी तीव्र झाली की तिला चालतानाही चक्कर येऊ लागली. त्यामुळे तिला काही काळ व्हीलचेअरची मदत घ्यावी लागली. थोडक्यात काय तर फेनेला ही सायबर मोशन सिकनेसची शिकार झाली. सायबर मोशन सिकनेस म्हणजे नेमके काय ते जाणून घेऊया.

सायबर सिकनेस म्हणजे काय ?

मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही किंवा कॉम्प्युटर यांच्या स्क्रीनचा सतत वापर केल्याने आरोग्याशी संबंधित अनेक समस्या उद्भवतात. मोबाईलच्या वापरामुळे फेनेला ही सायबर मोशन सिकनेस किंवा डिजिटल व्हर्टिगो याची बळी ठरली. दिवसभर स्क्रीनसमोर वेळ घालवण्यामुळे ही परिस्थिती उद्भवते. ही स्थिती अगदी सामान्य होत आहे, ज्यामध्ये रुग्णाला अनेकदा चक्कर येते. हे सहसा मज्जासंस्थेच्या खराबीमुळे होते, जे मेंदू आणि शरीरात रक्त आणि ऑक्सिजनच्या प्रवाहासाठी जबाबदार असते.

सायबर सिकनेसची लक्षणे

मळमळ

मळमळ हे सायबर सिकनेसचे प्रारंभिक लक्षण आहे. जर तुमचे पोट भरले असेल किंवा तुम्ही आजारी असाल तर हे लक्षण गंभीर स्वरूपही धारण करू शकते. तीव्र वास किंवा अगदी बंद खोलीत राहिल्याने तुम्हाला मळमळ होऊ शकते, ज्यामुळे तुम्हाला उलट्या होतात.

चक्कर येणे

दीर्घकाळ स्क्रीनचा वापर केल्याने, विशेषत: उभं राहून स्क्रीन पाहिल्याने अथवा त्याचा वापर केल्याने चक्कर येणे किंवा आजूबाजूच्या सर्व गोष्टी हलत असल्याची भावना होऊ शकते. जेव्हा हे घडते तेव्हा ती व्यक्ती कोणत्याही गोष्टीवर लक्ष केंद्रित करू शकत नाहीत.

डोळ्यांवर ताण येणे

जर तुम्ही दिवसभरात जास्त वेळ इलेक्ट्रॉनिक उपकरणे वापरत असाल तर त्यामुळे डोळ्यांवर खूप ताण पडतो. त्यामुळे डोळे कोरडे होणे, जळजळणे आणि अंधुक दृष्टी असा त्रास उद्भवतो.

डोकेदुखी

लॅपटॉप किंवा मोबाईल वापरत असताना सतत त्याच स्थितीत राहिल्यास मान आणि खांदे दुखू लागतात. डोळ्यांवर ताण तर येतोच पण त्यासोबतच डोकेदुखीचा त्रासही होऊ शकतो. यासह, तुम्हाला चक्कर येऊन पडणे, भरपूर घाम येणे किंवा चेहरा लाल होणे असे त्रासदायक अनुभव देखील येऊ शकते.

सायबर सिकनेसपासून असा करावा बचाव :

– जर तुम्ही ऑफिसच्या कामासाठी सतत स्क्रीन वापरत असाल तर सायबर सिकनेस टाळण्यासाठी सकाळ संध्याकाळ थोडा व्यायाम करावा.

– स्क्रीनच्या वापरामुळे आपल्या डोळ्यांवर सर्वाधिक परिणाम होतो. अशा परिस्थितीत डोळ्यांचा व्यायामही करा.

– जर तुम्ही ऑफिसच्या कामासाठी स्क्रीन वापरत असाल तर दिवसभरात नंतर इतर वेळी स्क्रीन कमी वापरण्याचा प्रयत्न करा.

– ऑफिसच्या कामानंतर मोबाईल किंवा टीव्ही स्क्रीनपासून शक्यतो दूर राहण्याचा प्रयत्न करा.

– रात्री झोपताना मोबाईल अजिबात वापरू नका. तसेच तुमच्या लॅपटॉप किंवा संगणकावर ब्ल्यू फिल्टर ठेवा.

– मोबाईल, लॅपटॉपचा फॉन्ट मोठा ठेवा आणि स्क्रीनचा कॉन्ट्रास्ट कमी ठेवा.

मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार? संजय शिरसाट स्पष्टच बोलले!
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार? संजय शिरसाट स्पष्टच बोलले!.
गिरणी कामगारांना खुशखबर! अधिवेशनात एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा
गिरणी कामगारांना खुशखबर! अधिवेशनात एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा.
फडणवीस पंतप्रधान होणार? महायुतीच्या नेत्याचा मोठा खुलासा
फडणवीस पंतप्रधान होणार? महायुतीच्या नेत्याचा मोठा खुलासा.
शिंदे, फडणवीस की पवार?मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीवर भास्कर जाधवांचे संकत
शिंदे, फडणवीस की पवार?मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीवर भास्कर जाधवांचे संकत.
राज्याच्या हिताची चर्चा नाही! अधिवेशनावर सुप्रिया सुळे यांचा घणाघात
राज्याच्या हिताची चर्चा नाही! अधिवेशनावर सुप्रिया सुळे यांचा घणाघात.