AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Lata Mangeshkar Death | लतादीदींनी झुंज दिलेला न्यूमोनिया वृद्धांसाठी का घातक?

लहान मुले आणि वृद्ध हे दोघेही न्यूमोनियाचे सहज बळी पडतात आणि त्यामुळेच त्यांच्यामध्ये हा आजार खूप गंभीर बनतो. वृद्धत्वामुळे आणि प्रतिकारशक्ती कमकुवत झाल्यामुळे, न्यूमोनिया वृद्धांच्या फुफ्फुसावर हल्ला करतो, यातून त्यांच्या फुफ्फुसांची शक्ती कमकुवत होउन मृत्यू ओढावतो. कोरोना काळात या घटना अधिक होत्या.

Lata Mangeshkar Death | लतादीदींनी झुंज दिलेला न्यूमोनिया वृद्धांसाठी का घातक?
लता मंगेशकर
| Edited By: | Updated on: Feb 06, 2022 | 12:39 PM
Share

मुंबई : पोस्ट कोविडमध्ये मोठ्या प्रमाणात लोकांना न्यूमोनियाचा सामना करावा लागला आहे. अनेक ठिकाणी तर कोविडमधून बरे झालेले रुग्ण नंतर न्यूमोनियाचे बळी ठरल्याचेही अनेक उदाहरणे आहेत. न्यूमोनिया साधारणत: लहान मुले व वयोवृध्दांसाठी मोठ्या प्रमाणात घातक ठरु शकतो. भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांनादेखील काही दिवसांपूर्वी कोरोनाची (corona) लागण झाली होती. त्यातून बाहेर आल्या परंतु नंतर त्यांना लगेच न्यूमोनियाने (Pneumonia) ग्रासल्याने अखेर रविवारी त्यांचे निधन झाले आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, लहान मुले आणि वृद्ध दोघेही न्यूमोनियाचे सहज बळी पडतात आणि त्यामुळेच त्यांच्यामध्ये हा आजार खूप गंभीर बनतो. वृद्धत्वामुळे आणि प्रतिकारशक्ती कमकुवत झाल्यामुळे, ते वृद्धांच्या फुफ्फुसावर हल्ला करते. कोविडनंतर जर न्यूमोनिया झाला असेल तर याकडे दुर्लक्ष व्हायला नको, कोरोना काळात आधीच कमकुवत झालेली रोगप्रतिकारशक्ती न्यूमोनियामुळे अजूच कमी होत असते. त्यामुळे खासकरुन वृध्दांनी याबाबत अधिक काळजी घेणे गरजेचे आहे.

कोरोनानंतर न्यूमोनियाचे रुग्ण

कोरोना काळात अनेक जण कोरोनातून बाहेर आल्यावर त्यांना म्युकरमायकोसिस, न्यूमोनिया अशा पोस्ट कोविडच्या समस्यांचा सामना करावा लागला आहे. कोरोनातून बाहेर पडल्यावर रोगप्रतिकाशक्ती कमी झालेली असते. त्यातच न्यूमोनियाची लागण झाल्यामुळे खासकरुन वृध्दांसाठी हे अधिक घातक स्वरुपाचे ठरत असते. इंडियन चेस्ट सोसायटीचे सदस्य डॉ. ए.के. सिंग यांच्या मते, न्यूमोनिया पोस्ट कोविडनंतरचा खातक प्रकार आहे. कोरोनानंतर निमोनिया झाला असेल तर त्याकडे दुर्लक्ष करु नका. कोरोनापासून देशात बुरशीजन्य न्यूमोनियाचे रुग्ण झपाट्याने वाढले आहेत. या न्यूमोनियामध्ये फुफ्फुसात संसर्ग होतो जो एक्स-रेमध्ये स्पष्टपणे दिसतो. गेल्या काही दिवसांपासून अनेक मृत्यूंच्या घटनांमध्ये गंभीर न्यूमोनियानेही जीव घेतल्याचे दिसून येत आहे. त्याच वेळी, न्यूमोनिया, सेप्सिस (Sepsis) एक रोग आहे. जर एखाद्या रुग्णाला सेप्सिस असेल तर ते न्यूमोनियाला अधिक धोकादायक बनवते.

…तर मृत्यूचे प्रमाण 30 टक्क्यांपर्यंत

डॉ. सिंग सांगतात, न्यूमोनियामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या 5 ते 10 टक्के लोकांचा मृत्यू होऊ शकतो. गंभीर रुग्णांना आयसीयूमध्ये ठेवावे लागते, अशावेळी मृत्यूचे प्रमाण 30 टक्क्यांपर्यंत जाते. या रोगासाठी रुग्णाची रोगप्रतिकारकशक्ती विशेषतः जबाबदार असते. म्हणूनच वृद्धांमध्ये न्यूमोनिया धोकादायक आहे. वृद्धांच्या शरीराची प्रतिकारशक्ती फारशी चांगली नसते. अनेक वेळा जंतुसंसर्ग झाला की आपल्याला औषधे दिली जातात, ते रोगाशी लढतात, परंतु रोगाशी लढण्यासाठी आपली स्वतःची प्रतिकारशक्तीदेखील खूप महत्त्वाची असते. औषधांमुळे रोगाशी लढण्यास मदत होत असते. परंतु याला शरीराचीही सोबत असणे आवश्‍यक असते. रोगप्रतिकारशक्ती कमकुवत झाली असल्यास शरीरापासून पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे आपल्या शरीरावर संबंधित आजार अधिक हावी होत असतो. त्यातून मृत्यूचाही धोको संभवतो.

कोरोनानंतर, अनेक संधीसाधू जिवाणूंचा संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते, ज्याला सामान्यतः न्यूमोनिया म्हणतात. म्हणजेच न्यूमोनिया हा कोरोनाचाच पुढील गंभीर प्रकार म्हणून समोर येत आहे. यामध्ये फुफ्फुसांना खूप नुकसान होते. अशा परिस्थितीत, बरे होण्यासाठी अनेक महिन्यांचा कालावधीही लागू शकतो. जर एखाद्या व्यक्तीला खोकल्याबरोबर पिवळ्या रंगाचा कफ येत असेल. यासोबतच खूप ताप येत असते तसेच दीर्घ श्वास घेताना अडचणी येत असल्यास न्यूमोनियाची शक्यता नाकारता येत नाही. यात, रुग्णाला छातीच्या एका बाजूला किंवा दोन्ही बाजूला वेदना होऊ शकतात. कधी-कधी जास्त ताप नाही पण इतर दोन लक्षणे असतील तर न्यूमोनिया होऊ शकतो. या आजारात फुफ्फुसांना सर्वाधिक त्रास होतो.

संबंधित बातम्या :

Lata Mangeshkar Nidhan | दीदी गेल्या, गानकोकिळा लता मंगेशकर यांचे निधन, देशावर शोककळा

लतादीदींच्या निधनामुळे दोन दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा; तिरंगा अर्ध्यावर उतरवला जाणार; शिवाजी पार्क येथे होणार अंत्यसंस्कार

 मी नि:शब्द, लतादीदींच्या जाण्याने देशात पोकळी निर्माण झालीय; मोदी, राष्ट्रपतींसह दिग्गजांकडून शोक व्यक्त

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.