
तुम्ही चेहऱ्यावर लिंबू लावत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठीच आहे. तुम्हाला माहिती आहे की, लिंबाचे खाण्यापासून ते लावण्याचे फायदे आहेत. पण, बरेच लोक लिंबू थेट चेहऱ्यावर लावतात. यामुळे फायद्याऐवजी त्वचेचे नुकसान होऊ शकते. याविषयी पुढे जाणून घ्या. चेहरा चमकदार आणि डागमुक्त करण्यासाठी डीआयवाय हॅक्सपासून महागडी उत्पादने, फेशियल आणि कॉस्मेटिक ट्रीटमेंटपर्यंत विविध उपाय केले जातात, परंतु त्वचेवर सर्व काही लावण्यापूर्वी संपूर्ण माहिती असणे महत्वाचे आहे. आज आपण त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर असलेल्या लिंबाबद्दल बोलूया.
लिंबामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते, त्यामुळे त्वचेवरील डाग दूर करण्यासाठी हा एक शक्तिशाली घटक आहे, परंतु तो लावताना खूप सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. लिंबू कधीही थेट त्वचेवर लावू नये. तुम्हीही असे करत असाल तर यामुळे कोणते तोटे होऊ शकतात. जाणून घ्या.
लिंबू जीवनसत्त्वांनी समृद्ध आहे. याव्यतिरिक्त हे नैसर्गिक ब्लिचिंग म्हणून काम करते आणि म्हणूनच त्वचेशी संबंधित समस्या दूर करू शकते. लिंबूमध्ये आम्लीय गुणधर्मांमुळे थेट त्वचेवर लावल्यास काही दुष्परिणाम होऊ शकतात, तर चला जाणून घेऊया लिंबू थेट त्वचेवर का लावू नये.
लिंबू थेट चेहऱ्यावर लावल्याने त्वचेवर पुरळ उठू शकते, त्वचेवर खाज सुटणे, चिडचिड होणे, लालसरपणा यासारख्या समस्या उद्भवू शकतात, म्हणून बेसन, मुलतानी माती, ग्लिसरीन, नारळ तेल, कोरफड जेल इत्यादी काही घटकांसह देखील लावावे.
ज्या लोकांची त्वचा संवेदनशील आहे त्यांनी थेट त्वचेवर लिंबू लावणे टाळावे, अन्यथा त्वचेवर सूज, लालसरपणा तसेच पुरळ येऊ शकते. ही लक्षणे हलक्यात घेतल्यास ही समस्या आणखीनच वाढते.
लिंबू थेट त्वचेवर लावल्यास त्वचा अतिशय संवेदनशील बनते आणि यामुळे जेव्हा तुम्ही सूर्याच्या संपर्कात येतो तेव्हा सनबर्न होऊ शकते आणि तुम्हाला हायपरपिग्मेंटेशन होऊ शकते, त्यामुळे लिंबू थेट त्वचेवर चोळू नये.
लिंबू खूप आम्लयुक्त असते आणि यामुळे जेव्हा आपण ते थेट त्वचेवर लावतो तेव्हा पीएच संतुलन बिघडते. यामुळे प्रत्येक गोष्टीमुळे तुमच्या त्वचेची समस्या लवकर उद्भवते. त्वचेची लवचिकता कमी होऊ शकते. यामुळे कमी वयात सुरकुत्या येऊ शकतात. मुरुमांची समस्या जसजशी वाढत जाते तसतसे त्वचेवर काळेपणा दिसू शकतो.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)