Papaya side effects : नंतर पश्चापात करण्यापेक्षा आधीच पपईचे फायदे आणि दुष्परिणाम समजून घ्या! 

Papaya Side effects: योग्य मात्रा मध्ये फायबर (Fiber in Papaya) उपलब्ध असल्याकारणाने पपई आपल्या पचनसंस्थेस उत्तम ठेवण्यास लाभदायी ठरते. पण काही असे आजार आहेत जे आजार झाल्यावर व्यक्तीला पपई अजिबातच खायलाच नको!

Papaya side effects : नंतर पश्चापात करण्यापेक्षा आधीच पपईचे फायदे आणि दुष्परिणाम समजून घ्या! 
पपई कुणी खावी आणि कुणी खाऊ नये?
Follow us
| Updated on: Feb 06, 2022 | 6:18 PM

पपई असे फळ आहे, या फळाला प्रत्येक जण पसंत करत असतो.पपईमध्ये भरपूर प्रमाणामध्ये पोषकतत्व (Papaya side effects) उपलब्ध असतात तसेच या फळाला एक कॅलरी फ्रूट म्हणून सुद्धा ओळखले जाते. अनेक डॉक्टर्स आपल्याला या फळाचा आहारामध्ये समावेश करण्याचा सल्ला सुद्धा देत असतात. जर तुम्हाला कधी अवेळी भूक लागत असेल तर अशा वेळी तुम्ही पपई सहज सेवन करू शकता. पपई खाल्ल्याने हृदयाशी संबंधित आजार, डायबिटीज (Diabetes), कॅन्सर आणि लो ब्लड प्रेशर सारख्या समस्या शरीरातून लवकर दूर होतात. पपईमध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर, कॅरेटिन, विटामिन सी (Vitamin C) आणि अन्य मिनरल्स उपलब्ध असतात, जे आपल्या शरीराला मजबूत ठेवण्यासाठी सहाय्यभूत ठरतात. पपई मध्ये भरपूर मात्रा मध्ये विटामिन सी सोबतच विटामिन ए सुद्धा असते जे आपल्या डोळ्यांची नजर वाढवण्यासाठी व डोळ्यांचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी मदत करतात.

योग्य प्रमाणात फायबर असल्याकारणामुळे पपई पचन संस्था सुद्धा चांगली ठेवते. आपले पोट वेळेवर स्वच्छ होण्यासाठी सुद्धा पपई अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असते परंतु अन्य असे काही आजार आहेत, या आजारांमध्ये पपईचे सेवन करणे चुकीचे ठरते. जर तुम्हाला काही आजार झाले असतील तर अशा वेळी रुग्णांनी पपईचे सेवन अजिबात करायला नाही पाहिजे. आजच्या लेखामध्ये आम्ही तुम्हाला अशाच काही आजारांबद्दल सांगणार आहोत, या आजारातील रुग्णांनी पपईचे सेवन चुकून सुद्धा करायचे नाही.

कावीळ

तज्ञ मंडळीच्या म्हणण्यानुसार ज्या व्यक्तींना कावीळ झाली आहे अशा व्यक्तींनी चुकून सुद्धा पपई खाल्ली नाही पाहिजे. तज्ञांच्या मते पपई मध्ये उपलब्ध असणारे पपाइन आणि बीटा कॅरोटीन यामुळे आपल्या शरीरातील कावीळ कमी होण्याऐवजी अजून वेगाने पसरते आणि म्हणूनच जर तुम्हाला कावीळ झाली असेल तर अशा वेळी तुम्हाला पपई खायची इच्छा झाली असेल तरीही डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या आणि त्यानंतरच पपईचे सेवन करा.

अपचन

जर आपण कोणतीही गोष्ट मर्यादेपेक्षा जास्त केली तर त्याचा आपल्याला विपरीत परिणाम पाहायला मिळतो हेच सूत्र आपल्या शरीराच्या बाबतीत सुद्धा लागू होते. जर आपण कोणत्याही पदार्थाचे सेवन अतिरिक्त प्रमाणामध्ये केले तर त्याचा विपरीत परिणाम आपल्या शरीरावर जाणवताना दिसतो. पपईचे अधिक सेवन केल्याने आपली पचनसंस्था बिघडून जाते. खरेतर पपईमध्ये उपलब्ध असणारे फायबर अधिक मात्रा मध्ये जर शरीरात गेले तर यामुळे पोट दुखी ,पोटामध्ये जळजळ होणे, गॅसची समस्या असे विविध आजार आपल्याला होऊ शकतात त्याचबरोबर पपई बद्धकोष्ठतेचा आजार दूर करते परंतु जर अति प्रमाणामध्ये आपण पपई खाल्ली तर जुलाब होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ब्लड प्रेशर

ब्लड प्रेशर आहे अशा व्यक्तीने सुद्धा अति प्रमाणामध्ये पपई चे सेवन करायला नाही पाहिजे. तज्ञ मंडळीच्या मते पपई अधिक प्रमाणात खाल्ल्याने आपल्या हृदयाचे ठोके धीम्या गतीमध्ये पडतात. जर एखाद्या व्यक्तीला ब्लड प्रेशर ची समस्या असेल तर त्या व्यक्तीला जर पपई खाण्याची इच्छा झाल्यास अशा वेळी डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्यायला हवा अन्यथा तुम्हाला हृदयविकाराच्या समस्येला सुद्धा सामोरे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

स्किन एलर्जी

जर तुम्हाला खूप दिवसापासून एखादा त्वचेचा एखादा विकार झाला असेल आणि या समस्येसाठी तुम्ही औषधोपचार करत असाल तर अशा वेळी पपई खाणे तुमच्यासाठी नुकसानदायक सिद्ध होऊ शकते. असे म्हटले जाते की, पपई खाल्ल्याने आपल्या शरीरातील त्वचा विकार कमी होण्याऐवजी अजूनच वाढू लागतो आणि अशावेळी आपल्या त्वचेवर लाल रंगाचे चट्टे सुद्धा पाहायला मिळतात. यामुळे अन्य समस्या सुद्धा उद्भवू शकतील.

मुतखडा

असे म्हणतात की ज्या व्यक्तींना मुतखड्याची समस्या उद्भवलेली आहे, अशा वेळी या लोकांनी पपईचे सेवन खूपच कमी प्रमाणात करायला हवे. तज्ञ मंडळींच्या मतानुसार पपई अतिरिक्त प्रमाणात खाल्ल्याने मुतखड्याची समस्या अधिक वाढू शकते त्याचबरोबर फळांमध्ये उपलब्ध असणारे अँटिऑक्सिडंट किडनीमध्ये असलेला मुतखडा व त्याच्या वेदना अजून वाढू शकतो म्हणूनच मुतखड्याच्या रुग्णाने पपईचे सेवन अजिबात करू नये.

संबंधित बातम्या :

Lata Mangeshkar Death | लतादीदींनी झुंज दिलेला न्यूमोनिया वृद्धांसाठी का घातक?

कानामध्ये मळ जमा झाला आहे तर करू नका चिंता, या घरगुती उपचाराने सहजरीत्या काढा कानातील मळ!

हळदीयुक्त दूधच नाही तर हळदीच्या पाण्याचेही अनेक फायदे ,रोगप्रतिकारक शक्ती होईल दुप्पट!

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.