मेंदूच्या ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष नको… मोजावी लागेल मोठी किंमत

| Updated on: Feb 07, 2022 | 10:26 AM

मेंदूतील थोडासा अडथळादेखील संपूर्ण शरीराच्या कार्यावर परिणाम करू शकतो. कधी-कधी शरीराच्या काही नसांमध्ये कमजोरी येते आणि त्रास होऊ लागतो. मज्जातंतूंच्या कमकुवतपणाची अनेक कारणे आहेत.

मेंदूच्या ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष नको... मोजावी लागेल मोठी किंमत
Brain-stroke-related-health
Follow us on

मुंबई : मेंदू (brain) हा शरीरातील सर्वाधिक महत्वाचा घटक आहे. त्याच्या परवानगीशिवाय शरीर कुठलीही गोष्ट करु शकत नाही. त्यामुळे त्याचे आरोग्य टिकवून ठेवणे हे सर्वात महत्वाचे आहे. अनेकदा आपल्या मेंदूच्या नसांमध्ये वेदना होतात. वास्तविक, याची अनेक कारणे आहेत आणि त्याकडे दुर्लक्ष केल्यास याची मोठी किंमत आपल्याला चुकवावी लागू शकते. मेंदू सर्व मज्जातंतूंशी (nerves) जोडलेला आहे आणि त्यात थोडासा अडथळा देखील संपूर्ण शरीराच्या कार्यावर परिणाम करू शकतो. कधी-कधी शरीराच्या काही नसांमध्ये कमजोरी येते आणि त्रास होऊ लागतो. मज्जातंतूंच्या कमकुवतपणाची अनेक कारणे आहेत. मेंदूच्या नसांमध्ये कमजोरी (weakness) का येते आणि ती निरोगी ठेवण्यासाठी काय करायला हवे, याबाबत आपण या लेखात चर्चा करणार आहोत.

मेंदूला दुखापत, शरीरातील काही पोषक घटकांची कमतरता आणि नसांवर दबाव या सर्व कारणांमुळे मेंदूला वेदना होत असतात. यासोबतच कधी संसर्गामुळे तर काही औषधांमुळे मेंदूच्या नसांमध्ये कमजोरी येते. याशिवाय, कधीकधी इतर कारणांमुळे मेंदूच्या मज्जातंतूंमध्ये कमकुवतपणा येतो. वास्तविक, मेंदूच्या कमकुवतपणामुळे सर्व पेशींपर्यंत ऑक्सिजन योग्य प्रकारे पोहोचू शकत नाही. यासोबतच कधी कधी मेंदूच्या विशिष्ट भागाकडे जाणार्‍या नसांमध्ये रक्त साचल्यामुळे अचानक तीव्र डोकेदुखीचा त्रासही होऊ शकतो. त्याचप्रमाणे, जर तुमच्या शरीरात मुंग्या येत असतील तर ही देखील मेंदूच्या नसांच्या कमकुवतपणाची लक्षणे आहेत. मेंदूच्या नसांमध्ये रक्त योग्यरित्या पोहोचत नाही, ज्यामुळे शरीराच्या वेगवेगळ्या भागात मुंग्या येणे सुरू होते.

मानसिक क्षमतेवर परिणाम

मेंदूच्या नसा कमकुवत झाल्यामुळे याचा आपल्या मानसिक क्षमतेवरही म्हणजेच विचार करण्याच्या क्षमतेवर त्याचा परिणाम होतो. यामुळे काही वेळा स्मरणशक्तीवरही प्रभावीत होत असते. यामुळे व्यक्तीला गोष्टी लक्षात ठेवणे आणि बोलणेदेखील कठीण होऊ शकते. याशिवाय, बोलण्यातल्या गोंधळाचाही संबंध मेंदूच्या नसांच्या कमकुवतपणाशी असतो. अशा परिस्थितीत ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्‍यक असते.

संबंधीत बातम्या :

Papaya side effects : नंतर पश्चापात करण्यापेक्षा आधीच पपईचे फायदे आणि दुष्परिणाम समजून घ्या! 

Hair Fall : केस गळण्याच्या समस्या मागे जास्त एक्सरसाइज करणे हे कारण तर नाही ना कारणीभूत?, जाणून घ्या या मागील इंटरेस्टिंग माहिती

PHOTO | कानामध्ये मळ जमा झाला आहे तर करू नका चिंता, या घरगुती उपचाराने सहजरीत्या काढा कानातील मळ!