Marathi News » Health » Health care Try these best and effective ear wax cleaning tips
PHOTO | कानामध्ये मळ जमा झाला आहे तर करू नका चिंता, या घरगुती उपचाराने सहजरीत्या काढा कानातील मळ!
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: वैजंता गोगावले, Tv9 मराठी
Updated on: Feb 05, 2022 | 10:59 PM
Health care: कानामध्ये मळ असल्यास अनेकजण तो बाहेर काढण्यासाठी कंटाळा करत असतात परंतु हा आळसपणा अनेक समस्या भविष्यात निर्माण करू शकतो. जर आपण योग्य वेळी कानातील साचलेली घाण व मळ जर काढला नाही तर तुम्हाला ऐकू न येण्याच्या समस्या उद्भवू शकतात.एखाद्या स्पेशलिस्ट शिवाय घरगुती काही उपाय करून आपल्या कानाची स्वच्छता देखील करता येऊ शकते.
Feb 05, 2022 | 10:59 PM
बदामाचे तेल : कानामध्ये मळ जमा झाला असेल तर बदामाच्या तेलाचा उपयोग जुन्या काळापासून केला जात आहे. यासाठी सुरुवातीला आपल्याला बदामाचे तेल हलकेसे कोमट करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर दोन ते तीन थेंब कानात टाकायला हवे. थोड्या वेळातच कानातील जमा झालेला मळ नरम होऊन जाईल आणि हळूहळू बाहेर पडण्यास मदत होईल.
1 / 5
एप्पल साइडर विनेगर : यामध्ये हाइड्रोजन पेरोक्साइड मिसळा आणि या मिश्रणाला कमी मात्रामध्ये तुमच्या कानात टाका काही वेळानंतर कापूसाच्या साहाय्याने पुसून टाका असे केल्याने कानामध्ये जमा झालेला मळ आपोआप निघून जाईल.
2 / 5
कोमट पाणी : जर तुमच्या कानामधील जमा झालेली घाण व मळ बाहेर काढायचा असेल तर अशावेळी कोमट पाणी सुद्धा उपयुक्त ठरते,याचा उपाय करण्यासाठी तुम्हाला कोमट पाण्यामध्ये कापूस भिजवून ठेवायचा आहे आणि कापूसाच्या साहाय्याने कोमट पाण्याचे थेंब आपल्या कानामध्ये टाकायचे आहे अशा पद्धतीने आपण कानामध्ये साचलेली घाण बाहेर काढू शकतो.
3 / 5
मोहरीचे तेल : कानामध्ये मळ साचला असेल तर अशावेळी मोहरीचे तेल अतिशय उत्तम मानले गेले आहे. या तेलाला सुद्धा आपल्या थोडेसे गरम करायचे आहे आणि काना मध्ये दोन ते तीन थेंब टाकायचे आहे, असे केल्याने तुमच्या कानामध्ये जमा झालेल्या मळ हळूहळू नरम होईल आणि अगदी बाहेर निघून जाईल. परंतु एक गोष्ट नेहमी लक्षात असू द्या की या तेलाची कॉलिटी चांगली असावी अन्यथा कानाला त्रास होऊ शकतो.
4 / 5
कांद्याचा रस : कानामध्ये जमा झालेला मळ बाहेर काढण्यासाठी तुम्ही कांद्याचा रस सुद्धा वापरू शकता यासाठी तुम्हाला कापूस घेऊन हा कापूस तुम्हाला कांद्याच्या रसामध्ये भिजवायचा आहे आणि त्याचे एक ते दोन थेंब कानामध्ये टाकायचे आहे आणि त्यानंतर कापूसच्या सहाय्याने कान बंद करायचे. काही आठवडे असे केल्याने तुमच्या कानाचे आरोग्य चांगले होऊन जाईल.