प्रदुषणातही फुप्फुसे होतील कार्यक्षम, रामदेव बाबा यांनी सांगितलेले प्राणायम करा

दिल्ली-मुंबई सारख्या महानगरात प्रदुषणाची पातळी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याचा सर्वाधिक वाईट परिणाम फुप्फुसांवर होतो. वाढत्या प्रदुषणात फुप्फुसाचे आरोग्य चांगले राहाण्यासाठी रामदेव बाबांनी काही आसने सांगितली आहेत.

प्रदुषणातही फुप्फुसे होतील कार्यक्षम, रामदेव बाबा यांनी सांगितलेले प्राणायम करा
Baba Ramdev
| Updated on: Dec 04, 2025 | 6:52 PM

देशात अनेक राज्यात हिवाळ्यात प्रदुषणाची पातळी वाढलेली आहे. त्याचा परिणाम लोकांच्या आरोग्यावर होत आहे. प्रदुषणाने फुप्फुसावर सर्वात मोठा परिणाम होत आहे. लोकांनी एलर्जी, श्वास घेण्यासह अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. असा योग एक अशी नैसर्गिक थेरपी आहे ज्यामुळे फुप्फुसाची कार्यक्षमता वाढण्यास मदत होते. वाढत्या प्रदुषणात कोणते योग आणि प्राणायमचा फायदा होतो या संदर्भात रामदेव बाबा यांनी बहुमोल माहिती दिलेली आहे. चला तर जाणून घेऊयात..

योग श्वसनाची क्षमता वाढवून फुप्फुसांना अधिक ऑक्सिजन घेण्यास मदत करतो. यामुळे फुप्फुसाच्या स्नायू मजबूत बनून श्वास घेण्याची प्रक्रीया सहज बनते. योगामुळे तणाव कमी होतो,ज्यामुळे श्वास घेण्याचा त्रास कमी होतो. हा फुप्फुसातील जमलेला कफ कमी करुन त्याला साफ आणि चांगल्या प्रकारे काम करण्यासाठी मदत करते. चला तर पाहूयात कोणती योगासने परिणामकारक आहेत.

फुप्फुसाच्या आरोग्यासाठी कोणती आसने परिणामकारक

कपालभाती

रामदेव बाबा यांच्या मते फुप्फुसाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी कपालभाती प्राणायम फायदेशीर आहे. यामुळे कफ कमी होतो आणि फुप्फुसाचा दबाव कमी होतो. याला केल्याने फुप्फुसातील जमलेले टॉक्सिन बाहेर निघते आणि फुप्फुसे मजबूत होतात.

भुजंगासन

या योगासनात माकडहाड आणि छातीला पसरवून फुप्फुसासाठी जागा तयार होते. यामुळे खोल श्वास घेतल्याने ऑक्सीजनचा प्रवाह सुधारतो.
या आसनामुळे फुफ्फुसाचे जखडणे आणि थकवा कमी होतो

वक्रासन

या आसनाने शरीरातल्या मधल्या भागाला मोडून फुप्फुसे आणि बरगड्यांजवळ स्नायूंना मोकळे करतो. खोल श्वास घेणे सोपे होते. आणि छातीचे जखडणे कमी करुन फुप्फुसांना लवचित बनवते.

मकरासन

हे आसन आरामाच्या स्थितीत केले जाते. आणि त्यामुळे फुप्फुसांना लगेच आराम मिळतो. यामुळे श्वास हळू आणि खोल होऊ लागतात. त्यामुळे तणाव कमी होतो. हे आसन रेस्पिरेट्री सिस्टीमला चांगले बनवून फुप्फुसांना रिलॅक्स करते.

हे देखील करणे आवश्यकच

धूम्रपान आणि प्रदूषणापासून दूर राहा

घर आणि खोलीत व्हेंटिलेशन चांगले ठेवा त्यामुळे ताजी हवा मिळू शकेल

रोज 10 ते 15 मिनिटे डीप ब्रीदींग वा प्राणायाम करा

कार्डिओ सारखे वेगाने चालण्याने फुप्फुसाची क्षमता वाढते.

पाणी योग्य प्रमाणात प्यावे त्यामुळे कफ पातळ होईल आणि फुप्फुसांवर जास्त भार पडणार नाही